मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alert! सोशल मीडियावर कोविड लशीच्या सर्टिफिकेटसोबत फोटो अपलोड केला असेल तर लगेच हटवा, कारण...

Alert! सोशल मीडियावर कोविड लशीच्या सर्टिफिकेटसोबत फोटो अपलोड केला असेल तर लगेच हटवा, कारण...

फोटोसह युजरने कोविड वॅक्सिनेशननंतर मिळालेलं सर्टिफिकेटही सोशल मीडियावर अपलोड केलं असेल, किंवा अपलोड करण्याचा विचार करत असाल, तर सावध व्हा. गृह मंत्रालयाने लोकांना असं करण्यापासून सावध केलं आहे.

फोटोसह युजरने कोविड वॅक्सिनेशननंतर मिळालेलं सर्टिफिकेटही सोशल मीडियावर अपलोड केलं असेल, किंवा अपलोड करण्याचा विचार करत असाल, तर सावध व्हा. गृह मंत्रालयाने लोकांना असं करण्यापासून सावध केलं आहे.

फोटोसह युजरने कोविड वॅक्सिनेशननंतर मिळालेलं सर्टिफिकेटही सोशल मीडियावर अपलोड केलं असेल, किंवा अपलोड करण्याचा विचार करत असाल, तर सावध व्हा. गृह मंत्रालयाने लोकांना असं करण्यापासून सावध केलं आहे.

नवी दिल्ली, 20 मार्च : सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणं अनेकांना आवडतं. अनेक युजर्स आपल्या स्टेटसवर दिवसाच्या अ‍ॅक्टिव्हिटी शेअर करत असतात. सोशल मीडियावर जो काही लेटेस्ट ट्रेंड असतो, त्यानुसार युजर्स आपलं स्टेटस अपडेट ठेवतात. सध्या कोविड वॅक्सिनेशननंतर लोक सोशल मीडियावर फोटो शेअर करत, त्याबाबतही माहिती देत आहेत. ज्या लोकांच्या मनात वॅक्सिनेशनबाबत भीती असेल, त्यांना लस घेतलेल्या लोकांमुळे प्रेरणा, हिम्मत मिळू शकते.

परंतु या फोटोसह युजरने कोविड वॅक्सिनेशननंतर मिळालेलं सर्टिफिकेटही सोशल मीडियावर अपलोड केलं असेल, किंवा तुम्ही अपलोड करण्याचा विचार करत असाल, तर सावध व्हा. गृह मंत्रालयाने लोकांना असं करण्यापासून सावध केलं आहे.

गृह मंत्रालयाने, नुकतंच आपल्या सायबर सिक्योरिटी अवेयरनेस करणाऱ्या ट्विटर हँडलवरुन एक ट्विट शेअर करत लोकांना कोविड वॅक्सिनेशननंतरचं सर्टिफिकेट अपलोड न करण्याचं आवाहन केलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपलं कोविड वॅक्सिनेशननंतरच सर्टिफिकेट आणि प्रोफाईल फोटो स्टेटसवर टाकू नका, सोशल मीडियावर पोस्ट करू नका, असं सांगण्यात आलं आहे. या सर्टिफिकेटवर व्यक्तीचं नाव आणि इतर वैयक्तिक तपशील आहेत. त्याच तपशीलाचा सायबर गुन्हेगारांद्वारे गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना सतर्क करण्यात आलं आहे.

(वाचा - आता ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी लागू होणार नवे नियम; जाणून घ्या काय होणार बदल)

कोरोना लसीकरणानंतर देण्यात येणारं प्रमाणपत्र एक कायदेशीर कागदपत्र आहे. ज्यात लस घेतलेल्या व्यक्तीचं नाव, त्याची ओळख, त्याचा नोंदणी आयडी असे तपशील असतात. त्यामुळेच हे सर्टिफिकेट कुठेही सोशल मीडियावर अपलोड न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

(वाचा - Covid-19 Vaccination: लसीकरणासाठी घरबसल्या करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन; बुक करा स्लॉट)

कोविड वॅक्सिनेशननंतरच्या सर्टिफिकेटचा वापर एखाद्या चुकीच्या कामात केला किंवा अशा प्रकारात कोणी पकडलं गेलं, असं कोणतंही प्रकरण भारतात आतापर्यंत समोर आलेलं नाही अशी माहिती सायबर एक्सपर्ट आकाश यांनी दिली. परंतु, अमेरिकेसारख्या देशात या सर्टिफिकेटचा गैरवापर होत असल्याचं चित्र आहे. या सर्टिफिकेटवरील वैयक्तिक माहिती मिळाल्यानंतर लोक बनावट क्रेडिट कार्ड बनवत असून क्रेडिट कार्डचं बिल कोविड वॅक्सिनेशनचं सर्टिफिकेट अपलोड करणाऱ्या व्यक्तीच्या नावे करण्यात आल्याची प्रकरणं समोर आली आहेत. अनेक लोक याचाच वापर करुन नकली सर्टिफिकेटही बनवत आहेत. त्यामुळेच भारतात याबाबत अलर्ट करण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Covid19