मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Tips and Trick: इंटरनेटशिवायही वापरता येऊ शकतं Gmail; त्यासाठी करा फक्त 'ही' एक गोष्ट

Tips and Trick: इंटरनेटशिवायही वापरता येऊ शकतं Gmail; त्यासाठी करा फक्त 'ही' एक गोष्ट

आजच्या काळात जवळपास प्रत्येक स्मार्टफोन युझर जी-मेल वापरतो. महत्त्वाची डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी, मोठा मेसेज पाठवण्यासाठी किंवा फाईल पाठवण्यासाठी याचा वापर केला जातो.

आजच्या काळात जवळपास प्रत्येक स्मार्टफोन युझर जी-मेल वापरतो. महत्त्वाची डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी, मोठा मेसेज पाठवण्यासाठी किंवा फाईल पाठवण्यासाठी याचा वापर केला जातो.

आजच्या काळात जवळपास प्रत्येक स्मार्टफोन युझर जी-मेल वापरतो. महत्त्वाची डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी, मोठा मेसेज पाठवण्यासाठी किंवा फाईल पाठवण्यासाठी याचा वापर केला जातो.

  मुंबई, 22 फेब्रुवारी : ई-मेल करायचा म्हटलं की, अनेकांना एकच नाव आठवतं ते म्हणजे जी-मेल (Gmail). कारण जी-मेलचा वापर बहुतांश जण करतात. जी-मेलमध्ये असलेल्या फीचर्समुळे (Features) अनेक कामं सोपी होतात; पण जी-मेलची बहुतांश फीचर्स सर्वसामान्यांना माहिती नाहीत. अनेकजण केवळ ई-मेल, अटॅचमेंट (attachments) पाठवण्यासाठी आणि रिसीव्ह (send and receive) करण्यासाठी जी-मेलचा वापर करतात. तुम्हाला माहिती आहे का, की जी-मेल हे इंटरनेटशिवायसुद्धा (without internet) वापरता येतं.

  तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर, डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर इंटरनेटशिवाय जी-मेल वापरायचं असेल, तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर, तुम्हाला इंटरनेटशिवाय नवीन ईमेल सहज प्राप्त होईल, मेल वाचता येतील आणि कोणालाही मेल सेंड करता येतील. चला तर मग त्यासाठी नेमकं काय करावं लागेल, ते जाणून घेऊ या. एबीपी न्यूजने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

  - सर्वप्रथम तुमच्या डिव्हाइसवर Chrome 61 डाउनलोड करा.

  - जी-मेलवर जा आणि वरच्या उजव्या कोपऱ्यातल्या सेटिंग्ज आयकॉनवर क्लिक करा.

  - त्याच्या अगदी खाली See All Settings वर क्लिक करा.

  - यानंतर तुमच्यासमोर एक टॅब उघडेल.

  वाचा : अभ्यास सोडून तुमची मुलं स्मार्टफोनवर चुकीचं तर करत नाही ना? असं ठेवा लक्ष

  - यामध्ये अनेक ऑप्शन्स दिसतील. त्यामध्ये शेवटून दुसरा ऑप्शन Offline असेल.

  - आता Enable Offline ऑप्शनवर टिक करा आणि सेव्ह वर क्लिक करा.

  अशा प्रकारे तुमच्या जी-मेलमध्ये ऑफलाईन फीचर्स अ‍ॅक्टिव्हेट होतील आणि तुम्ही ई-मेल सहज वाचू शकता, प्राप्त करू शकता आणि पाठवूदेखील शकता.

  वाचा : Indian Railways: ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या 'हे' नियम; उल्लंघन केल्यास होऊ शकते शिक्षा

  आजच्या काळात जवळपास प्रत्येक स्मार्टफोन युझर जी-मेल वापरतो. महत्त्वाची डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी, मोठा मेसेज पाठवण्यासाठी किंवा फाईल पाठवण्यासाठी याचा वापर केला जातो. सहसा, प्रत्येक अ‍ॅपप्रमाणे मोबाइलवरचं जी-मेलदेखील इंटरनेटवरून चालते. तीच परिस्थिती डेस्कटॉपवरही असते. इंटरनेटशिवाय जी-मेल वापरणं शक्य नाही; पण जी-मेलमधलं एक फीचर वापरून तुम्ही इंटरनेटशिवाय वापरू शकता. या फीचरमुळे तुमच्याकडे इंटरनेट नसतानाही तुम्ही जी-मेलवर आलेले मेल पाहू शकता व दुसऱ्याला मेल पाठवू शकता.

  आता बहुतांश कामे ई-मेलद्वारे केली जातात. खासगी कंपन्यांसोबतच आता सरकारी कार्यालयांमध्येही ई-मेलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो; पण इंटरनेट सुविधा नसेल, तर मेल पाठवायचा कसा, असा प्रश्न अनेकदा उभा राहतो. इंटरनेट नसतानादेखील एखादा महत्त्वाचा ई-मेल पाठवण्याचं तुमचं काम जी-मेलमध्येच असणाऱ्या या फीचरमुळे सोयीस्कर झालं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Gmail, Internet, Technology