जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / ...तर चिनी फोनच्या बदल्यात भारतीय फोन मिळणार मोफत; लाव्हा मोबाईल्सचा देशभक्तीचा नारा

...तर चिनी फोनच्या बदल्यात भारतीय फोन मिळणार मोफत; लाव्हा मोबाईल्सचा देशभक्तीचा नारा

...तर चिनी फोनच्या बदल्यात भारतीय फोन मिळणार मोफत; लाव्हा मोबाईल्सचा देशभक्तीचा नारा

भारतीयांनी भारतीय ब्रँड्सकडूनच मोबाईल्स खरेदी केले पाहिजेत, अशी अपेक्षा लाव्हा कंपनीने व्यक्त केली आहे. त्यांनी एक विशेष ऑफर जाहीर करून त्याबद्दलचं ट्विट केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 6 जानेवारी : लाव्हा मोबाईल्स (Lava Mobiles) या भारतीय स्मार्टफोन ब्रँडने (Indian Smartphone Brand) देशभक्तीची साद घालून मार्केटिंगचा एक नवा प्रकार अवलंबला आहे. ‘Realme 8s’ हा स्मार्टफोन असलेल्यांनी सात जानेवारी 2022 पर्यंत लाव्हा मोबाईल्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोंदणी केल्यास त्यांना Lava AGNI 5G हा हँडसेट मोफत देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. रियलमी ही चिनी कंपनी (Chinese Company) आहे, तर लाव्हा ही भारतीय कंपनी आहे. भारतीयांनी भारतीय ब्रँड्सकडूनच मोबाईल्स खरेदी केले पाहिजेत, अशी अपेक्षा लाव्हा कंपनीने व्यक्त केली आहे. त्यांनी एक विशेष ऑफर जाहीर करून त्याबद्दलचं ट्विट केलं आहे. ‘भारत हा माझा देश आहे; पण माझा स्मार्टफोन चायनीज आहे. Is that real me?’ असा श्लेष त्यांनी ट्विटमध्ये साधला आहे. AGNI 5G हा भारताचा पहिला 5G स्मार्टफोन आहे, असा दावा लाव्हा कंपनीने केला आहे.

जाहिरात

बीबीके इलेक्ट्रॉनिक्स (BBK Electronics) ही रिअलमीची पॅरेंट कंपनी चीनमध्ये आहे; पण रिअलमी कंपनी भारतात नोएडामधल्या शेअर्ड फॅसिलिटीजमध्ये फोन तयार करते. तसंच, भारतात तयार केलेले फोन रिअलमी कंपनीकडून नेपाळमध्ये निर्यातही केले जातात. तसंच, केवळ रिअलमीच नव्हे, तर जवळपास सर्वच चायनीज स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांच्या भारतात असेम्ब्ली लाईन्स आहेत. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी या असेम्ब्ली लाईन्स तयार करण्यात आल्या असून, त्यात लाखो भारतीय नागरिक नोकरी करतात. हेही वाचा :  Electricity Bill निम्म्याहून कमी येईल, घरातील दोन गॅजेट्समध्ये करा हे बदल लाव्हा मोबाईल्सने आपली ऑफर ट्विटरवर जाहीर केल्यानंतर सोशल मीडिया युझर्सना ती आयडिया फारशी आवडली नसल्याचं जाणवलं. ही कंपनी ‘प्राउडली इंडियन’ हा टॅग केवळ उत्पादनांची विक्री वाढण्यासाठीच वापरत असून, आपल्या कंपनीच्या स्मार्टफोन्सची क्षमता वाढवण्यावर मात्र लक्ष केंद्रित करत नाहीय. प्रॉडक्ट्स दर्जेदार असतील, तर ते प्रॉडक्ट्सवरूनच कळलं पाहिजे, असं मत एका व्यक्तीने व्यक्त केलं आहे. Lava AGNI 5G हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. त्याला होल पंच डिझाइनचा 6.78 इंच Full HD+ डिस्प्ले असून, त्याचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे. या फोनला मीडियाटेक डायमेन्सिटी 810 चिपसेट असून, त्याला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. फोनला 5000 mAh क्षमतेची बॅटरी असून, ती 30 W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनला क्वाड रिअर कॅमेरा सेटअप असून, त्यात 64 मेगापिक्सेल प्रायमरी शूटर, 5 मेगापिक्सेल वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि दोन मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स यांचा समावेश आहे. लाव्हा मोबाइल्स इंडिया वेबसाइटवर हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साइट्सवर 19,999 रुपयांना तो उपलब्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात