Home /News /money /

ग्राहकांनो लक्ष द्या! हे आहे वस्तूंच्या किमती 99 किंवा 999 रुपये असण्याचं सीक्रेट, दुकानदारांचा होतोय फायदा

ग्राहकांनो लक्ष द्या! हे आहे वस्तूंच्या किमती 99 किंवा 999 रुपये असण्याचं सीक्रेट, दुकानदारांचा होतोय फायदा

अनेक वस्तूंची किंमत 99 किंवा 999 रुपये असल्याचं आपल्या निर्दशानास येतं. काही दुकानांमध्ये तर कोणतीही वस्तू 99 रुपयांना विक्री केली जाते. यामागे संबंधित विक्रेता आणि उत्पादक कंपनीचं काय धोरण असावं?

मुंबई, 21 फेब्रुवारी: बऱ्याचदा आपण दुकानातून किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवरून (E-Commerce Website) काही खरेदी करतो. त्या वेळी अनेक वस्तूंची किंमत 99 किंवा 999 रुपये असल्याचं आपल्या निर्दशानास येतं. काही दुकानांमध्ये तर कोणतीही वस्तू 99 रुपयांना विक्री केली जाते. यामागे संबंधित विक्रेता आणि उत्पादक कंपनीचं काय धोरण असावं, असा विचार तुमच्या मनात केव्हा ना केव्हा आलाच असेल. एखाद्या वस्तूची अशी किंमत असण्यामागे खरं तर अनेक कारणं आहेत. विशेष म्हणजे याबाबत संशोधकांनी विशेष संशोधनदेखील केलं आहे. त्यात अशा किमतीचा ग्राहकांवर कसा आणि काय परिणाम होतो, व्यापारी आणि ऑनलाइन स्टोअर चालकांच्या उलाढालीवर अशा किमती किती परिणाम करतात आदी बाबींचा समावेश होता. या संशोधनातून शास्त्रज्ञांनी काही निष्कर्ष मांडले आहेत. दुकानांमध्ये किंवा ऑनलाइन साइट्सवर बहुतांश वस्तूच्या किमती (Price) 99 किंवा 999 रुपये अशा स्वरूपात लिहिलेल्या असतात. यामागे खास कारण आहे. संशोधकांच्या मते याचा परिणाम ग्राहकांच्या मानसिकतेवर (Mindset) होऊन त्यांची वागणूक बदलते आणि ते वस्तू खरेदी करतात. वस्तूच्या किमतीत 99 हा आकडा लिहिल्याने ग्राहकांचं वर्तन (Behavior) बदलतं. त्यामुळे मार्केटिंगमध्ये (Marketing) ही रणनीती अवलंबली जाते. मानसशास्त्रीयदृष्ट्याही याचे परिणाम दिसून येतात, असं संशोधनातून स्पष्ट झाल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. हे वाचा-EPS पेन्शनधारकांना मोठा दिलासा, आता कधीही जमा करता येणार Life Certificate 'लाइव्ह सायन्स'च्या अहवालानुसार, असं अनेक देशांमध्ये होत असल्याचं दिसून येतं. फ्रीड हार्डेमेन युनिव्हर्सिटीचे मार्केटिंग विभागातले प्राध्यापक ली. ई. हिब्बेट यांच्या म्हणण्यानुसार, 'कोणत्याही गोष्टीची किंमत 99 रुपये लिहिणं हे एका सिद्धांतावर आधारित आहे. माणूस नेहमी एखाद्या गोष्टीवरची माहिती उजवीकडून डावीकडे वाचत जातो. माणसाला पहिला अंक दीर्घ काळ लक्षात राहतो. त्यामुळे दुकानदार शेवटी 99 असं लिहितात, जेणेकरून ग्राहकाला किमत कमी वाटेल. उदाहरणार्थ, समजा एखाद्या वस्तूची किंमत 500 रुपये आहे, परंतु, त्यावर 499 असं लिहिलं आहे. यामुळे माणसाच्या डोक्यात त्या वस्तूची किंमत 400 रुपयांच्या टप्प्यातली राहते. 99 या संख्येकडं माणूस जास्त लक्ष देत नाही. मानसशास्त्रीयदृष्टया एखाद्या व्यक्तीला 500 रुपयांपेक्षा 499 रुपये कमी वाटतात; फरक मात्र केवळ एका रुपायाचा असतो.' हे वाचा-आता मॅगी खरेदी करताना '2 मिनिटं' विचार कराल, कॉफी प्रेमींनाही बसणार धक्का हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या अहवालानुसार, वस्तूंची 99 रुपये किंमत असल्याचा दुकानदारास आणखी एक फायदा होतो. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने 599 रुपयांची वस्तू किंवा सामान खरेदी केलं, तर कॅश पेमेंट (Cash Payment) करताना तो 600 रुपये देतो. बहुतांश दुकानदार ग्राहकाला एक रुपया परत देत नाहीत. तसंच ग्राहकही एक रुपया परत मागत नाही. काही दुकानदार एक रुपयाच्या बदल्यात चॉकलेट देतात. यामुळे दुकानदाराचा एक रुपया वाचतो. तसंच या माध्यमातून तो दुसरं प्रोडक्टही विकतो. अशा पद्धतीनं एक-एक रुपया वाचवून दुकानदार नफा कमावतो. तसंच सेलमध्ये वस्तूंची किंमत 99 रुपये ठेवली जाते. जे ग्राहक वस्तू खरेदी करताना किमतीकडे जास्त लक्ष देतात, त्यांना 99 रुपयांचा प्राइस टॅग पाहून आपण कमी किमतीत वस्तू खरेदी करत असल्याचं समजतं, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
First published:

Tags: Online shopping, Shopping

पुढील बातम्या