जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठी बातमी, आता पेट्रोल पंपावरच मिळेल चार्ज बॅटरी!

इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठी बातमी, आता पेट्रोल पंपावरच मिळेल चार्ज बॅटरी!

इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठी बातमी, आता पेट्रोल पंपावरच मिळेल चार्ज बॅटरी!

आईओसीने चंडीगडमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. चंदीगडमध्ये पेट्रोल पंपावर बॅटरी स्वॅपची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 जुलै : जर तुम्ही इलेक्ट्रिक कार  (Electric Vehicle) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन नियमानुसार,  ऑयल मार्केटिंग कंपन्या (OMCs) ने प्रत्येक पेट्रोल पंपावर कमीत कमी एक क्लिन एनर्जीची सुविधा देणार आहे. पेट्रोलियम मंत्रालय (Petroleum Ministry) ने दिलेल्या निर्देशानुसार पेट्रोल कंपन्यांनी प्रत्येक पेट्रोल पंपावर  चार्जिंग स्टेशन (Charging Station) लावले आहे. चार्जिंगला लागणारा वेळ पाहता कंपन्यांनी आपली रणनीती बदलली आहे. आता प्रत्येक पेट्रोल पंपावर चार्जिंग स्टेशन ऐवजी बॅटरी स्वॅप (Battery Swap) देण्याचा विचार करत आहे.  म्हणजे, या ठिकाणी बॅटरी ठेवण्याची जागा करुन देण्यात येणार आहे. या ठिकाणी एकाच आकाराच्या किंवा एकाच ब्रँडच्या एकसारख्या बॅटरी चार्ज केलेल्या असतील. तुम्हाला फक्त तुमची गाडी घेऊन आल्यावर तुमची बॅटरी देऊन तिच्या सारखीच बॅटरी गाडीत वापरण्यास मिळणार आहे. Lamborghini पहिली सुपर हायब्रिड कार लाँच, वेग 350 किमी प्रतितास आणि किंमत.. IOC, HPCL आणि BPCL या कंपन्यांनीही स्वॅप स्वीकारला चार्जिंग स्टेशन तयार करण्यासाठी जवळपास  5 लाख  रुपयांचा खर्च येतो. बॅटरी चार्ज करण्यासाठी कमीत कमी एक तासांचा वेळ लागतो. त्यामुळे इंधन कंपन्यांनी इंडियन ऑयल कॉरपोरेशन (IOC), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन (HPCL) आणि भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (HPCL) ने बॅटरी स्वॅप लावण्याचा प्लॅन आखला आहे. येत आहे BMW ix3 इलेक्ट्रिक एसयूव्ही, असा आहे लूक आईओसीने चंडीगडमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. चंदीगडमध्ये पेट्रोल पंपावर बॅटरी स्वॅपची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये वसंत विहार इथं बॅटरी स्वॅपची सुविधा देण्यात येणार आहे. या पेट्रोल पंपावर ग्राहक रिकामी झालेली बॅटरी चार्ज करू शकता. त्यामुळे ग्राहकांना इथं जास्त वेळ वाट पाहत बसावी लागणार नाही. बॅटरी चार्जिंगचे पैसे हे तिच्या साइज आणि कॅपेसिटीनुसार द्यावे लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात