नवी दिल्ली, 29 मार्च : लॉकडाउनमुळे देशात सर्वच लोक घरात बसून आहेत. यामध्ये स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. लॉकडाउनच्या काळात ग्राहकांना असलेली इंटरनेटची गरज पाहता टेलिकॉम कंपन्यांनी युजर्ससाठी अनेक ऑफर दिल्या आहेत. यात दररोज 3जीबी पर्यंत डेटा दिला जात आहे. ब्रॉडबँड कनेक्शन नसलेल्या लोकांसाठी हे प्लॅन खुप फायद्याचे ठरत आहेत.
सर्वात स्वस्त सेवा पुरवणाऱ्या जिओने 251 रुपयांचा प्लॅन दिला आहे. यात 51 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा मिळतो. यात कॉलिंग किंवा एसएमएसची सेवा मिळत नाही. जिओचा डेली 3 जीबी डेटाचा प्लॅनही आहे. यासाठी 349 रुपयांचा प्लॅन दिला असून या डेली 3 जीबी डेटा, 100 एसएमएस दिले जात आहेत. याशिवाय जिओ नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंगही दिलं जात आहे. तसंच जिओ अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन मिळत आहे.
व्होडाफोनच्या ग्राहकांसाठीही दररोज 3 जीबी डेटाचा प्लॅन आहे. 398 रुपयांचा असलेला हा प्लॅन 28 दिवसांसाठी असून यात कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग करता येतं. तसंच व्होडाफोन प्ले आणि झी 5 चे सबस्क्रिप्शनही फ्री मिळतं. याशिवाय 249, 399 आणि 599 रुपयांच्या प्लॅनवर डबल डेटा ऑफर दिली आहे. याआधी तीनही प्लॅनमध्ये डेली दीड जीबी डेटा मिळत होता. त्याऐवजी 3 जीबी डेटा मिळेल. त्यांची व्हॅलिडीटी मात्र कोणताच बदल नाही.
हे वाचा : LockDown मध्ये Airtel ची ऑफर, ग्राहकांना 'ही' सेवा फ्री
एअरटेलनं 398 आणि 558 रुपयांचे प्लॅन दिले आहे. यात 398 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांसाठी असून यामध्ये 3 दीबी डेटा, 100 एसएमएस दररोज मिळत आहेत. तसंच अनलिमिटेड कॉलिंगही करता येणार आहे. एअरटेलचा दुसरा प्लॅन 558 रुपयांचा आहे. त्यावर दररोज 3 जीबी डेटा 56 दिवसांसाठी मिळणार आहे. याशिवाय दोन्ही प्लॅनवर एअरटेल एक्सट्रीम आणि विंक म्यूझिकचे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल. तसंच ग्राहकांना फास्टॅगच्या खरेदीत 150 रुपयांची सूटही मिळणार आहे.
हे वाचा : जिओच्या ग्राहकांसाठी 498 रुपयांचा रिचार्ज फ्री? व्हायरल होतोय मेसेज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.