मुंबई, 28 ऑगस्ट: अलीकडच्या काळात लोक सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत लोक सोशल मीडिया सोशल मीडियावर सक्रिय असतात. आजकाल मोबाईल वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा मोठ्या प्रमाणात लीक झाल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत डिजिटल जगात टिकून राहण्यासाठी सुरक्षितता आणि गोपनीयतेबाबत जागरुक राहणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक सोशल मीडिया कंपन्या त्यांच्या युजर्सची सुरक्षा आणि डेटा गोपनीयतेबाबत अनेक अपडेट्सही जारी करत आहेत. टू-स्टेप व्हेरिफिकेशन (Two Steps Verification for Social Media) हे देखील असेच एक फीचर आहे, ज्याच्या मदतीनं तुमचं सोशल मीडिया अकाउंट अतिशय सुरक्षित असेल. तुम्हीही सोशल मीडियावर सक्रिय असाल आणि तुमचं खातं सुरक्षित ठेवायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. या रिपोर्टमध्ये, आम्ही तुम्हाला सोशल मीडियाच्या टू स्टेप व्हेरिफिकेशन वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहोत आणि ते सक्रिय करण्यासाठी सोप्या स्टेप्स देखील सांगणार आहोत. चला पाहूया. टू स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे काय? टू स्टेप व्हेरिफिकेशन वैशिष्ट्यांच्या मदतीनं तुमचं खातं मोठ्या प्रमाणात सुरक्षित केलं जातं. हे तुमच्या खात्याला सुरक्षिततेचा आणखी एक अतिरिक्त स्तर प्रदान करतं, ज्यामुळे खात्याची सुरक्षा दुप्पट होते. म्हणजेच कोणी तुमचा मोबाईल हॅक केला किंवा इतर कोणतीही फसवणूक करून आयडी पासपोर्ट मिळवला, तरीही त्याला लॉगिनसाठी आणखी एक पायरी पार करावी लागेल. हेही वाचा- बनारसमध्ये लोक गुपचूप ‘या’ गोष्टी करतायत सर्च, Google Search रिपोर्टमुळे सर्वांनाच धक्का असं सुरु करा टू स्टेप व्हेरिफिकेशन-
- टू स्टेप व्हेरिफिकेशन सक्रिय करण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया खात्यावर लॉग इन करावं लागेल.
- खातं लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावं लागेल आणि सुरक्षा आणि लॉगिन पर्यायावर टॅप करावं लागेल.
- यानंतर तुम्हाला टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनवर टॅप करावं लागेल आणि त्यानंतर एडिटवर जावं लागेल.
- यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेशन पद्धत निवडावी लागेल आणि एक्टिव्ह वर टॅप करा.
- यानंतर तुमच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये टू स्टेप व्हेरिफिकेशन सक्रिय होईल.