LockDown मध्ये केंद्राचा मोठा निर्णय, BSNLच्या ग्राहकांना रिचार्ज संपला तरी मिळणार 'ही' सेवा

LockDown मध्ये केंद्राचा मोठा निर्णय, BSNLच्या  ग्राहकांना रिचार्ज संपला तरी मिळणार 'ही' सेवा

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या कोट्यवधी प्रीपेड युजर्सना दूरसंचार मंत्रालयानं मोठा दिलासा दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मार्च : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या कोट्यवधी प्रीपेड युजर्सना दूरसंचार मंत्रालयानं मोठा दिलासा दिला आहे. केंद्रिय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बीएसएनएल प्रीपेड सिम कार्ड युजर्सचे नंबर 20 एप्रिलपर्यंत रिचार्ज न करताही चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच या युजर्सना 10 रुपयांचा बॅलन्ससुद्धा इंसेंटिव्ह म्हणून देण्यात येणार आहे.

देशात लॉकडाउन अस्लयामुळे ही घोषणा करण्यात आली आहे. हा आदेश बीएसएनएलच्या प्रत्येक टेलिकॉम सर्कलमधील प्रीपेड युजर्ससाठी असेल. रविशंकर प्रसाद म्हणाले की, लोक त्यांच्या कुटुंबियांशी 20 एप्रिलपर्यंत कनेक्ट रहावेत यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

याआधी इतर टेलिकॉम कंपन्यांना ट्रायने आदेश दिले होते. ज्या प्रीपेड युजर्सची वॅलिडिटी लॉकडाउनवेळी संपली आहे त्यांची मुदत वाढवण्यात यावी. ट्रायने Jio, Vodafone-idea आणि Airtel या कंपन्यांना सांगितलं आहे की, युजर्सना 21 दिवसांच्या लॉकडाउनवेळी सेवा कोणत्याही अडचणींशिवाय मिळावी. ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना यासाठी त्यांच्या पद्धतीनं पावलं उचलण्यास सांगितलं आहे.

हे वाचा : भारतात WhatsApp युजर्सवर निर्बंध, कोरोनामुळे आता वापरावर अशा मर्यादा

ट्रायने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये टेलिकॉम कंपन्यांना आदेश दिला आहे की, युजर्सना लॉकडाउनच्या काळात कनेक्टिव्हिटीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. दूरसंचार ही लोकांची गरजेची सेवा असून त्यात कोणताही खंड पडू नये असं म्हटलं आहे. मात्र अद्याप टेलिकम्युनिकेशन कंपन्यांकडून यावर उत्तर देण्यात आलेलं नाही.

हे वाचा : Jio, Vodafone, Airtel ची बंपर ऑफर, डेली 1.5 GB ऐवजी मिळणार 3 GB डेटा

First published: March 30, 2020, 5:44 PM IST

ताज्या बातम्या