मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

रेल्वे स्टेशन किंवा अन्य ठिकाणी फोन चार्ज करताना सावधान! एकाच्या बँक खात्यातून 16 लाख उडवले

रेल्वे स्टेशन किंवा अन्य ठिकाणी फोन चार्ज करताना सावधान! एकाच्या बँक खात्यातून 16 लाख उडवले

ओपन वाय-फायचा वापर वैयक्तिक कामासाठी करू नये, असे टेक एक्सपर्ट सांगतात.

ओपन वाय-फायचा वापर वैयक्तिक कामासाठी करू नये, असे टेक एक्सपर्ट सांगतात.

ओपन वाय-फायचा वापर वैयक्तिक कामासाठी करू नये, असे टेक एक्सपर्ट सांगतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : तुम्ही मोबाईल फोन वापरत असाल आणि फोन, मॅकबुक आणि इतर गॅजेट्स चार्ज करण्यासाठी दुसऱ्याचा चार्जर किंवा यूएसबी केबल वापरत असाल तर यापुढे असं चुकूनही करू नका. कारण, या मार्फत तुमचा डेटा हॅक करुन सायबर गुन्हेगार तुमची महत्त्वाची माहिती चोरू शकतात. हैदराबादमधील एका कंपनीच्या सीईओला 16 लाख रुपयांचा खटका बसला आहे. वास्तविक, तो सार्वजनिक ठिकाणी यूएसबी पोर्टद्वारे मोबाईल चार्ज करत होता. नंतर त्याच्या खात्यातून 16 लाख रुपये काढून घेतल्याचं आढळून आले.

या महिन्यात ओडिशा पोलिसांनी एक ट्विट देखील केले होते, ते म्हणाले, मोबाइल चार्जिंग स्टेशन किंवा यूएसबी पॉवर स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणी तुमचा मोबाइल चार्ज करू नका. सायबर फसवणूक करणारे मोबाईलवरून तुमची वैयक्तिक माहिती चोरून मालवेअर इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

एक साधी दिसणारी चार्जिंग केबल तुमच्यासाठी धोकादायक असू शकते. अशा हॅकर्सना टाळणे खूप कठीण झाले आहे. जर तुमच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली असेल तर घाईघाईत कोणताही USB चार्जर वापरू नका. यूएसबी चार्जरमध्ये चार केबल्स असतात. यामध्ये हॅकर्स डेटा चोरीसाठी एकच वापरतात. परंतु, सामान्य चार्जरमध्ये कोणताही धोका नाही. त्याला दोन केबल्स जोडलेल्या आहेत.

वाचा - Facebook वर या चुका अजिबात करु नका, नाहीतर जावं लागेल तुरुंगात

ओपन वाय-फायचा वापर वैयक्तिक कामासाठीही करू नये, असे टेक एक्सपर्ट सांगतात. जे फास्ट चार्जिंग यूएसबी आहेत, त्याला चार केबल्स जोडल्या गेल्या आहेत आणि डेटा चोरीची शक्यता वाढते. जर तुमचा फोन अनलॉक असेल आणि तुम्ही तो चार्जिंगमध्ये ठेवला असेल तर हॅकर्सना डेटा चोरणे सोपे जाते. त्यामुळे फोन लॉक केल्यानंतरच चार्जरशी कनेक्ट करावा.

52% सायबर हल्ल्यांमध्ये रिमूव्हेबल माध्यमांचा वापर

'2022 हनीवेल इंडस्ट्रीज सायबरसेक्युरिटी यूएसबी थ्रेट रिपोर्ट' नुसार, मालवेअरमध्ये झपाट्याने होणारी वाढ आणि यूएसबीशी संबंधित धोक्यांमुळे उद्योगातील लोकांची चिंता वाढत आहे. अहवालात असे म्हटले आहे की या वर्षातील 52% सायबर धोक्यांनी खास डिझाइन केलेले रिमूव्हेबल माध्यमांचा वापर केला आहे. त्याच वेळी, 2021 मध्ये, हा आकडा 32% होता आणि त्यात वाढ वेगाने वाढणारा धोका दर्शवते.

First published:

Tags: Cyber crime, Mobile, Smartphone