मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सातत्याने गाडीत AC सुरू असल्यास मायलेजवर होतो परिणाम? अशापद्धतीने करा वापर

सातत्याने गाडीत AC सुरू असल्यास मायलेजवर होतो परिणाम? अशापद्धतीने करा वापर

कार चालवताना कारमधील एसी वापरल्यामुळे गाडीचं मायलेज कमी (Effect of AC on Mileage) होत असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. मात्र, हे कितपत खरं आहे, जाणून घ्या सविस्तर.

कार चालवताना कारमधील एसी वापरल्यामुळे गाडीचं मायलेज कमी (Effect of AC on Mileage) होत असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. मात्र, हे कितपत खरं आहे, जाणून घ्या सविस्तर.

कार चालवताना कारमधील एसी वापरल्यामुळे गाडीचं मायलेज कमी (Effect of AC on Mileage) होत असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. मात्र, हे कितपत खरं आहे, जाणून घ्या सविस्तर.

मुंबई, 07 ऑगस्ट: कारचं मायलेज (Car Mileage) हा गाडी घेतानाचा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले भाव पाहता, गाडीचं मायलेज कसं वाढवता (Increase Car Mileage) येईल याकडे सर्वच जण लक्ष देत आहेत. यातच कार चालवताना कारमधील एसी वापरल्यामुळे गाडीचं मायलेज कमी (Effect of AC on Mileage) होत असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. मात्र, हे कितपत खरं आहे, जाणून घ्या सविस्तर.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण एसीशिवाय कार चालवण्याची कल्पनाही नाही करू शकत. तळपत्या उन्हात दूरचा प्रवास करण्यासाठी केवळ त्या एसीचाच आधार असतो. काही लोकांना तर कारमध्ये कायम एसी सुरूच लागतो. मात्र, आता बरेच जण असंही म्हणत आहेत, की एसीमुळे गाडीचं मायलेज कमी (Car AC drains Mileage) होतं. त्यामुळे कित्येक लोकांनी एसी वापरण्याऐवजी कारच्या खिडक्या उघड्या ठेवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, खरंच एसीमुळे गाडीचं मायलेज कमी होतं का?

एसीमुळे मायलेजवर खरंच परिणाम होतो का, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रथम कारमधील एसी कसा काम करतो (How does car AC work) ते पाहावं लागेल. गाडीतील एसीला अल्टरनेटरने एनर्जी मिळते, आणि अल्टरनेटर हे गाडीच्या इंजिनशी जोडलेले असते. म्हणजेच, एसी सुरू केल्यास गाडीच्या इंजिनवर अधिक भार येतो. गाडीचं इंजिन उर्जेसाठी फ्युअल टँकमधील फ्युअलचा वापर करते. म्हणजे एकंदरीत आपल्या कारमधील एसी हा गाडीच्या इंधनावरच चालतो. यामुळेच एसीचा जास्त वापर केल्यामुळे मायलेज कमी होत असल्याचा दावा केला जातो.

हे वाचा-लस घेतलीये? मग PVR मध्ये तुम्हाला मोफत चित्रपट पाहण्याची संधी, असं बुक करा तिकीट

ऑटो एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, यामुळे गाडीचं मायलेज कमी होत असलं, तरी ते केवळ 5 ते 7 टक्क्यांनी कमी होतं. त्यामुळे एसीचा वापर कमी करण्याची वा टाळण्याची गरज (Effects of AC on Car Mileage) नाही. उलट एसीचा वापर टाळल्यामुळे तुमच्या गाडीच्या मायलेजवर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. एसीचा वापर टाळण्यासाठी लोक बऱ्याच वेळा गाडीच्या खिडक्या उघड्या ठेवतात. गाडी वेगात असल्यावर या खिडकीमधून बाहेरची हवा मोठ्या प्रमाणात गाडीच्या आत येते. असं झाल्यामुळे गाडीवरील दबाव वाढून, पुढे जाण्यासाठी इंजिनला जास्त ताकद (Effect of Open windows on car mileage) लावावी लागते. परिणामी इंजिन जास्तीत जास्त फ्युअलचा वापर करते.

हे वाचा-WhatsApp Alert!हॅकर्स असं पाहू शकतात तुमचं चॅट; सुरक्षिततेसाठी काय आहे पर्याय

एकंदरीत, एसी बंद ठेऊन खिडक्या उघडणं हे आपल्याला जास्त तोट्यात आणू शकतं. त्यामुळे शक्यतो गाडीच्या खिडक्या बंद ठेऊन, एसीचा वापर करण्याचा सल्ला ऑटोमोबाईल एक्सपर्ट्स देतात.

First published:

Tags: Car, Tech news