मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Sim Card द्वारे एका सेकंदात खाली होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट, कंगाल होण्यापासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी

Sim Card द्वारे एका सेकंदात खाली होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट, कंगाल होण्यापासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी

सिंगल क्लिकवरून आपल्या बँकिंग अ‍ॅपमध्ये लॉग इन करता येते. परंतु, याचा फायदा सायबर गुन्हेगार उचलत आहेत. सायबर गुन्हेगारांकडून सिम स्वॅप फ्रॉड करून अकाउंटमधील पैसे चोरले जात आहेत.

सिंगल क्लिकवरून आपल्या बँकिंग अ‍ॅपमध्ये लॉग इन करता येते. परंतु, याचा फायदा सायबर गुन्हेगार उचलत आहेत. सायबर गुन्हेगारांकडून सिम स्वॅप फ्रॉड करून अकाउंटमधील पैसे चोरले जात आहेत.

सिंगल क्लिकवरून आपल्या बँकिंग अ‍ॅपमध्ये लॉग इन करता येते. परंतु, याचा फायदा सायबर गुन्हेगार उचलत आहेत. सायबर गुन्हेगारांकडून सिम स्वॅप फ्रॉड करून अकाउंटमधील पैसे चोरले जात आहेत.

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर: सध्या ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य दिले जात आहे. ऑनलाइन शॉपिंग करणे, फोन बिल, लाईट बिल या बिलांचा भरणा ऑनलाइन बँकिंगचा वापर करून करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खरेदीपासून पैशांची देवाण-घेवाण ऑनलाइन पद्धतीने (Online transaction) करण्यास प्राधान्य दिले जात आहे. पण हा ऑनलाइन व्यवहार करताना त्याचे धोकेही वाढले आहेत.

मोबाइल बँकिंग (mobile banking) वापरताना तर अधिक सुरक्षित राहण्याची गरज आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून मोबाइल बँकिंगसंबंधी एक मोठा फ्रॉड (Banking Fraud) समोर आला आहे, तो म्हणजे सिम स्वॅपिंग फ्रॉड (SIM swapping fraud). लाइव्ह हिंदुस्तानने याबाबत वृत्त दिले आहे.

सध्या मोबाइल बँकिंग हे नेट बँकिंगच्या (Net Banking) तुलनेत खूपच सोपे झाले आहे. याद्वारे ग्राहक आपल्या बँक खात्यात सहज लॉगइन करू शकतात. कोणताही व्यक्ती आपल्या बँकेतील सर्व देवाण-घेवाण व्यवहारांची तपासणी करू शकते. सिंगल क्लिकवरून आपल्या बँकिंग अ‍ॅपमध्ये लॉग इन करता येते. परंतु, याचा फायदा सायबर गुन्हेगार उचलत आहेत. सायबर गुन्हेगारांकडून सिम स्वॅप फ्रॉड करून अकाउंटमधील पैसे चोरले जात आहेत.

हेही वाचा-  BMW उद्या लाँच करणार आपली पहिली Scooter, किंमत ऐकून व्हाल हैराण

 सिम स्वॅप फ्रॉड सिम कार्डला बदलणं किंवा त्याच नंबरवर दुसरे सिम कार्ड घेणं, याच्याशी संबंधित आहे. सिम स्वॅपिंगमध्ये तुमच्या मोबाइल नंबरने एक नवीन सिमचे रजिस्ट्रेशन केले जाते. त्यानंतर तुमच्या मोबाइलचे नेटवर्क गायब होते. त्यानंतर हॅकरकडील सिम कार्ड हे तुमच्या मोबाइल नंबरने चालू होते. याचाच गैरफायदा घेत हॅकर तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपी मागतो. त्यानंतर तुमच्या खात्यातील पैसे गायब केले जातात.

कसे केले जाते लक्ष्य?

सायबर गुन्हेगार फिशिंग किंवा मेलवेयरद्वारे तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि बँक अकाउंट्सचे डिटेल्स मिळवतात. त्यानंतर मोबाइल हरवणं, सिम कार्ड खराब होण्याचे कारण देऊन मोबाइल सर्व्हिस प्रोव्हाइडरला त्यांनी चोरलेले तुमचे डिटेल्स देतात. कस्टमर व्हेरिफिकेशन नंतर मोबाइल सर्व्हिस प्रोव्हाइडर ग्राहकांकडील जुन्या सिम कार्डला डिअ‍ॅक्टिव्ह करतात, व हॅकरला नवीन सिम कार्ड देतात. सायबर चोर सर्व्हिस प्रोव्हायटरला तुमची माहिती देऊन फसवणूक करतो आणि तुमच्या नंबरचं नवं सिमकार्ड तुम्हीच घेतलं आहे असं दाखवून ते त्याच्याकडे घेतो. ग्राहकांच्या फोनमधील सिम कार्ड बंद झाल्याने त्याच्या फोनला नेटवर्क येत नाही. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या फोनवर कोणताही एसएमएस, अलर्ट, ओटीपी, यूआरएन आदी माहिती मिळत नाहीत.

हे लक्षात ठेवा

सिम स्वॅपिंग फ्रॉडचा आपल्याला फटका बसू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. अलर्ट राहणं गरजेचं असून त्यासाठी मोबाइल फोनच्या नेटवर्क कनेक्टिविटीचे स्टेट्स संबंधी माहिती ठेवा. जर तुम्हाला कोणताही कॉल किंवा एसएमएस नोटिफिकिशन मिळत नसेल तर काहीतरी गडबड आहे. अशावेळी तत्काळ तुमच्या मोबाइल ऑपरेटरशी संपर्क करून माहिती घ्या. आपल्या फोनवर लागोपाठ अज्ञात नंबरवरून कॉल येत असल्यास फोनला स्विच ऑफ करू नका. फक्त तो कॉल उचलू नका. फोनला सायलेंट वर ठेवा. तसेच सातत्याने बँकेचे स्टेटमेंट आणि ऑनलाइन बँकिंग ट्रान्झेक्शन हिस्ट्री चेक करावी.

हेही वाचा-  Google कडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं असतं? जाणून घ्या कसं करतं काम

गेल्या काही महिन्यांपासून बँकिंग फ्रॉडच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. डिजिटल बँकिंग (Digital Banking) आणि ऑनलाइन ट्रान्झेक्शन करणाऱ्या लोकांवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे आपल्या बँक अकाउंटबाबत अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Money fraud, बँक