मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alert! तुमच्या बँकिंग अ‍ॅपला हॅक करु शकतात हे Android Apps; असं राहा सुरक्षित

Alert! तुमच्या बँकिंग अ‍ॅपला हॅक करु शकतात हे Android Apps; असं राहा सुरक्षित

असे अनेक अ‍ॅप आहेत, जे तुमच्या बँकिंग अ‍ॅपला हॅक करू शकतात. गुगलने असेच 10 अ‍ॅप प्ले स्टोरवरुन हटवले आहेत. हे अ‍ॅप अशा युजर्ससाठी अतिशय असुरक्षित आहेत, जे आपल्या फोनमध्ये बँकिंग अ‍ॅप ठेवतात.

असे अनेक अ‍ॅप आहेत, जे तुमच्या बँकिंग अ‍ॅपला हॅक करू शकतात. गुगलने असेच 10 अ‍ॅप प्ले स्टोरवरुन हटवले आहेत. हे अ‍ॅप अशा युजर्ससाठी अतिशय असुरक्षित आहेत, जे आपल्या फोनमध्ये बँकिंग अ‍ॅप ठेवतात.

असे अनेक अ‍ॅप आहेत, जे तुमच्या बँकिंग अ‍ॅपला हॅक करू शकतात. गुगलने असेच 10 अ‍ॅप प्ले स्टोरवरुन हटवले आहेत. हे अ‍ॅप अशा युजर्ससाठी अतिशय असुरक्षित आहेत, जे आपल्या फोनमध्ये बँकिंग अ‍ॅप ठेवतात.

नवी दिल्ली, 12 मार्च : जर तुम्ही अँड्रॉईड युजर असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. असे अनेक अ‍ॅप आहेत, जे तुमच्या बँकिंग अ‍ॅपला हॅक करू शकतात. गुगलने असेच 10 अ‍ॅप प्ले स्टोरवरुन हटवले आहेत. हे अ‍ॅप अशा युजर्ससाठी अतिशय असुरक्षित आहेत, जे आपल्या फोनमध्ये बँकिंग अ‍ॅप ठेवतात. ही बाब चेक पॉईंट रिसर्चनुसार (CPR) समोर आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्सने Clast82 आणि Alienbot banker नावाचे दोन प्रोग्राम तयार केले आहेत. या दोन नव्या व्हायरस प्रोग्रामच्या मदतीने 8 हँकिंग अ‍ॅप अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत, जे युजर्सच्या फोनमध्ये असलेल्या बँकिंग अ‍ॅपवर हल्ला करत असून त्याचा वापर बँक अकाउंटमधील पैसे चोरण्यासाठी केला जात आहे.

हा व्हायरस Malwares च्या मदतीने तुमच्या फोनमध्ये येणाऱ्या वेरिफिकेशनला हॅक करतो. युजरला याबाबत कोणतीही माहिती न मिळता खात्यातून पैसे चोरी होत आहेत. Malware तुमच्या फोनमध्ये MRST इन्स्टॉल करतो, जो फोनला रिमोट अ‍ॅक्सेससाठी परवानगी देतो. त्यानंतर तुमच्या फोनपासून दूर असलेला व्यक्ती रिमोटवर याचा वापर करू शकतो.

Clast82 एक असा Malware Dropper आहे, जो तुमच्या फोनवर अ‍टॅक करतो. त्यानंतर Alienbot banker फोनमध्ये फायनान्स अ‍ॅप्समध्ये अटॅक करुन संपूर्ण महत्त्वाची माहिती चोरतो. हा Dropper काही अतिशय सामन्य असेलल्या अ‍ॅप्समध्येही मिळाला आहे. ज्यात Cake VPN, Pacific VPN, BeatPlayer, QR/Barcode Scanner MAX and QRecorder सामिल आहेत.

(वाचा - वाहनांवर स्क्रॅपिंग पॉलिसीचे सर्वसामान्यांना होणार हे 5 मोठे फायदे; पाहा डिटेल्स)

काय असतो Malware -

हे एक मॅलिशियस सॉफ्टवेयर असतं. हे सॉफ्टवेयर एक प्रोग्राम इन्स्टॉल करतं, ज्याने अनेक प्रकारचे मालवेयर जसं रॅन्समवेयरस, स्पायवेयर, ट्रोजन, वर्म्स सामिल आहेत. जे सिस्टम किंवा नेटवर्कला डॅमेज करण्यासाठी, सिस्टममधील डेटा डिलीट आणि हायजॅक करण्यासाठी डिझाईन केलं जातं.

(वाचा - Aadhaar च्या चुकीच्या वापराबाबत आता नो टेन्शन; गरजेनुसार असं करा लॉक-अनलॉक)

असं राहा सुरक्षित -

- केवळ तेच अ‍ॅप मोबाईलमध्ये ठेवा ज्याची गरज आहे.

- ज्या फोनमध्ये बँकिंग संबंधित अ‍ॅप आहेत, तो फोन लहान मुलांच्या हातात देऊ नका.

- कोणत्याही मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करु नका.

- ज्या अ‍ॅपचा वापर केला जात नाही, ते अ‍ॅप फोनमधून डिलीट करा.

First published:
top videos

    Tags: Account hacked, Finance, Money, Personal banking