Home /News /technology /

भारतात WhatsApp युजर्सवर निर्बंध, कोरोनामुळे आता वापरावर अशा मर्यादा

भारतात WhatsApp युजर्सवर निर्बंध, कोरोनामुळे आता वापरावर अशा मर्यादा

कोरना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगच थांबल्यासारखं झालं आहे. अनेक लोक घरी राहूनच ऑफिसचं काम घरी राहून करत आहेत. त्यामुळे सध्या WhatsApp चा वापर खूप वाढला आहे.

कोरना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगच थांबल्यासारखं झालं आहे. अनेक लोक घरी राहूनच ऑफिसचं काम घरी राहून करत आहेत. त्यामुळे सध्या WhatsApp चा वापर खूप वाढला आहे.

LockDown ची घोषणा झाल्यानंतर लगेचच व्हॉटसअॅपने युजर्सवर निर्बंध घातले आहेत. आता स्टेटसला 30 सेकंदाचे व्हिडिओ पोस्ट करता येत नाहीत.

    मुंबई, 30 मार्च : Coronavirus मुळे देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. यामुळं लोक घरातचं बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत जगाशी संपर्क साधण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. याचा परिणाम इंटरनेट स्पीडवर होत आहे. इंटरनेटवर वाढलेला लोड कमी करण्यासाठी युट्यूब, नेटफ्लिक्स यांसह अनेक वेबसाइटनं बिटरेट आणि कमी रिझोल्यूशनमध्ये सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. दरम्यान, व्हॉटसअॅपनेही त्यांच्या एका फीचरमध्ये मोठा बदल केला आहे. भारतीय युजर्सवर हे निर्बंध असून आता स्टेटसला फक्त 15 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करता येणार आहे. WABetaInfo ने व्हॉटसअॅपमध्ये झालेल्या बदलांची माहिती दिली आहे. यामुळे युजर्सना 15 सेकंदापेक्षा जास्त वेळेचा व्हिडिओ स्टेटसला शेअर करता येणार नाही. याआधी स्टेटसला 30 सेकंदापर्यंतचा व्हिडिओ ठेवता येत होता. जर तुम्ही मोठा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न केलात तर त्यापूर्वी एक नोटिफिकेशन येतं. माय स्टेटसला पाठवण्यात येणारे व्हिडिओ पहिल्या 15 सेकंदापर्यंत ट्रिम केले जातील. याआधी जेव्हा व्हिडिओ स्टेटसला ठेवता यायचा तेव्हा व्हिडिओतील हवा तेवढा भाग पोस्ट करता येत होता. मात्र आता कोणताही व्हिडिओ पोस्ट केलात तरी त्याचे फक्त 15 सेकंदच दिसतील. हे वाचा : Jio ची धमाकेदार ऑफर! 21 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार डबल डेटा सर्व्हरवर येणारा लोड कमी करण्याच्या दृष्टीने 15 सेकंदाच्या व्हिडिओ स्टेटसचं पाउल उचलण्यात आलं आहे. यानंतर अद्याप व्हॉटसअॅपने अधिकृत काही सांगितलेलं नाही. मात्र सध्याच्या या बदलामुळे युजर्स नाराज आहेत. आधीच 30 सेकंदाची मर्यादा असताना त्यात आणखी घट केली आहे. हे वाचा : Jio, Vodafone, Airtel ची बंपर ऑफर, डेली 1.5 GB ऐवजी मिळणार 3 GB डेटा
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus, Whatsapp

    पुढील बातम्या