नवी दिल्ली, 27 मार्च : एखाद्या सलून मालकाकडे 378 लग्जरी कार असणं ही बाब न पटण्यासारखी वाटू शकते. परंतु हे खरं असून एका सलून चालवणाऱ्या व्यक्तीकडे तब्बल 378 कार्स आहेत. या लग्जरी कार्समध्ये Rolls-Royce, Audi, BMW, Jaguar अशा कार्सचा समावेश आहे. इतक्या महागड्या गाडया असूनही या लग्जरी कार्सचे मालक आजही लोकांचा हेअर कटसाठी सलूनमध्ये काम करतात. आता तुम्हाला वाटेल, हेअर कटिंगसाठी ते मोठी रक्कम आकारत असतील, पण एका हेअर कटसाठी ते केवळ 150 रुपये घेतात. 378 लग्जरी कार्स असणाऱ्या या व्यक्तीचं नाव रमेश बाबू असून ते बंगळुरू येथे राहतात. 1993 मध्ये खरेदी केली पहिली कार - रमेश यांनी त्यांच्या खासगी वापरासाठी 1993 मध्ये मारुती ओमनी व्हॅन खरेदी केली होती. या कारसाठी त्यांनी बँकेतून कर्ज घेतलं होतं. या कारसाठीचा हप्ता भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. पण त्यानंतर त्यांनी असं काही काम केलं की, आज त्यांच्याकडे 378 लग्जरी कार्स आहेत.
(वाचा - 4 कोटींची कार खरेदी करण्यासाठी 1 वर्ष वाट पाहिली,डिलिव्हरीच्या 6 तासांत चक्काचूर )
रमेश बाबू यांनी आपल्या करियरमधील पहिली नोकरी लोकांकडे वर्तमानपत्र टाकण्याची केली होती. त्यांची आई इतरांच्या घरी घरकाम करायची, जेणेकरुन त्यांना शिक्षण दिलं जाईल. रमेश बाबू यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे पहिल्या कारच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी पैसे नव्हते, त्यावेळी नंदिनी आंटीने त्यांना एक सल्ला दिला. त्यांची कार भाड्याने चालवण्याचा सल्ला नंदिनी आंटीने दिला होता. त्यानंतर रमेश बाबू यांनी हेअर सलूनसह, कार भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्याच व्यवहारातून त्यांच्याकडे आज 378 लग्जरी कार्स आहेत.
(वाचा - पुढील वर्षापासून बदलणार टोल कलेक्शनची प्रक्रिया, तुमच्यावर काय परिणाम होणार )
लवकरच खरेदी करणार ही कार - रमेश बाबू लवकरच आपल्या कार्सच्या यादीमध्ये stretch limousine कार सामिल करू इच्छितात. या कारची किंमत जवळपास 8 कोटी रुपये आहे. तसंच रमेश बाबू त्यांच्या Rolls-Royce कारसाठी एका दिवसाचं 50 हजार रुपये भाडं घेतात. त्यांना अनेक कार्सची मॉडेल ठेवायची आहेत, जेणेकरुन कोणताही कस्टमर कधी निराश होऊ नये.