जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Vodafone Idea ची जबरदस्त ऑफर! ‘या’ ग्राहकांना दर महिन्याला मोफत मिळणार 2GB इंटरनेट

Vodafone Idea ची जबरदस्त ऑफर! ‘या’ ग्राहकांना दर महिन्याला मोफत मिळणार 2GB इंटरनेट

Vodafone Idea ची जबरदस्त ऑफर! ‘या’ ग्राहकांना दर महिन्याला मोफत मिळणार 2GB इंटरनेट

कंपनीने आपल्या यूझर्ससाठी नुकताच ‘डेटा डिलाईट’ (Vi data delight plan) प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये व्होडाफोन-आयडिया (Vodaphone-idea data delight) यूझर्सना प्रत्येक महिन्यात मोफत दोन जीबी बॅकअप डेटा मिळणार आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली 06 जानेवारी : टेलिकॉम कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या दरवाढीनंतर ग्राहक बरेच नाराज झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्याकडे पुन्हा आकर्षित करण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या स्कीम्स समोर आणत आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांच्या या शर्यतीत व्होडाफोन-आयडियासुद्धा (Vi) मागे नाही. कंपनीने आपल्या यूझर्ससाठी नुकताच ‘डेटा डिलाईट’ (Vi Data Delight Plan) प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये व्होडाफोन-आयडिया (Vodaphone-Idea Data Delight) यूझर्सना प्रत्येक महिन्यात मोफत दोन जीबी बॅकअप डेटा मिळणार आहे. असा ॲक्टिव्हेट करा प्लॅन डेटा डिलाईट प्लॅन सुरू करण्यासाठी व्होडाफोन-आयडिया यूझर्स 121249 या क्रमांकावर कॉल करू शकतात. किंवा मग Vi ॲपच्या (Vi App) मदतीनेही हा प्लॅन ॲक्टिव्हेट करता येतो. यानंतर तुम्हाला दर महिन्याला 2 जीबी अतिरिक्त डेटा अगदी मोफत मिळतो. सध्या काही ठराविक प्लॅनसोबत डेटा डिलाईटची (Activate Data Delight) सुविधा देण्यात येत आहे. या प्लॅन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. 299 रुपयांचा प्लॅन व्होडाफोन-आयडियाच्या या प्लॅनमध्ये (Vodafone-idea plans) कंपनी 28 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डेटा, 100 फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग अशा सुविधा देत आहे. या प्लॅनसोबत यूझर्सना डेटा डिलाईट प्लॅन मिळणार आहे.

    चिनी फोनच्या बदल्यात भारतीय फोन; लाव्हा मोबाईल्सचा देशभक्तीचा नारा

    359 रुपयांचा प्लॅन हा प्लॅनदेखील 28 दिवसांचा आहे. यामध्ये यूझर्सना दररोज 2 जीबी डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग अशा सुविधा मिळतात. सोबतच, डेटा डिलाईट, बिंज ऑल नाईट (Vi binge all night) आणि वीकेंड डेटा रोलओव्हर (Vi weekend data rollover) अशा सुविधाही दिल्या जातात. या प्लॅनसोबत Vi मूव्हीज अँड टीव्ही ॲपचे मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येते. 409 रुपयांचा प्लॅन 28 दिवस व्हॅलिडिटी असणाऱ्या या प्लॅनमध्ये यूझर्सना दररोज 2.5 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 फ्री एसएमएस अशा सुविधा दिल्या जात आहेत. यासोबतच या प्लॅनमध्ये डेटा डिलाईट, बिंज ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर या सुविधाही यूझर्सना मिळतात. हा प्लॅन घेणाऱ्या यूझर्सना Vi मूव्हीज अँड टीव्ही ॲपचे मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येते.

    Smartphone मध्ये दिसणाऱ्या या लहानशा होलची मोठी भूमिका, वाचा काय आहे याचा फायदा

    एकूणच, 299 रुपयांपेक्षा जास्तीचे प्लॅन्स घेतल्यानंतर तुम्ही डेटा डिलाईट ऑफरसाठी पात्र ठराल असं दिसतंय. यामध्ये तुम्हाला 2 जीबी अतिरिक्त डेटा अगदी मोफत मिळणार आहे. म्हणजेच, तुमचं इंटरनेट वापराचं डेली लिमिट संपल्यानंतरही तुमच्याकडे वापरण्यासाठी काही डेटा शिल्लक असणार आहे! व्होडाफोन-आयडिया यूझर्ससाठी ही नक्कीच एक चांगली ऑफर आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात