जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / UPI पेमेंट फेल होतंय? काय असू शकतात यामागची कारणं

UPI पेमेंट फेल होतंय? काय असू शकतात यामागची कारणं

UPI पेमेंट फेल होतंय? काय असू शकतात यामागची कारणं

UPI Transaction फेल झाल्यानंतर ते बराच वेळ पेडिंग दाखवलं जातं. अशात पैसे नक्की समोरच्याला गेले की नाही, पेमेंट झालं की नाही याची खात्री होत नाही. त्यामुळे काहीशी समस्या निर्माण होते. ट्रान्झेक्शन फेल होण्यामागे काही कारणं असू शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 9 एप्रिल : मागील काही काळात डिजीटल पेमेंटमध्ये (Digital Online Payment) मोठी वाढ झाली आहे. ऑनलाइन पेमेंटमुळे अनेक काम सोपी झाली आहेत. जवळ कॅश नसेल तरीही स्मार्टफोनमधून UPI द्वारे कोणतीही वस्तू खरेदी करणं, एखाद्याला पैसे ट्रान्सफर करणं सोपं झालं आहे. पण अनेकदा पेमेंट करताना पेमेंट फेल झाल्याच्याही घटना घडतात. UPI Transaction फेल झाल्यानंतर ते बराच वेळ पेडिंग दाखवलं जातं. अशात पैसे नक्की समोरच्याला गेले की नाही, पेमेंट झालं की नाही याची खात्री होत नाही. त्यामुळे काहीशी समस्या निर्माण होते. ट्रान्झेक्शन फेल होण्यामागे काही कारणं असू शकतात. UPI वरुन पेमेंटची मर्यादा हे एक कारण असू शकतं. तुम्ही किती पैसे पाठवू शकता किंवा किती पैसे मिळवू शकता याची मर्यादा असते. तुमच्याकडून वापरलं जाणारं UPI App आणि बँकेच्या यासाठी वेगवेगळ्या मर्यादा असतात. किती पैसे पाठवू शकता आणि मिळवू सकता याला दररोजची आणि महिन्याची मर्यादा आहे. त्या मर्यादेबाहेर गेल्यास ट्रान्झेक्शन फेल होऊ (UPI Transaction Fail) शकतं.

हे वाचा -  Call Drop बाबत सरकार गंभीर, टेलिकॉम कंपन्याचे लायसन्स रद्द करण्याची तयारी

तुम्हाला अधिक पैशांचं ट्रान्झेक्शन करायचं असेल, तर तुम्ही पुढच्या दुसऱ्या दिवसापर्यंत वाट पाहू शकता. परंतु तुम्हाला लहान रक्कम पाठवायची असेल, तर तुम्ही त्यासाठी रिक्वेस्ट करू शकता.

हे वाचा -  स्मार्टफोनवर Online अभ्यास करता? Digital Screen चा होतोय धक्कादायक परिणाम - रिपोर्ट

दररोजचं लिमीट संपलं असेल आणि पुढील ट्रान्झेक्शनसाठी समस्या येत असल्यास इतर दुसऱ्या बँक खात्याचा उपयोग करू शकता. त्या खात्याचा वापर करुन लिमीटनुसार पैसे ट्रान्सफर करू शकता. ट्रान्झेक्शनसंबंधी अधिक माहिती आणि स्पष्टता येण्यासाठी तुम्ही थेट तुमच्या बँकेशी संपर्क करू शकता. फसवणूक, फ्रॉडपासून वाचण्यासाठीच UPI App Transaction मध्ये लिमीट दिलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात