आता गुगलच स्वत: delete करणार तुमचा डेटा, आलं आहे हे नवीन फिचर

आता गुगलच स्वत: delete करणार तुमचा डेटा, आलं आहे हे नवीन फिचर

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जून : जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी गुगलने (google) आपल्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये काही नवीन बदल केले आहेत. बऱ्याचदा गुगलमध्ये आपली हिस्ट्री क्लीन करायचं राहून जातं किंवा आपण सरसकट डिलीट करायला जातो. मात्र त्याची आता कोणतीच आवश्यकता नाही. गुगलनं असं फिचर आणलं आहे ज्यामध्ये ऑटोमॅटिक गुगलचा डेटा डिलीट होणार आहे.

नवीन सेटिंग अंतर्गत आता Google 18 महिन्यांनंतर आपलं लोकेशन, हिस्ट्री आणि व्हॉइस कमांडचा डेटा ऑटो डिलीट करणार आहे. याआधी हे फिचर फोनमध्ये उपलब्ध होतंच परंतु ते आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन सुरू करावं लागत होतं. युझर्ससाठी हा पर्याय ठेवण्यात आला होता. आता अपडेटेड सेटिंगमध्ये मात्र हा पर्याय नसेल. यामध्ये ऑटोमॅटिक पद्धतीनं 18 महिन्यांनंतर डेटा डिलीट होणार आहे.

हे वाचा-'या' देशात आता करता येणार नाही Whatsapp payment, काय आहे कारण जाणून घ्या

तसेच, कंपनीने यूट्यूबसाठीही हे फिचर आणलं आहे. YouTube वरील सर्च हिस्ट्री याआधी 36 महिन्यांनी हटवली जात होती. त्याचा कालावधी कमी करून 18 महिन्यांपर्यंत असणार आहे. ज्यांच्याकडे हे फिचर आधीपासून उपलब्ध आहे आणि ते वापरत नाही अशा युझर्सना गुगलकडून सतत नोटिफिकेशन येत राहिल. ज्या युझर्सकडे हे उपलब्ध यापूर्वी नव्हते त्यांच्या फोनमध्ये ऑटो डिफॉल्ट अपडेट होताच सेट होईल अशी माहिती मिळाली आहे.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 25, 2020, 11:06 PM IST

ताज्या बातम्या