नवी दिल्ली, 26 मे : तुम्ही कार, बाइक चालवत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 जून 2022 पासून कार इन्शुरन्सचा खर्च
(Motor Insurance Premium Hike) वाढणार आहे. केंद्र सरकारने बुधवारी थर्ड पार्टी मोटर व्हीकल इन्शुरन्सचा प्रीमियम रेट वाढवला आहे. आता कार इंजिननुसार अधिक रक्कम भरावी लागणार आहे.
रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करुन मोटर इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये मागील 2019-2020 साठी बदल करण्यात आला होता. कोरोना काळात यात कोणताही बदल करण्यात आला नाही. आता वेगवेगळ्या इंजिन क्षमतेसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दर
(Third Party Insurance) वाढवले जात आहेत. प्रीमियमचे नवे दर 1 जूनपासून लागू होतील.
मंत्रालयानुसार, 1000 सीसीहून कमी क्षमतावाल्या इंजिन गाड्यांसाठी थर्ड पार्टी विमा प्रीमियम 2094 रुपये ठरवण्यात आला आहे. 2019-20 मध्ये ही रक्कम 2,072 रुपये होती.
तसंच 1000 सीसी ते 1500 सीसी गाड्यांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम 3,221 रुपयांवरुन 3,416 रुपये करण्यात आला आहे.
टू-व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम -
1 जूनपासून 150 सीसी ते 350 सीसी बाइकचा प्रीमियम 1366 रुपये असेल. तर 350 सीसीहून अधिक क्षमतेच्या इंजिनचा प्रीमियम 2804 रुपये असेल.
1000 सीसी कारसाठी तीन वर्षांचा एकरकमी प्रीमियम कमीत-कमी 6521 रुपये करण्यात आला आहे. तर 1000 सीसी ते 1500 सीसीपर्यंत गाड्यांसाठी तीन वर्षांचा एकरकमी प्रीमियम 10,640 रुपये होईल. ज्या गाड्यांचं इजिन 1500 सीसी क्षमतेहून अधिक आहे, त्यांना तीन वर्षांपर्यंतचा कमीत-कमी 24,596 रुपयांचा एकरकमी प्रीमियम द्यावा लागेल.
टू-व्हीलरसाठी पाच वर्षांचा प्रीमियम -
75 सीसीहून कमी क्षमतेच्या इंजिनच्या बाइकसाठी पाच वर्षांचा सिंगल प्रीमियम 2901 रुपये आहे. तर 75 सीसी ते 150 सीसी दरम्यानच्या बाइकवर आता पाच वर्षांचा सिंगल प्रीमियम 3851 रुपये होईल.
तसंच 150 सीसीहून अधिक आणि 350 सीसीहून कमी क्षमतेच्या टू-व्हीलरसाठी आता 7,365 रुपये प्रीमियम द्यावा लागेल. तर 350 सीसीवरील टू-व्हीलरसाठी 15,117 भरावे लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.