मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

मोदी सरकारचा मोठा निर्णय; TikTok सह इतर चायनिज अ‍ॅप्सवरील बंदी कायम राहणार

मोदी सरकारचा मोठा निर्णय; TikTok सह इतर चायनिज अ‍ॅप्सवरील बंदी कायम राहणार

गेल्या वर्षी जूनमध्ये भारताने 59 चायनिज अ‍ॅप्सवर (India Bans 59 Chinese Apps) बॅन लावला होता. यात टिकटॉक आणि यूसी ब्राउजरसारखे अ‍ॅप्स सामिल होते.

  नवी दिल्ली, 24 जानेवारी : शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप टिकटॉकसह (TikTok) इतर चायनिय अ‍ॅप्सवर असलेला बॅन सुरूच राहणार आहे. भारत सरकारने याबाबत सर्व अ‍ॅप्सला नोटिस पाठवली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मिनिस्ट्रीने (Ministry of Electronics and IT) ब्लॉक्ड अ‍ॅप्सच्या उत्तरांची समिक्षा केल्यानंतर हा निर्णय घेत, नोटिस पाठवली आहे. टिकटॉकने संपर्क केल्यानंतर, सरकारने बॅनबाबत त्यांना नोटिस पाठवल्याचं सांगितलं आहे. टिकटॉकच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, आम्ही नोटिशीचं मूल्यांकन करत असून त्यानंतर उत्तर देऊ. भारत सरकारकडून 29 जून 2020 रोजी जारी करण्यात आलेल्या निर्देशांचं पालन करणारी टिकटॉक पहिल्या कंपन्यांपैकी एक होती. आम्ही सतत स्थानिय कायदे आणि नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसंच सरकारच्या कोणत्याही समस्येचं समाधान करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत. आमच्या सर्व युजर्सची गोपनीयता आणि सुरक्षा सुनिश्चित करणं ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

  (वाचा - बापरे! बॅन होऊन अद्यापही वापरलं जातंय TikTok,भारतीयांकडून होतोय या Appचा वापर)

  गेल्या वर्षी जूनमध्ये भारताने 59 चायनिज अ‍ॅप्सवर (India Bans 59 Chinese Apps) बॅन लावला होता. यात टिकटॉक आणि यूसी ब्राउजरसारखे अ‍ॅप्स सामिल होते. सरकारने इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अ‍ॅक्टच्या सेक्शन 69ए अंतर्गत या 59 चायनिज अ‍ॅप्सवर बॅन लावला होता. या अ‍ॅप्सच्या काही हालचालींमुळे भारताच्या सुरक्षा, संरक्षण, सार्वभौमत्व आणि अखंडततेसाठी हानिकारक असल्याचं सरकारने सांगितलं होतं. या 59 अ‍ॅप्सनंतर सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पुन्हा 118 इतर अ‍ॅप्सवरही बॅन लावला होता. दरम्यान, टिकटॉक बॅन केल्यानंतरही डिसेंबर 2020 मध्ये भारतात सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या तुलनेत टिकटॉकवर सर्वाधिक युजर्स अ‍ॅक्टिव्ह होते. महत्त्वाची बाब म्हणजे, बॅन असनूही ऑगस्ट आणि ऑक्टोबरदरम्यान, अ‍ॅपच्या मासिक अ‍ॅक्टिव्ह युजर्समध्ये वाढ झाली आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Tiktok

  पुढील बातम्या