नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : कोरोना काळात (Coronavirus) सिनेमागृह (Cinema Theatre) बंद आहेत. पण आता थिएटरमध्ये जावून चित्रपट पाहण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आहे. त्यात जर तुम्ही वॅक्सिन (Corona Vaccine) घेतलं असेल, तर थिएटरकडून तुमचा सन्मानही केला जाऊ शकतो. पीव्हीआर सिनेमाकडून (PVR Cinema) अशा लोकांसाठी एक जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे, ज्यांनी कोरोना वॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले आहेत. PVR अशा लोकांना मोफत मूव्ही तिकीट (PVR Free Movie Ticket) देत आहे. PVR ने या ऑफरचं नाव JAB असं ठेवलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही ऑफर वॅक्सिन घेतलेल्या व्यक्तींना अतिरिक्त तिकीट मोफत देईल. मोफत तिकीटाशिवाय, पॉपकॉर्न टबच्या खरेदीवर आणखी एक पॉपकॉर्न मोफत मिळेल. PVR ची ही JAB ऑफर 12 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही ऑफर तेलंगाना, आंध्रप्रदेश आणि पाँडिचेरी राज्यांना सोडून इतर सर्व ठिकाणी जिथे PVR ओपन करण्याची परवानगी आहे, तिथे लागू आहे.
VIDEO: फटक्यांमध्ये बंद केला iPhone 11 pro, डब्ब्याला आग लावली आणि…
मूव्ही पाहणाऱ्यांना दुसऱ्या तिकीटावर 150 रुपयांची सूट मिळेल. मोफत तिकीट मिळवण्यासाठी पीव्हीआर वेबसाईट, मोबाईल अॅप, थिएटर आणि BookMyShow वरही तिकीट बुक करता येऊ शकतं.
WhatsApp युजर्स सावधान, हॅकर्स असं पाहू शकतात तुमचं चॅट; पाहा सुरक्षिततेसाठी काय आहे पर्याय
ज्या राज्यात थिएटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिथे PVR 30 जुलैपासून सुरू करण्यात आलं आहे. तसंच कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं आहे. दिल्ली सरकारने 50 टक्के क्षमतेने थिएटर सुरू करण्याची परवानगी दिली आहे.