नवी दिल्ली, 2 सप्टेंबर : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेकदा ट्रेनचं रिझर्वेशन केलं जातं, पण काही कारणाने प्लॅन बदलतो आणि प्रवासाची तारीख पुढे-मागे होते. अशावेळी तिकीट कॅन्सल केलं जातं, यात तिकीट कॅन्सल केल्यामुळे पैसे कट होतात. पण रेल्वे नियमानुसार, आता तुम्ही तुमचा हा प्रवास ‘Preponed’ किंवा ‘Postponed’ करू शकता, तसंच तुमचं बोर्डिंग स्टेशनही बदलू शकता. अशी बदला तारीख - प्रवासी मूळ बोर्डिंग स्टेशनच्या स्टेशन मॅनेजरला लेखी अर्ज देऊन किंवा ट्रेन सुटण्याआधी कमीत-कमी 24 तासआधी एखाद्या कंप्यूटराइज्ड रिजर्वेशन सेंटरवर जावून प्रवासाच्या बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करू शकतात. ही सुविधा ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही प्रकारच्या तिकीटांवर मिळते. जर तुम्हाला तुमचा प्रवास आणखी पुढे करायचा आहे. म्हणजे ज्या स्टेशनपर्यंत तिकीट बुक केलं गेलं आहे, त्यापुढील स्टेशनपर्यंत जायचं असल्यास, त्यासाठी प्रवाशाला गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी किंवा बुक केलेला प्रवास पूर्ण झाल्यानंतर, तिकीट तपासणी कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा लागतो आणि त्यांना प्रवासाचे डिटेल्स द्यावे लागतात. Indian Railways च्या वेबसाईटनुसार, स्टेशन काउंटरवर बुक केलेल्या तिकीटाच्या प्रवासाची तारीख ‘Preponed’ किंवा ‘Postponed’ केवळ एकदाच करता येते. सीट कन्फर्म किंवा वेटिंगवर असल्यासही हे बदल करता येतात. प्रवासाच्या तारखेत बदल करण्यासाठी, तारीख पुढे करण्यासाठी प्रवाशाला रिजर्वेशन ऑफिस जावून ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी आपलं तिकीट सरेंडर करावं लागेल. ही सुविधा ऑफलाईन तिकीटासाठीच उपलब्ध आहे. ऑनलाईन बुक केलेल्या तिकीटांसाठी ही सुविधा नाही.
आता RTO जाण्याची गरज नाही, घरबसल्या सोप्या स्टेप्सने Renew करा Driving Licence
भारतीय रेल्वे प्रवाशांना आपल्या कन्फर्म/ RAC/ वेटिंग तिकीटात प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा देते. भारतीय रेल्वेनुसार, या तिकीटांवरील प्रवासाची तारीख निर्धारित शुल्क भरल्यावर त्याच स्थानकासाठी, त्याच श्रेणी किंवा उच्च श्रेणीसाठी ‘Preponed’ किंवा ‘Postponed’ करता येतं. त्याशिवाय रेल्वे प्रवाशांना आपला प्रवास वाढवण्यासाठी, आपल्या प्रवासाच्या बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करण्यासाठी आणि तिकीटं उच्च श्रेणीमध्ये अपग्रेड करण्याचीही परवानगी देते. यापैकी काही सुविधा केवळ ऑफलाईन तिकीटांसाठी लागू आहेत. तर इतर ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही तिकीटांसाठी उपलब्ध आहे.