मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सावधान! तुमचं प्रायव्हेट चॅट कुणी वाचत नाही ना? 2 मिनिटांत करा चेक

सावधान! तुमचं प्रायव्हेट चॅट कुणी वाचत नाही ना? 2 मिनिटांत करा चेक

सावधान! तुमचं प्रायव्हेट चॅट कुणी वाचत नाही ना? 2 मिनिटांत करा चेक

सावधान! तुमचं प्रायव्हेट चॅट कुणी वाचत नाही ना? 2 मिनिटांत करा चेक

स्कॅमर लोकांचे मोबाईल हॅक करतात आणि त्यांचा वैयक्तिक डेटा चोरतात. हा डेटा एकतर ते विकतात किंवा ब्लॅकमेल करून पैसे काढण्यासाठी त्याचा वापर करतात. म्हणूनच त्यांच्या तावडीत सापडू नये म्हणून अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 2 डिसेंबर:  सध्याच्या युगात वाढत्या डिजिटलायझेशनमुळं तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्याचा धोकाही वाढत आहे. आजकाल आपण प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईलवर अवलंबून झालो आहोत. आपण सर्वजण बहुतांश काम ऑनलाइन करतो, त्यामुळं आपली गोपनीयता आणि महत्त्वाचा डेटा धोक्यात आला आहे. कारण आजकाल सायबर गुन्हे आणि डिजिटल गुन्हे वाढत आहेत.

स्कॅमर लोकांचे मोबाईल हॅक करतात आणि त्यांचा वैयक्तिक डेटा चोरतात. हा डेटा एकतर ते विकतात किंवा ब्लॅकमेल करून पैसे काढण्यासाठी त्याचा वापर करतात. म्हणूनच त्यांच्या तावडीत सापडू नये म्हणून अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

अँड्रॉइड फोनमध्ये हॅकिंगचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत, आपल्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी, आपण नेहमी आपल्या फोनच्या परफॉर्मन्सवर लक्ष ठेवलं पाहिजे. तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही हे तुम्ही कसं शोधू शकता ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

व्हायरस पॉप-अप-

तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर अयोग्य किंवा एक्स-रेटेड जाहिरात पॉप-अप दिसल्यास, ते तुमच्या फोन हॅक झाल्याचं लक्षण असू शकतं.

अज्ञात कॉल-

तुम्हाला तुमच्या फोनवर अनोळखी कॉल्स किंवा मेसेज येत असल्यास, ते तुमचा डिव्हाइस हॅक झाल्याचं सूचित करू शकतं.

हेही वाचा: ‘या’ e-bikeनं लोकांना लावलंय वेड, अवघ्या 2 तासाच सोल्ड आउट

डेटाचा जास्त वापर-

तुमची ऑनलाइन अॅक्टिव्हिटी न वाढवता तुमचं डेटा बिल नेहमीपेक्षा जास्त येत असल्यास, तुमचा फोन हॅक झाला असण्याची शक्यता आहे आणि फसवणूक करणारा तुमच्या फोनचा डेटा बॅकग्राउंडमध्ये अॅप्स चालवण्यासाठी वापरत आहे.

बॅटरी लवकर संपणं-

फोन जसजसा जुना होईल तसतशी तुमच्या फोनची बॅटरी लाइफ कमी होत जाते, परंतु जर बॅटरी खूप वेगानं संपत असेल तर तुम्ही याकडं लक्ष द्यावं, हे देखील तुमचा फोन हॅक झाल्याचं लक्षण आहे.

खराब परफॉर्मन्स-

तुमचा फोन अ‍ॅप्स क्रॅश होणं, स्क्रीन फ्रीज होणं आणि अनपेक्षितपणे रीस्टार्ट होणं असा परफॉर्मन्स दाखवत असेल, तर ते झालेल्या डिव्हाइसचे हॅक लक्षण आहे.

अज्ञात अॅप्स-

तुमच्या डिव्हाइसवर कोणतेही अज्ञात अॅप्लिकेशन डाउनलोड होत असल्याचं तुम्हाला दिसल्यास, ते हॅकरचे काम असू शकते.

सोशल मीडियावरील अनियमित गोष्टी-

तुमच्‍या सोशल मीडियावर किंवा तुमच्‍या फोनशी लिंक असलेल्‍या ईमेल खात्‍यांवर तुमच्‍या अपरिचित घडामोडी घडत असल्‍यास, याचा अर्थ हॅकरने डिव्‍हाइसमध्‍ये प्रवेश मिळवला आहे.

फोन हॅक झाल्यास काय करावं?

  • अज्ञात एप्लिकेशन ताबडतोब डिलीट करा.
  • अँटी मालवेअर एप्लिकेशन चालवा
  • तुमचा फोन रिसेट करा
  • तुमचा फोन रिसेट करणं हा मालवेअरपासून मुक्त होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
  • आपला पासवर्ड सतत बदलत रहा.
  • हॅकर्सना वैयक्तिक डेटा गोळा करण्यापासून रोखण्यासाठी तुमच्या फोनशी लिंक केलेल्या खात्यांचे पासवर्ड बदला.
  • तुमच्या संपर्क यादीतील लोकांना सूचित करा
  • तुमच्या संपर्कांना सांगा की तुमच्या नंबरवरून येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद संदेशावर क्लिक करू नका.
  • तुमचा फोन हॅकर्सपासून वाचवण्यासाठी अनरूट करा.
  • जर तुम्ही अँड्रॉइडची रूटेड आवृत्ती वापरत असाल, तर तुम्हाला सुपरएसयू अॅप वापरून ते अनरूट करावे लागेल.

सेवा प्रदात्याशी संपर्क साधा-

तुम्ही तुमच्या फोनवर कॉल आणि मेसेज मिळणे बंद केल्यास, याचा अर्थ हॅकर क्लोन केलेले सिम कार्ड वापरत आहे.

समस्येचे निराकरण करण्यासाठी तुमच्या सेवा प्रदात्याशी संपर्क साधा. तुमचा फोन हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी, तुम्ही अज्ञात सार्वजनिक Wi-Fi शी कनेक्ट करणे, अयोग्य पॉप-अप आणि संशयास्पद जाहिरातींवर क्लिक करणे देखील टाळले पाहिजे.

First published:

Tags: Hacking, Smartphone