आली कोरोना स्पेशल एक सीटर स्कूटर, 75 किमीपर्यंत बघायचे काम नाही, जाणून घ्या किंमत

आली कोरोना स्पेशल एक सीटर स्कूटर, 75 किमीपर्यंत बघायचे काम नाही, जाणून घ्या किंमत

या स्कूटरमध्ये फक्त चालकालाच बसता येईल एवढी जागा आहे. एकदा पूर्ण चार्जिंग केल्यावर ही स्कूटर 75 किलोमीटर चालू शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जून : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एका खास ईलेक्ट्रानिक स्कूटर तयार करण्यात आली आहे.   जेमोपाई इलेक्ट्रिक (Gemopai Electric) ने  शुक्रवार मिनी ई-स्कूटर मिसो लाँच केली आहे. या स्कूटरची किंमत 44, 000 इतकी आहे.

जेमोपाई इलेक्ट्रिकने  मिनी स्कूटरची बुकिंग सुरू केली आहे. या स्कूटरची डिलिव्हरी पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे.

जेमोपाई इलेक्ट्रिक गोरीन ई-मोबिलिटी आणि ओपाई इलेक्ट्रिक यांच्या संयुक्त उत्पादनातून ही मिनी स्कूटर तयार करण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये फक्त चालकालाच बसता येईल एवढी जागा आहे. एकदा पूर्ण चार्जिंग केल्यावर ही स्कूटर 75 किलोमीटर चालू शकते.

लोकप्रिय Honda City आली नव्या दमात; प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या फिचर्स

या स्कूटरला 90 टक्के चार्ज करता येते.  जेमोपाई इलेक्ट्रिक के सह-संस्थापक अमित राज सिंह यांनी सांगितलं की, ‘आपण सध्या कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहोत. या परिस्थितीत व्यवसाय करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. आजच्या परिस्थितीचा विचार करून ही स्कूटर तयार करण्यात आली आहे.

ही स्कूटर चालवण्यासाठी तुम्हाला लायसन्सची गरज भासणार नाही. त्यामुळे आरटी कार्यालयात जाण्याची फेरा तुमचा वाचणार आहे. या स्कूटरचा वेग हा 25 किलोमीटर प्रति तास इतका आहे. या स्कूटरमध्ये सामान ठेवण्यासाठीही जागा देण्यात आली आहे. तुम्ही या स्कूटरमध्ये 120 किलोपर्यंत भार सहन करण्याची क्षमता आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 26, 2020, 5:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading