आधारसंबंधी कोणत्याही समस्येसाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1947 वर ग्राहक कॉल करू शकतात. UIDAI ने ग्राहकांसाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर दिला आहे. ही स्पेशल सर्विस ग्राहकांना 12 भाषांमध्ये मदत करेल. हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, उर्दु, आसामी, बंगाली या भाषांमध्ये हेल्पलाईन सपोर्ट मिळेल.
ग्राहक मेलद्वारेही तक्रार दाखल करू शकतात. यासाठी help@uidai.gov.in वर ग्राहक आपली समस्या पाठवू शकतात. UIDAI चे अधिकारी वेळोवेळी मेल चेक करतात आणि ग्राहकांच्या समस्यांचं निराकरण करतात. तक्रार सेल ई-मेलवर उत्तर देऊन समस्यांचं समाधान करतात.
UIDAI च्या वेबसाईटवरही आधारसंबंधी तक्रार दाखल करता येऊ शकते. यासाठी UIDAI च्या https://resident.uidai.gov.in/ च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
इथे संपर्कासाठी Ask Aadhaar वर क्लिक करा. ग्राहकाला आधार Executive शी लिंक केलं जाईल. इथे ग्राहक आपली समस्या सांगून मदत मिळवू शकतात.