Crawlers द्वारे वेबपेज मिळाल्यानंतर Google चं सिस्टम वेगवेगळ्या पेजचा कंटेंट चेक करतो. यात फोटो, व्हिडीओ आणि वेब कंटेंट सर्व काही सामिल असतं. गुगल क्रॉल केलेलं पेज चेक करतो. यात कीवर्ड्स आणि वेबसाईट कंटेंटवर लक्ष दिलं जातं. त्याशिवाय वेबसाईट कंटेंटमध्ये किती नाविन्य आहे, कॉपी-पेस्ट तर नाही ना याचीही माहिती घेतली जाते.