मराठी बातम्या /बातम्या /देश /

Indian Railways: ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या 'हे' नियम; उल्लंघन केल्यास होऊ शकते शिक्षा

Indian Railways: ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या 'हे' नियम; उल्लंघन केल्यास होऊ शकते शिक्षा

त्यानंतर पेमेंटवेळी UPI चा वापर करुन आणखी वेळ वाचेल आणि कन्फर्म तात्काळ तिकीट बुक करू शकता.

त्यानंतर पेमेंटवेळी UPI चा वापर करुन आणखी वेळ वाचेल आणि कन्फर्म तात्काळ तिकीट बुक करू शकता.

Indian Railways: ट्रेनमधून प्रवास करता तेव्हा तुम्हाला रेल्वेचे अनेक नियम (Train Journey Rules) पाळावे लागतात. तुम्ही या नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला शिक्षा (Penalty) होऊ शकते.

मुंबई, 22 फेब्रुवारी : भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेचं विस्तीर्ण जाळं तयार करण्यात आलेलं आहे. भारतीय रेल्वे देशाच्या (Indian Railways) कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक रेल्वेला प्राधान्य देतात. विशेषत: जे नागरिक नियमितपणे लांबचा प्रवास करतात, त्यांची पहिली पसंती रेल्वेलाच मिळते. कारण, रेल्वेच्या माध्यमातून कमी दरात आरामदायी प्रवास करता येतो. रेल्वेतून प्रवास करताना डब्यांच्या आतमध्ये विविध सूचना लिहिलेल्या तुम्ही नक्कीच पाहिल्या असतील. 'रेल्वेची संपत्ती तुमचीच संपत्ती आहे. कृपया तिची काळजी घ्या,' अशा किती तरी सूचना डबे अर्थात बोगीच्या आतमध्ये ठिकठिकाणी लिहिलेल्या असतात. या सूचना का लिहिल्या गेल्या आहेत, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

जेव्हा तुम्ही ट्रेनमधून प्रवास करता तेव्हा तुम्हाला रेल्वेचे अनेक नियम (Train Journey Rules) पाळावे लागतात. तुम्ही या नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला शिक्षा (Penalty) होऊ शकते. ट्रेनमध्ये प्रवास करताना विनाकारण साखळी ओढणं (Chain Pulling) किंवा विनातिकीट (Without Ticket) प्रवास केल्यास शिक्षा होते, या दोन प्राथमिक गोष्टी जवळपास सर्व प्रवाशांना माहिती असतात; मात्र या दोन नियमांशिवाय इतर असे अनेक नियम आहेत, ज्यांचं पालन करणंसुद्धा आवश्यक आहे. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला दंडही होऊ शकतो. 'टीव्ही 9 भारतवर्ष'नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पोस्टर चिकटवू नका

ट्रेनमध्ये विविध सूचनांची अनेक पोस्टर्स (Posters) चिकटवलेली तुम्ही पाहिली असतील; पण तुम्ही स्वत: अशी पोस्टर्स चिकटवण्याची चूक कधीही करू नका. ट्रेनमध्ये पोस्टर चिकटवणं हा कायदेशीर गुन्हा आहे. तुम्ही पोस्टर चिकटवलं तर रेल्वे अ‍ॅक्टमधल्या (Railway Act) कलम 166 (ब) नुसार तुम्हाला सहा महिने तुरुंगवास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

वाचा : लग्न सोहळा आटपून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची गाडी दरीत कोसळली, 14 जणांचा मृत्यू

छतावर किंवा दरवाज्यात उभं राहून प्रवास करू नका

रेल्वे अ‍ॅक्टमधल्या कलम 156 नुसार ट्रेनच्या छतावर किंवा दरवाज्यात उभं राहून प्रवास करणं हादेखील कायदेशीर गुन्हा आहे. असं केल्यास, प्रवाशाला 500 रुपयांच्या दंडासह तीन महिने तुरुंगवास होऊ शकतो.

फसवणूक करून प्रवास करू नका

रेल्वे प्रशासनाची फसवणूक करून प्रवास करताना पकडले गेलात, तर रेल्वे अ‍ॅक्टमधल्या कलम 137 अंतर्गत 1000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. तसंच सहा महिने तुरुंगवास किंवा दोन्हीही होऊ शकतं. यासोबतच तुम्ही चुकीच्या मार्गानं आरक्षित डब्यातून प्रवास करत असाल, तरीही तुम्हाला शिक्षा होऊ शकते. साध्या तिकिटावर आरक्षित डब्यातून (Reserved Coach) प्रवास करता येत नाही. असं केल्यास, रेल्वे अ‍ॅक्टमधल्या कलम 155 (ए) नुसार, तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

वाचा : VIDEO : 62 वर्षांच्या आजीने सरसर चढत गाठलं पर्वताचं उंच शिखर; पाहून तरुणही थक्क

कचरा करू नका

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, ट्रेनमधून प्रवास करताना अनेक प्रवासी ट्रेनमध्येच कचरा (Garbage) टाकतात. हे अतिशय चुकीचं आहे. रेल्वे अ‍ॅक्टमधल्या कलम 145 (बी) नुसार, पहिल्यांदा असं केल्यास 100 रुपये दंड आणि दुसऱ्यांदा 250 रुपये दंड किंवा एक महिना कारावासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय ट्रेनमध्ये उपद्रव पसरवणाऱ्यांनाही या कायद्याच्या आधारे शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.

रेल्वे ही सार्वजनिक मालमत्ता (Public Property) आहे. त्यामुळं तिचा व्यवस्थित वापर करणं हे देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. त्याचं पालन न करता नियमांचं उल्लंघन केल्यास नक्कीच शिक्षा होऊ शकते.

First published:

Tags: India, IRCTC, Railways