मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Smartphone Apps: प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असायलाच हवीत 'ही' अ‍ॅप्स, तुमचं काम करतील सोपं

Smartphone Apps: प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असायलाच हवीत 'ही' अ‍ॅप्स, तुमचं काम करतील सोपं

Smartphone Apps: प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असायलाच हवीत 'ही' अ‍ॅप्स, तुमचं काम करतील सोपं

Smartphone Apps: प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असायलाच हवीत 'ही' अ‍ॅप्स, तुमचं काम करतील सोपं

Useful Apps in Android: गुगल प्ले स्टोअरवर अशी अनेक उपयुक्त अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, जी तुमचं दैनंदिन वापराचं काम सोपं करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच उपयुक्त अँड्रॉइड अ‍ॅप्सबद्दल सांगणार आहोत,.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 29 ऑगस्ट: आजच्या डिजिटल जगात स्मार्टफोन प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक झाला आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून अऩेक गोष्टी ऑनलाइन करता येतात. स्मार्टफोनवरील अ‍ॅपचा वापर करून अनेक ऑनलाइन सुविधांचा फायदा घेणं सोपं जातं. गुगल प्ले स्टोअरवर अशी अनेक उपयुक्त अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, जी तुमचं दैनंदिन वापराचं काम सोपं करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच उपयुक्त अँड्रॉइड अ‍ॅप्सबद्दल (Useful Apps in Android) सांगणार आहोत, जी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

CamScanner:

हे एक प्रकारचं फाइल स्कॅनर अ‍ॅप आहे. याचा वापर करून तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रं PDF फाईलमध्ये सेव्ह करू शकता. हे अ‍ॅप तुमचा मोबाइल पीडीएफ स्कॅनरमध्ये बदलतं. या अ‍ॅपद्वारे कॅमेऱ्याच्या मदतीनं फोटो, मार्कशीट, आधार कार्ड, पॅनकार्ट यासारखी कागदपत्रे सहज स्कॅन करता येतात. या अ‍ॅपचा वापर करून, तुम्हाला कोणतेही पैसे खर्च न करता फिजिकल स्कॅनरसारखं काम होतं. या अ‍ॅपमध्ये, तुम्हाला विविध दस्तऐवज मोड देखील मिळतात, जे तुम्ही तुमच्या सोयीनुसार वापरू शकता.

Google Files:

Google कडून येणारं Google Files हे एक उत्तम अ‍ॅप आहे. त्याच्या मदतीनं तुम्ही फाइल ट्रान्सफर, स्टोरेज मॅनेजमेंट आणि फाइल ब्राउझिंग देखील करू शकता. तुमच्या Android डिव्‍हाइसच्‍या स्‍टोरेजसाठी हे ऑल इन वन अ‍ॅपसारखे कार्य करते. याच्या माध्यमातून तुम्ही मोठ्यात मोठी फाईल सहजपणे दुसऱ्या Android डिव्हाइसेसमध्ये शेअर करू शकता. या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या फोनची मेमरी चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकता, जसे की जुन्या आणि अनावश्यक फाइल्स हटवणं, फोनमधील जंक क्लिअर करणं आणि डुप्लिकेट फाइल्स हटवणं ही कामे सहज करता येतात.

हेही वाचा- Security Tips: डबल सिक्युरिटी! सोशल मीडियासाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन आहे खूपच महत्वाचं, असं करा सुरु

Internet Speed Meter Lite:

वाढत्या डेटा रिचार्ज प्लॅनमुळे डेटा वापराकडे लक्ष देणं हे एक महत्त्वाचं काम बनलं आहे. इंटरनेट स्पीड मीटर लाइट हे काम खूप चांगल्या पद्धतीनं करतं. अ‍ॅपचा आकार 2-3 MB आहे आणि तुमच्या फोनमधील इंटरनेट स्पीडपासून ते डेटा वापरापर्यंत रेकॉर्ड ठेवतं, त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा डेटा संपण्याची चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही कमी डेटा रिचार्ज प्लॅन घेतल्यास, हे अ‍ॅप तुम्हाला चांगल्या डेटा मॅनेजमेंटसाठी मदत करू शकते. तुम्ही एका क्लिकवर तुमचा उर्वरित डेटा शिल्लक देखील तपासू शकता. त्यामुळं तुम्हाला इंटरनेट डेटा योग्यरित्या वापरण्यास सक्षम करेल.

Keep Notes:

Google Play Store वर आढळणारे Keep Notes अ‍ॅप डिजिटल डायरीसारखं काम करतं. या अ‍ॅपमध्ये तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी टिपू शकता. या अ‍ॅपमध्ये चेक लिस्टचा पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्ही किराणा सामानापासून घरातील इतर महत्त्वाची यादी बनवू शकता. हे अ‍ॅप यूजर फ्रेंडली आहे, यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगांमध्ये लिस्ट आणि नोट्स तयार करण्याचा पर्यायही मिळतो. तुम्ही Keep Notes मध्ये देखील काढू शकता. अ‍ॅपमध्ये मजकूरासह फोटो सेव्ह करण्याचा पर्याय देखील आहे.

First published:

Tags: Apps, Smartphone