नवी दिल्ली, 13 जुलै : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) भारती एअरटेल (Airtel) प्लॅटिनम आणि व्होडाफोन आयडियाच्या (Vodafone Idea) रेडएक्स (RedX ) प्रीमियम प्लॅन्स ब्लॉक केले आहेत. या प्लॅन्स अंतर्गत काही निवडक युझरना हायस्पीड देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, इतर ग्राहकांचे स्पीड कमी करत, ही नवी योजना तयार करण्यात आली होती. सुत्रांनी सांगितले की भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) दोन्ही संचालकांना अंतरिम कालावधीसाठी या विशेष योजना मागे घेण्यास सांगितले आहे.
ट्रायने यासंदर्भात एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या दोन्ही ऑपरेटरना पत्र लिहिले असून यात त्यांच्या प्लॅनसंदर्भात काही प्राधान्य देणार्या युझरना हायस्पीड देण्याचे आश्वासन केल्याबद्दल विचारणा करण्यात आली आहे. यात या प्लॅनमुळे अन्य ग्राहकांना चांगली सेना नाकारण्यात आली आहे का?, असा सवालही विचारण्यात आला आहे.
वाचा-इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठी बातमी, आता पेट्रोल पंपावरच मिळेल चार्ज बॅटरी!
Trai has blocked Bharti Airtel’s Platinum and Vodafone Idea’s RedX premium plans that offer faster data speeds and priority services to customers @CNBC_Awaaz https://t.co/JBAzTDgkgC
— Aseem Manchanda (@aseemmanchanda) July 12, 2020
वाचा-Lamborghini पहिली सुपर हायब्रिड कार लाँच, वेग 350 किमी प्रतितास आणि किंमत...
यासंबंधी एअरटेलच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "आमच्या सर्व ग्राहकांना सर्वोत्कृष्ट नेटवर्क आणि सेवा उपलब्ध करून देण्याचे आमचे प्राधान्य असते". एअरटेलच्या प्रवक्त्याने सांगितले की, यासह कंपनीला पोस्टपेड ग्राहकांसाठी सेवा आणि जबाबदारी वाढवायची आहे. ट्रायने उत्तर देण्यासाठी एअरटेलला सात दिवसांची मुदत दिली आहे.
#Airtel response to @TRAI blocking Airtel's premium plan. pic.twitter.com/zUKtCaR264
— Aseem Manchanda (@aseemmanchanda) July 13, 2020
व्होडाफोन आयडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, 'आमच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी व्होडाफोन रेडएक्स प्लॅन अमर्यादित डेटा, कॉल, प्रीमियम सामग्री, आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक यासह बरेच फायदे देतात. ते असेही म्हणाले की, कंपनी आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट आणि उच्च गती 4 जी डेटा सेवा प्रदान करण्यास वचनबद्ध आहे.
वाचा-OPPO A52 : 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा सर्वोत्तम स्मार्टफोन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.