काय टेक्नॉलॉजी आहे! शरीरावर फक्त टॅटू लावून मेंदूत काय चालतंय ते समजणार

काय टेक्नॉलॉजी आहे! शरीरावर फक्त टॅटू लावून मेंदूत काय चालतंय ते समजणार

Tattoo फक्त फॅशनपुरता मर्यादित राहिला नाही, तर एक टेक्नॉलॉजी झाला आहे.

  • Share this:

विकास शर्मा/ नवी दिल्ली 15 मे : मेंदूचं कार्य कसं सुरू आहे, हे तपासण्यासाठी ईईजी (electroencephalography - EEG) केलं जातं. यासाठी डोक्यावर इलेक्ट्रॉड्स लावले जातात. मात्र आता हेच इलेक्ट्रॉड्स टॅटूच्या रूपात विकसित करण्यात आलेत. हा टॅटू शरीरावर लावून मेंदूत काय चाललं आहे, ते समजण्यास मदत होणार आहे.

टॅटू म्हणजे फॅशन. मात्र आता हा टॅटू फॅशनपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर टेक्नॉलॉजीतही त्याचा वापर होतो आहे. ऑस्ट्रेलियातील ग्राज युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या (Graz University of Technology) लॅबॉरेटरी ऑफ अप्लाइड मटेरियल्स फॉर प्रिंटेड अँड सॉफ्ट इलेक्ट्रॉनिक्सचे प्रमुख फ्रान्सेसको ग्रेसो यांनी इटलीतल्या शास्त्रज्ञांसह टॅटू इलेक्ट्रॉड (Tattoo Electrode) तयार केला आहे.

हे वाचा - कोरोनाच्या परिस्थितीत तुमचा फर्स्ट एड बॉक्स तयार आहे ना?

या टॅटूमध्ये 700 ते 800 नॅनोमीटर्स आहेत जे त्वचेत समान प्रमाणात पसरतात. हे टॅटू इलेक्ट्रॉड ड्राय इलेक्ट्रॉड आहेत, जे जास्त कालावधी EEG तपासण्यासाठी उपयुक्त आहेत. सोबत ते MEG (magneto-encephalography) साठीदेखील उपयुक्त आहे.आतापर्यंत MEG साठी फक्त वेट इलेक्ट्रॉडचा उपयोग होत होता. त्यामुळे ते जेल किंवा पेस्टसह काम करत असत. शिवाय लवकर सुकल्यानं जास्त वेळ त्यांचा वापर करता येत नव्हता. मात्र टॅटू इलेक्ट्रॉड कंडक्टिव पॉलिमरचा वापर करतात. म्हणजे यामध्ये कोणते धातू नाहीत त्यामुळे MEG चाचणी करताना कोणतीच समस्या येत नाही. याशिवाय हा टॅटू लावलेल्या ठिकाणावर केस असले तरीदेखील सिग्नल रेकॉर्ड करण्याच्या प्रक्रियेत काहीच अडचण येत नाही.

हे वाचा - सर्पदंशावर आता लवकरच टॅबलेट, तात्काळ कमी करणार विषाचा परिणाम

या प्रोजेक्टमध्ये संशोधक म्हणून काम करणाऱ्या फ्रान्सच्या लॉरा फेरारी यांनी सांगितलं की, मेंदूतील लहरींची वारंवारता खूप कमी असते. शिवाय EEG तून मिळणारे संकेतही कमी असतात, त्यांना पकडणं EMG आणि ECG संकेतांपेक्षाही कठीण असतं.पारंपारिक EEG इलेक्ट्रॉडच्या तुलनेत या टॅटूची चाचणी यशस्वी आहे.

ग्रेसो म्हणाले टॅटू इलेक्ट्रॉडमुळे वेळ आणि पैसे दोघांची बचत करता येऊ शकते.

संपादन - प्रिया लाड

First published: May 15, 2020, 1:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading