• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • लॉकडाऊनमध्ये खूशखबर! 349 रुपयांमध्ये मिळणार आता 3 GB डेटा

लॉकडाऊनमध्ये खूशखबर! 349 रुपयांमध्ये मिळणार आता 3 GB डेटा

वोडाफोन, एअरटेल आणि जिओ तीन कंपन्यांनी स्वस्तात काही खास प्लॅन आणले आहेत. 3GB डेटा सोबत आणखी काय मिळणार फायदा जाणून घ्या.

  • Share this:
    मुंबई, 19 मे : लॉकडाऊनमध्ये अगदी तरुणांपासून ते घरातून काम करणाऱ्यांना (work from home) इंटरनेट सेवा पुरत नाही. 1GB किंवा 1.5, 2 GB डेटा पुरत नाही. यासाठी खास रिलायन्स जिओ, वोडाफोन आणि एअरटेल या तिन्ही कंपन्यांनी 3 GB डेटा असलेला प्लॅन खास ग्राहकांसाठी आणला आहे. काय आहेत तिन्ही कंपन्यांचे प्लॅन आणि काय फायदा मिळणार जाणून घ्या Reliance jio 349 Plan वोडाफोन आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी 349 चा प्लॅन आणला आहे. यामध्ये 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. यासोबत दररोज 3 GB डेटा, 100 SMS, jio ते jio अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. यामध्ये जिओ ते इतर नेटवर्कसाठी केवळ 1000 मिनिटं मिळणार आहेत. 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय आहे खास Reliance Jio 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक खास सुविधा मिळणार आहेत. 3 GB रोज डेटासह 3 महिन्यांची वैधता मिळणार आहे. जे लोक Work from home करतात त्यांना हा प्लान फायदेशीर ठरणार आहे. 28 दिवसांना 350 रुपयांचा रिचार्ज कऱण्यापेक्षा 999 चा प्लॅन फायदेशीर ठरतो. या शिवाय या प्लॅनमध्ये Jio ते jio ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. इतर नेटवर्कसाठी 3000 मिनिटं आणि 100 SMS दरदिवशी मिळणार आहेत. या प्लॅनची वैधता 84 दिवस असणार आहे. हे वाचा-आता Facebook तुम्हाला देणार 77 लाख, करा फक्त 'हे' काम Airtel 401 plan Airtel कंपनीने ग्राहकांसाठी 401 रुपयांचा प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह रोज 3 GB डेटा मिळणार आहे. यासोबत Disney+Hotstar VIPचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. एअरटेल ते इतर नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉल आणि रोज 100 SMS मिळणार आहेत. यामध्ये 558 रुपयांचा 56 दिवसांसाठी आणखी एक प्लॅन आहे. त्यामध्ये 3 GB डेटा, 100 SMS दरदिवशी यासोबत अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. वोडाफोन-आयडिया 599 plan ग्राहकांना 249 मध्ये डबल डेटा देणारा प्लॅन आहे. यामध्ये 1.5+1.5 GB डेटा मिळणार आहे. 28 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS रोज मिळणार आहे. याशिवाय झी-5 अॅपचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. ग्राहकांना 399 मध्ये डबल डेटा देणारा प्लॅन आहे. यामध्ये 1.5+1.5 GB डेटा मिळणार आहे. 56 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS रोज मिळणार आहे. याशिवाय झी-5 अॅपचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. ग्राहकांना 599 मध्ये डबल डेटा देणारा प्लॅन आहे. यामध्ये 1.5+1.5 GB डेटा मिळणार आहे. 84 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS रोज मिळणार आहे. याशिवाय झी-5 अॅपचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. हे वाचा-काय टेक्नॉलॉजी आहे! शरीरावर फक्त टॅटू लावून मेंदूत काय चालतंय ते समजणार हे वाचा-बंपर डिस्काउंट! 62 हजारांचा फोन फक्त 22,999 रुपयांमध्ये, ऑफर फक्त एक दिवस संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published: