• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • 2000 हून कमी किमतीत मिळतोय 20 तास बॅटरी बॅकअप देणारा Wireless Earphones, काय आहेत फीचर्स

2000 हून कमी किमतीत मिळतोय 20 तास बॅटरी बॅकअप देणारा Wireless Earphones, काय आहेत फीचर्स

स्मार्टफोनसाठी एअरफोन्स घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 27 एप्रिल : भारतीय बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची मोठी क्रेझ आहे. म्हणूनच कंपन्या सातत्याने आपली नाविन्यपूर्ण उत्पादनं बाजारपेठांमध्ये सादर करत असतात. सध्या वायरलेस हेडफोन्सला (Wireless Headphones)मोठी मागणी आहे. विशेषतः युवा वर्ग आणि ऑनलाईन काम करणाऱ्या वर्गाकडून ही मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या नवनवीन इयरफोन्स (EarPhones)बाजारात आणत आहेत. 2000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या वायरलेस इयरफोन्समध्ये मल्टीफंक्शन बटणासह मायक्रोफोन्ससारखे अनेक जबरदस्त फीचर्स उपलब्ध आहेत. Noise Earbuds - या Earbuds चा बॅटरी बॅकअप 20 तास आहे. तसंच त्यासोबत टाईप सी पोर्ट (Type C Port)आहे. या बड्सची किंमत 1999 रुपये आहे. हे ईयर बड्स वायरलेस ब्लूटूथच्या माध्यमातून स्मार्टफोन, लॅपटॉप, डेस्कटॉपला जोडता येतात. Oneplus Bullets - या ईयरफोनमध्ये नॉन मेटॅलिक मिनिरल आणि सिलीका जेलपासून तयार केलेली एक एनर्जी ट्युब आणि 9.2mmचा ड्रायव्हर देण्यात आला आहे. नॉईस कॅन्सलेशन, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रक्शन सारखे खास फीचर्सही देण्यात आले आहेत. हा इयरफोन हवामान प्रतिरोधक (Weather Resistant)आहेत. मॅग्नेटिक स्विच क्लिप करुन युजर्स म्युझिक पॉज देखील करु शकतात. या ईयरफोनची किंमत 1999 रुपये आहे.

(वाचा - ...तर WhatsApp ग्रुपचा अ‍ॅडमिन जबाबदार नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय)

CrossBeats Wave - या लेटेस्ट ईयरफोनला IPX7 रेटिंग मिळालं आहे. याचा अर्थ असा, की हा ईयरफोन वॉटरफ्रुफ आहे. या ईयरफोनमधील साऊंड अधिक प्रभावी असावेत यासाठी त्यात ड्राईव्हर्सचा वापर करण्यात आलेला आहे. कनेक्टिव्हिटी साठी यात ब्लुटुथ 5.0 (Bluetooth5.0) देण्यात आला आहे. या इयरफोनची किंमत 1799 रुपये आहे. Boats Airdrops431 - बोट कंपनीचा एअरड्रॉप्स हा एक दमदार ईयरफोन आहे. यात 500mAhची बॅटरी आहे. यात कनेक्शनसाठी ब्लूटूथचा 5.0 हा व्हर्जन देण्यात आला आहे. या ईयरफोनला IPX4 रेटींग देण्यात आलं आहे. याची रेंज 10 मीटरपर्यंत आहे. याची किंमत 1999 रुपये आहे. Max N60 - मॅक्स एन 60 ईयर फोनचा लुक आकर्षक असून त्यात 220mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, बॅटरी सिंगल चार्ज केल्यानंतर 20 तासांपर्यंत बॅकअप मिळतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 हे व्हर्जन देण्यात आलं आहे. याची रेंज 10 मीटरपर्यंत आहे. या ईयर फोनमध्ये मायक्रो फोन सोबतच मल्टी फंक्शन बटन दिलं आहे. हा ईयरफोन HFP, HSP, AVRCP आणि A2DP कनेक्शनला सपोर्ट करतो. या ईयरफोनची किंमत 1799 रुपये आहे.
First published: