मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /'जगाला आणखी एका साथीच्या रोगाचा सामना करावा लागेल' बिल गेट्स यांचा इशारा

'जगाला आणखी एका साथीच्या रोगाचा सामना करावा लागेल' बिल गेट्स यांचा इशारा

बिल गेट्स (Bill Gates) यांनी दिलेल्या एका वॉर्निंगनं सध्या संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. कोरोनानंतर जगाला निश्चितपणे आणखी एका महामारीचा (Pandemic) सामना करावा लागणार आहे, अशी धोक्याची सूचना बिल गेट्स यांनी दिली आहे.

बिल गेट्स (Bill Gates) यांनी दिलेल्या एका वॉर्निंगनं सध्या संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. कोरोनानंतर जगाला निश्चितपणे आणखी एका महामारीचा (Pandemic) सामना करावा लागणार आहे, अशी धोक्याची सूचना बिल गेट्स यांनी दिली आहे.

बिल गेट्स (Bill Gates) यांनी दिलेल्या एका वॉर्निंगनं सध्या संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. कोरोनानंतर जगाला निश्चितपणे आणखी एका महामारीचा (Pandemic) सामना करावा लागणार आहे, अशी धोक्याची सूचना बिल गेट्स यांनी दिली आहे.

  नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) सह-संस्थापक आणि अब्जाधीश समाजसेवक (Billionaire Philanthropist), बिल गेट्स (Bill Gates) यांनी दिलेल्या एका वॉर्निंगनं सध्या संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. कोरोनानंतर जगाला निश्चितपणे आणखी एका महामारीचा (Pandemic) सामना करावा लागणार आहे, अशी धोक्याची सूचना बिल गेट्स यांनी दिली आहे. सीएनबीसीशी संवाद साधताना, गेट्स यांनी नमूद केलं की नवीन साथीचा रोग कोरोना व्हायरस गटातील (Coronavirus Family) नसून वेगळ्या रोगजनकांपासून (Pathogen) तयार झालेला असेल. 'लस अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे कोविड-19 मधून जाणवणाऱ्या गंभीर आजारांचे धोके 'नाट्यमयरित्या कमी' झाले आहेत,' असंही ते म्हणाले आहेत. गेट्स यांनी यापूर्वी डिसेंबरमध्ये ओमिक्रॉन (Omicron) लाटेबाबत इशारा दिला होता.

  बिल गेट्स हे, हवामान बदल आणि जागतिक आरोग्य संकटाबद्दल 'गेट्स नोट्स' (Gates Notes) या ब्लॉगद्वारे वारंवार आपली मतं मांडत असतात. आरोग्यसेवा आणि विकसनशील राष्ट्रांमधील गरिबी कमी करण्याच्या उद्देशानं त्यांचं आणि त्यांच्या माजी पत्नीचं 'बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन' (Bill & Melinda Gates Foundation) काम करतं.

  हे वाचा - लाल, निळा की काळा? रंगाच्या आवडीवरून समजतं तुमची Personality कशी आहे

  सीएनबीसीशी केलेल्या संवाद सत्रादरम्यान, गेट्स यांनी स्पष्टपणे सांगितलं की, आपल्याकडे आणखी एक साथीचा रोग येण्याची दाट शक्यता आहे. या साथीच्या रोगाची सुरुवात एका वेगळ्या पॅथोजेनपासून (रोगजनक) होईल. भविष्यातील हा गंभीर रोग प्रामुख्यानं वृद्धत्व, लठ्ठपणा किंवा मधुमेहाशी संबंधित असू शकतो. सध्या कोरोना संसर्गाच्या गोंधळामुळे या समस्या नाट्यमयरित्या कमी झाल्याचं चित्र आहे. पण, भविष्यात येणाऱ्या नवीन महामारीमुळं या समस्या लक्षणीयरित्या वाढू शकतात. ते असंही म्हणाले, 2022 च्या मध्यापर्यंत जगातील 70 टक्के लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं डब्ल्यूएचओचं (WHO) उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता खूप उशीर झाला आहे. परंतु, सध्याची स्थिती पाहता रोगाची तीव्रता कमी होण्याची आशा आहे. आतापर्यंत जगातील सुमारे 61 टक्के लोकसंख्येला कोविड-19 लसीचा (COVID-19 Vaccine) किमान एक डोस तरी मिळालेला आहे.

  मेसेंजर आरएनए (mRNA) तंत्रज्ञानामुळं आरोग्य सेवा क्षेत्र सुधारण्यास मदत होईल, असंही गेट्स यांनी नमूद केले. 'पुढील महामारीसाठी तयार राहण्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागणार नाही. ती महामारी हवामान बदलासारखी अदृश्य आणि संथ नसेल. आपण पुढच्या वेळी नक्कीच लवकर महामारीला ओळखू शकू', असंही ते म्हणाले.

  हे वाचा - ग्राहकांनो लक्ष द्या! हे आहे वस्तूंच्या किमती 99 किंवा 999 रु. असण्याचं सीक्रेट

  ऑक्टोबर 2021 मध्ये, भारताने 100 कोटी (एक अब्ज) लसींचा टप्पा पार केल्यानंतर गेट्स यांनी भारताच्या लसीकरण मोहिमेचं (India’s Vaccination Drive) कौतुक केलं. एका ट्विटमध्ये, त्यांनी भारतीय शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. कोविड 19 साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी भारत एक स्थिर भागीदार आहे, असं गेट्स म्हणाले होते.

  अत्यंत शांत आणि अभ्यासू व्यक्तीमत्त्व, अशी बिल गेट्स यांची ओळख आहे. आता त्यांनी आणखी एका महामारीबाबत इशारा दिला आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य असेल, अशी चर्चा जागतिक स्तरावर सुरू झाली आहे.

  First published:
  top videos

   Tags: Bill gates, Covid-19, Pandemic