Home /News /technology /

आता तुमच्या Smart Devices ना 'या' स्मार्ट पद्धतींनी ठेवा सुरक्षित; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

आता तुमच्या Smart Devices ना 'या' स्मार्ट पद्धतींनी ठेवा सुरक्षित; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

आज आम्ही तुम्हाला तुमच्या स्मार्ट डिव्हाइसेसना सुरक्षित ठेवण्याच्या काही पद्धती सांगणार आहोत.

    मुंबई, 20 जुलै: आजकालच्या जगात सर्वच गोष्टी नवनवीन आणि स्मार्ट होत चालल्या आहेत. अगदी स्मार्टफोनपासून (Smartphones) तर स्मार्ट वॉचेसपर्यंत (Smart watches) सर्वकाही स्मार्ट झालं आहे. आपल्या घरी फ्रीझ (freeze), टीव्ही (TV), AC, वॉशिंग मशीन (Washing Mahine) सर्वकाही स्मार्ट आहे. मात्र या स्मार्ट डिव्हाइसेसची (Smart devices) आपण योग्यरीत्या काळजी घेतो का? या स्मार्ट डिव्हाइसेसना आपण सुरक्षित ठेवतो का? जर तुम्ही असं करत नसाल तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या स्मार्ट डिव्हाइसेसना सुरक्षित (how to protect smart devices) ठेवण्याच्या काही पद्धती सांगणार आहोत. लोकल डिव्हाईस देतील धोका तुमच्या स्मार्ट डिव्हाईसला सुरक्षित ठेवण्याचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे तुमचं डिव्हाईस हे चांगल्या आणि टिकाऊ कंपनीचं असावं. हे लोकल डिव्हाईसेस तुम्हाला धोका देऊ शकतात. तसंच लोकल डिव्हाइसेस टिकाऊ नसतात. आजकाल गुगल, यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे स्मार्ट डिव्हाईस उपलब्ध आहेत. या डिव्हाईसेसना गॅरेंटी आणि वॉरंटीही असते त्यामुळे हे दीर्घकाळ टिकून राहतात. सिंगल हॅन्ड वापर जर तुम्हाला तुमचं स्मार्ट डिव्हाईस सुरक्षित ठेवायचं असेल तर त्या डिव्हाईसला अनोळखी व्यक्तींच्या हातात लागू देऊ नका. तसंच त्यांना तुम्ही एकटेच  करा. यामुळे ते सुरक्षित राहतील आणि अधिक काळ टिकून राहतील. सायबर सुरक्षा आपल्या स्मार्ट डिव्हाईसची वेळोवेळी सर्व्हिसिंग करत राहा. जर तुमचे स्मार्ट डिव्हाईस कुठल्या ॲपच्या माध्यमातून चालत आहेत तर त्यांचं टू-फॅक्टर व्हेरिफिकेशन जरूर घ्या. तसंच  ऑनलाइन स्मार्ट डिव्हाईस खरेदी करताना पूर्ण विचारपूस करून पडताळूनच खरेदी करा. यामुळे तुमचे डिव्हाईस सुरक्षित राहतील. हे वाचा - टेलिकॉम कंपन्यांच्या कॉल्समुळे त्रस्त आहात? हे करून बघा नेहमीसाठी बंद होतील कॉल लक्षात राहील असा पवर्ड ठेवा आजकालच्या प्रत्येक स्मार्ट डिव्हाईसमध्ये पासवर्ड हा असतोच. कुठल्याही वस्तूला सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डची गरज असतेच. त्यामुळे हा पासवर्ड ठेवताना काळजीपूर्वक ठेवा. पासवर्ड सेट करताना तो सहज अनोळखी व्यक्तीला ओपन करता येणार नाही ना याची काळजी घ्या. तसंच स्वतःला नेहमी लक्षात राहील असा पासवर्ड ठेवा. तसंच नेहमी पासवर्ड बदलत राहा. यामुळे तुमच्या स्मार्ट डिव्हाईसला कोणीही खराब करणार नाही. चांगलं इंटरनेट महत्त्वाचं   इंटरनेट आणि स्मार्ट डिव्हाईसेसचा अतूट संबंध आहे. त्यामुळे जर तुम्ही स्मार्ट डिव्हाईस वापरत आहात तर तुमच्या इंटरनेटची स्पीड चांगली असणं आवश्यक आहे. तसंच तुम्ही वापरत असलेलं इंटरनेट हे सुरक्षेच्या दृष्टीनं चांगलं आहे की नाही हे बघणंहे महत्वाचं आहे. लोकल नेट वापरल्यामुळे हॅकर्स तुमच्या डिव्हाईसला हाक करू शकतात. त्यामुळे इंटरनेट चांगल्या कंपनीचं असणं आवश्यक आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Smart phone, Smartwatch, Techonology

    पुढील बातम्या