Home /News /technology /

OPPO A52 : 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा सर्वोत्तम स्मार्टफोन

OPPO A52 : 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा सर्वोत्तम स्मार्टफोन

आपल्या खिशाला फारसा ताण न देता एखादा प्रीमियम फीचर्स असलेला स्मार्टफोन आपल्याकडे असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. असाच हा फोन. जाणून घ्या फीचर्स

    आपल्या खिशाला फारसा ताण न देता एखादा प्रीमियम फीचर्स असलेला स्मार्टफोन आपल्याकडे असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं किंबहुना प्रत्येकजण तसे स्वप्न पाहत असतो. पण, OPPO A52 ने बाजारात प्रवेश केला की हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. याचा उत्कृष्ट डिस्प्ले, जास्त बॅटरी, भरभक्कम स्टोअरेज किंवा क्वाड कॅमेरा सेट-अपने परिपूर्ण असलेला हा स्मार्टफोन तुमच्या दिवसभरातील सर्व गरजा भागवू शकतो तेही तुमच्या बँक बॅलन्सला भगदाड न पाडता. आम्ही आता OPPO A52चे जे फीचर्स सांगणार आहोत, ते ऐकल्यावर तुम्ही हा फोन ताबडतोब खरेदी करण्यासाठी उतावीळ व्हाल. इमर्सिव्ह एफएचडी+ पंच होल डिस्प्ले एफएचडी+ सह 2400x1080 निओ डिस्प्ले रिझोल्यूशन आणि केवळ 1.73 एमएमची अल्ट्रा-नॅरो साईडव त्यातील पंच होल सेटअप यामुळे OPPO A52 पदार्पणातच निःसंशय बाजी मारेल. भरीस भर म्हणजे याचा 6.5” स्क्रीनवरील क्रिस्प रिझोल्यूशन 90.5% स्क्रीन-टू-बॉडी आहे ज्यामुळे एखादा कार्यक्रम पाहणे किंवा गेम्स खेळणे आणखी सोपे बनून जाते. OPPO A52चे 3D क्वाड-कर्व्ह डिझाईन हे आकाशातील आकृतीबंधांपासून प्रेरित आहे. याला कॉन्स्टेलॅशन डिझाईन म्हणतात. केवळ 192 ग्रॅम वजनाच्या या देखण्या, अल्ट्रा-लाईट फोनच्या बॅक सरफेसवर बोटांचे ठसे उमटत नाहीत. तसेच, 480 निट्स च्या सर्वाधिक ब्राईटनेसच्या मदतीने तुम्ही प्रखर सूर्यप्रकाशातही स्क्रीनवरील मजकूर स्पष्टपणे वाचू शकता. याच्या डिझाईनमध्ये वापरल्या गेलेल्या साईड फिंगरप्रिंट अनलॉक मेकॅनिझममुळे हा फोन एकहाती हाताळणे सुलभ बनते, परिणामी एक अधिक चांगला युझर एक्स्पेरिअन्स मिळतो. लक्षात घ्या की, या फोनमध्ये नील किरणांपासून डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी व त्यांच्यावर ताण न येऊ देण्यासाठी टीयूव्ही ऱ्हेईनलँडद्वारे प्रमाणित आय केअर मोडची व्यवस्था करण्यात आली आहे. असा डिस्प्ले असणाऱ्या अन्य कंपन्यांच्या स्मार्टफोन्सची किंमत OPPO ने निर्धारित केलेल्या A52च्या किंमतीपेक्षा सामान्यतः दुप्पट असते, म्हणूनच A52 निश्चितच उजवा ठरतो. अद्वितीय परफॉर्मन्स 6GB RAM+128GB च्या स्टोअरेज कॉन्फिगरेशनमुळे OPPO A52 तुमचे कोणतेही काम अगदी सहजपणे करू शकेल. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर त्याचबरोबर OPPOच्या मालकीचे हायपर बूस्ट यांमुळे हा स्मार्टफोन कमीत कमी शक्ती खर्च करून अत्यंत सहज काम करतो आणि तुम्ही जेव्हा जेव्हा तो वापरता तेव्हा तेव्हा उत्कृष्ट परफॉर्मन्स देतो. दिवसभर काम करा जेव्हा आपण हा डिव्हाईस वापरा असे म्हणतो, तेव्हा आम्ही तो तुम्ही दिवसभर वापरता असे गृहीत धरतो. आणि म्हणूनच, 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे, जी अपेक्षित काम करते. इतकेच नाही तर, OPPO A52 हा 18W च्या जलद चार्जिंगद्वारे स्मार्टफोन जलदगत्या चार्ज करण्यासाठी सक्षम आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे का की, तुमचा फोन रिव्हर्स चार्जिंगच्या मदतीने अन्य डिव्हाईसद्वारेही चार्ज करणे शक्य आहे? https://twitter.com/oppomobileindia/status/1271380046633029632/photo/1 अत्यंत सुंदर अशी छायाचित्रे घ्या नव्या OPPO A52मध्ये 12MPचा अल्ट्रा एचडी मुख्य कॅमेरासाठी क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स, 2 मेगापिक्सेलची पोर्ट्रेट लेन्स व 2 मेगापिक्सेलची मोनो लेन्स असलेला मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. हा 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा आकर्षक आणि स्पष्ट छायाचित्रे तर घेतोच, शिवाय याची 119.1-डिग्री वाईड-अँगल लेन्स त्याचे सौंदर्य वाढवते तर दोन अनोख्या पोर्ट्रेट पद्धतीच्या लेन्सेस अत्युच्च इमेज क्वालिटी देतात. मोठा अपेर्चर व अल्ट्रा नाईट मोड 2.0 च्या मदतीने तुम्ही रात्रीच्या वेळीही क्लॅरीटी आणि नॉईस विरहीत चित्रीकरण करू शकता. ड्युएल पोर्ट्रेट लेन्सेसच्या मदतीने तुम्ही आवश्यकतेनुसार सेल्फी घेऊ शकता व स्टाईल इमेजीस, फिल्टर्स आणि एआय ब्यूटीफिकेशनच्या मदतीने ते सुंदर बनवू शकता. तसेच, OPPO A52च्या इन-बिल्ट गायरोस्कोप व इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशनच्या माध्यमातून 4 के रिझोल्यूशनमध्ये ब्लर-फ्री व्हिडीओ बनवू शकता. OPPO A52मध्ये बसवलेल्या OPPOच्या Soloopव्हिडीओ एडिटर व क्रिएटीव्ह व्हिडीओ फिल्टर्सद्वारे तुम्ही चटकन तुमच्या फुटेजमध्ये बदल करून सोशल मिडिया स्टार बनू शकता. इमेजीस असोत वा व्हिडिओज, OPPO A52 प्रत्येक वेळी अतिशय सुंदर शॉट्स टिपणार हे नक्की. आणखी काही OPPO A52मध्ये अँड्रोईड 10 वरील ColorOS 7.1 चे नवीन कन्फिगरेशन दिले आहे, जे युझर इंटरफेस सुलभ करते, ब्लोटवेअर काढून टाकते आणि अधिकाधिक अपेक्षित एक्स्पेरिअन्स देते. या डीव्हाईसमधील ड्युअल स्टिरीओ स्पीकर्स सराउन्ड साऊंड इफेक्ट देतात व त्यातील डायराक 2.0 साऊंड इफेक्ट म्युझिक, व्हिडीओज व गेम्समधील साउंड इफेक्ट मोड्समध्ये आपोआप बदल करतो. या स्मार्टफोनमध्ये विविध मोड्स देण्यात आले आहेत ज्याद्वारे वर्क आणि प्ले मोड्स यांतील प्रत्येकाचे सेटिंग्ज व इन्फर्मेशन हे विलग व सुरक्षित राहतील. वाय-फाय, एलटीई, ब्ल्यूटूथ, एक 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी एक यूएसबी टाईप-सी पोर्ट हे सर्व कनेक्टीव्हिटी ऑप्शन्स या फोनमध्ये उपलब्ध आहेत. ट्वायलाईट ब्लॅक व स्ट्रीम व्हाईट या दोन रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या OPPO A52 स्मार्टफोनची विक्री रु. 16,990 Amazon Flipkart यांसारख्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन स्टोअर्सद्वारे होत आहे. ग्राहकांसाठी अनेक वित्त संस्थांचे आकर्षक इएमआय पर्याय, क्रेडीट कार्ड व डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी सहा महिन्यांचे नो कॉस्ट इएमआय, तसेच बँक ऑफ बरोदा क्रेडीट कार्ड इएमआय व फेडरल बँक डेबिट कार्ड इएमआययांवर 5% कॅशबॅकची सुविधा उपलब्ध आहे. OPPO लवकरच A52 हा स्मार्टफोन 4GB+128GB व 8GB+128GB या व्हेरीएंट्स बाजारात आणणार आहे. सध्या, आम्ही A52 ला OPPO Enco W11 शी पेअर करण्याचा सल्ला देतो. हे उत्कृष्ट वायरलेस हेडफोन्स इन-ईअर डिझाईनमध्ये आणि आयपी 55 डस्ट व वॉटरप्रूफ सर्टीफिकेशनमध्ये उपलब्ध आहेत. नवीन लो-डीले डबल ट्रान्समिशनच्या मदतीने हे ईअरबड्स त्यांच्या 20 तास चालणाऱ्या एक सुस्पष्ट श्रवणाचा अनुभव देतात. एकदा चार्ज केल्यावर तुम्ही पाच तास गाणी ऐकू शकता आणि केवळ १५ मिनिटे चार्ज केल्यावर आणखी एखादा तास गाणी तुम्हाला सहज ऐकता येतील. (हा OPPO Enco W11 रु. 2499 मध्ये Flipkart वर येथे उपलब्ध आहे.) Enco W11 तुमच्या नवीन OPPO A52शी पेअर करा आणि रु. 20,000 पेक्षाही कमी खर्चात आजच तुमचा मोबाईल एक्स्पेरिअन्स आणखी चांगला बनवा. ही संधी निघून गेली, तर आणखी स्वस्त कधी मिळणार! (Branded content)
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या