नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : आजपासून देशातील अनेक शहरांत Vodafone-Idea कंपनी 5G ट्रायल सुरू (Vodafone-Idea 5G Trial) करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. 'आजपासून आम्ही परिवर्तनासाठी सज्ज आहोत. आजपासून आम्ही 5G ट्रायल सुरू करत आहोत. टेक्नोलॉजीच्या या पुढच्या टप्प्यात आमची साथ द्या' असं ट्विट कंपनीने केलं आहे.
देशातील अनेक शहरांत कंपनीने 5G ट्रायल सुरू केलं आहे. याआधी Airtel आणि Jio नेही 5G ट्रायल सुरू केलं होतं. Airtel ने Ericson सह पार्टनरशिप करुन गुरुग्राममध्ये 5G ट्रायल सुरू केलं होतं. Airtel ला दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये 5G ट्रायलसाठी स्पेक्ट्रम उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
तर Reliance Jio ने 5G ट्रायलसाठी देशातच डेव्हलप केलेल्या 5G इक्विपमेंट्स (Indigenously Developed Equipment) आणि टेक्नोलॉजीचा वापर केला आहे.
Today, we're all set to showcase a whole new world of transformation across various domains in tech through our 5G trials. Join us on a journey that promises a new era of technology advancement in our country while we conduct the trials across multiple cities. pic.twitter.com/FCxPRoJ1ts
— Vi_News (@VodaIdea_NEWS) November 26, 2021
दरम्यान, Vodafone Idea ने 25 नोव्हेंबरपासून सर्व प्रीपेड प्लॅन्समध्ये 25 टक्क्यांची वाढ केली आहे. वाढलेल्या किंमती 25 नोव्हेंबरपासून लागू झाल्या आहेत. आता Vodafone Idea ग्राहकांना आधीच्या तुलनेत जवळपास 25 टक्के अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. Vodafone Idea चा बेसिक प्लॅन जो आतापर्यंत 79 रुपये होता, तो वाढून आता 99 रुपये झाला आहे. टॉपअप पॅक 48 रुपयांच्या जागी 58 रुपये इतका झाला आहे.
वोडाफोन-आयडियाचा सर्वाधिक विक्री होणारा 149 रुपयांचा प्लॅन आता 179 रुपये झाला आहे. या प्लनची वैधता 28 दिवस आहे. त्याशिवाय 2 GB डेटा, 300 SMS आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा मिळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Vodafone, Vodafone idea tariff plan, Vodafone services