• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • तुम्हाला Mobile वर Internet Speed किती मिळतोय? अवघ्या क्षणात सत्य सांगतील 'हे' Apps

तुम्हाला Mobile वर Internet Speed किती मिळतोय? अवघ्या क्षणात सत्य सांगतील 'हे' Apps

तुमच्या अँड्रॉइड फोनवरचा (Android) इंटरनेट स्पीड तपासण्यासाठी पाच अ‍ॅप्लिकेशन्स (App) तुम्हाला उपयोगी पडू शकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : ज्या इंटरनेट स्पीडसाठी (Internet Speed) तुम्ही खर्च करता, तेवढा स्पीड प्रत्यक्षात तुम्हाला मिळतो की नाही, याचा विचार तुम्ही कधी केलाय का? इंटरनेट स्पीड स्लो (Slow) असल्यास तुम्ही तुमच्या इंटरनेट प्रोव्हायडर कंपनीला (Internet Provider Company) फोन करून त्याचं कारण विचारू शकता. तुम्हाला असा अनुभव आला असेल, तर सातत्यानं वाय-फाय (Wi-Fi) किंवा सेल्युलर इंटरनेट स्पीडवर लक्ष ठेवलं पाहिजे. तुमच्या अँड्रॉइड फोनवरचा (Android) इंटरनेट स्पीड तपासण्यासाठी पाच अ‍ॅप्लिकेशन्स (App) तुम्हाला उपयोगी पडू शकतात. स्पीड टेस्ट बाय ओक्ला (Speed test By Ookla) : हे ओक्ला सॉफ्टवेअर अ‍ॅपल स्टोअरवरही उपलब्ध असून, ते सर्वांत विश्वसनीय आहे. हे अ‍ॅप चांगल्या पद्धतीने काम करावं यासाठी तुमच्या फोनवरून लोकेशन आणि अन्य परवानग्या देणं आवश्यक आहे. युझर्स या अ‍ॅपचं डेस्कटॉप ब्राउजर व्हर्जनही वापरू शकतात. स्पीडटेस्ट मास्टर (Speed Test Master) : तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइसवरचा इंटरनेट स्पीड तपासण्यासाठी स्पीडटेस्ट मास्टर हे एक चांगलं अ‍ॅप आहे. हे होमपेज डिस्प्लेवर डाउनलोड (Download) आणि अपलोडचा (Upload) स्पीड दर्शवतं. परंतु, यात इन-अ‍ॅप जाहिराती असतात. हे अ‍ॅप 5G, 4G,DSL आणि ADSL चा स्पीड टेस्ट करू शकतं. हे अ‍ॅप वाय-फाय अ‍ॅनालायझर म्हणूनही काम करू शकतं, असा कंपनीचा दावा आहे. 108MP कॅमेरासह Xiaomi चा 5G फोन स्वस्तात खरेदीची संधी, पाहा काय आहे ऑफर मेटिऑर (Meteor) : मेटिऑर हे अ‍ॅड-फ्री इंटरनेट स्पीड टूल आहे. याचा वापर करून मोबाइल कनेक्शनचा स्पीड (3G, 4G LTE आणि 5G नेटवर्क कनेक्शनवरील) तपासण्यांसह वाय-फायचा स्पीडही तपासता येतो. काही अ‍ॅप्स किती चांगल्या पद्धतीने ऑपरेट होतात आणि उपलब्ध स्पीडमध्ये हेतू साध्य करू शकतात का, हे पाहण्यासाठी युझर्स या अ‍ॅपचा वापर करू शकतात. इंटरनेट स्पीड टेस्ट मीटर (Internet Speed test Meter) : `टेस्ट स्पीड इंटरनेट अँड नेट मीटर`चं हे अ‍ॅप एका कलरफुल इंटरफेससह उपलब्ध आहे. या अॅपच्या मदतीनं फोनवरील वाय-फायचा डाउनलोड आणि अपलोड स्पीड जाणून घेता येऊ शकतो. युझर्स गरजेनुसार डार्क किंवा लाइट मोडमध्ये (Dark And Light Mode) हे अ‍ॅप वापरू शकतात. हे अ‍ॅप मेटिऑरसारखंच आहे. कमी स्टोअरेज आणि रॅम कॉन्फिगरेशनचा वापर करू इच्छिणारे युझर्स स्पीड टेस्ट मीटर लाइट अ‍ॅपचा वापर करू शकतात. कारण या अ‍ॅपची साइज 3MB पेक्षा कमी आहे. पत्ता शोधण्यासाठी Google Maps ओपन केलं, कपलचं अश्लील कृत्य पाहून हादरली महिला गुगल स्पीड टेस्ट (Google Speed Test) : युजर्सना कोणतंही अ‍ॅप डाउनलोड करायचं नसेल, तर त्यांच्यासाठी स्पीड टेस्टकरिता एक सोपा उपायही उपलब्ध आहे. स्मार्टफोनवर क्रोम ब्राउजरवर (Chrome Browser) जाऊन गुगल स्पीड टेस्ट सर्च करावं. त्यानंतर क्रोमवर वरच्या बाजूला तुम्हाला स्पीड दर्शवला जाईल. युझर्स अपलोड आणि डाउनलोड स्पीडसह कनेक्शन टाइमदेखील तपासू शकतात.
  First published: