Home /News /technology /

'ही' सिमकार्ड्स आजपासून होणार बंद, यामध्ये तुमचा नंबर तर नाही ना? वाचा काय आहे कारण

'ही' सिमकार्ड्स आजपासून होणार बंद, यामध्ये तुमचा नंबर तर नाही ना? वाचा काय आहे कारण

सिमकार्ड बद्दलचीच एक महत्त्वाची बातमी आहे. काही जणांचं सिमकार्ड आजपासून (20 जानेवारी 22) बंद होणार आहे. याचं कारण आहे 7 डिसेंबर 2021 रोजी देण्यात आलेला एक आदेश.

मुंबई, 20 जानेवारी: मोबाईलमध्ये (Mobile) सगळ्यात महत्त्वाचं असतं ते सिम कार्ड. या सिम कार्डमुळेच तर मोबाईल नंबर कळू शकतो. सिमकार्ड बद्दलचीच एक महत्त्वाची बातमी आहे. काही जणांचं सिमकार्ड आजपासून (20 जानेवारी 22) बंद होणार आहे. याचं कारण आहे 7 डिसेंबर 2021 रोजी देण्यात आलेला एक आदेश. जास्तीचं सिमकार्ड वापरणाऱ्यांची सवलत बंद करण्याचा आदेश दूरसंचार विभागाच्या वतीने देण्यात आला होता. एका युजरकडे नऊपेक्षा जास्त सिमकार्ड असतील तर त्याला रि-व्हेरिफिकेशन (Re- verification) करावं लागणार आहे. या आदेशानुसार ते आता बंधनकारक आहे. त्यासाठी 45 दिवसांची मुदत देण्यात आली होती. आता आज म्हणजे 20 जानेवारी 2022 रोजी ही मुदत संपत आहे. त्यामुळे ज्या सिमचं व्हेरिफिकेशन (Sim Verification) झालेलं नाही अशा 9 पेक्षा जास्त सिम कार्ड वापरणाऱ्या लोकांची आउटगोईंग कॉलची सुविधा आता बंद होणार आहे. दूरसंचार विभागानं टेलिकॉम ऑपरेटर्सना (Telecom Operators) हा आदेश दिला होता. व्हेरिफिकेशन न करण्यात आलेल्या 9 पेक्षा जास्त सिमकार्ड वापरणाऱ्या युजर्सचे आऊटगोईंग कॉल्स 30 दिवसांत आणि इनकमिंग कॉल 45 दिवसांत बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचबरोबर 60 दिवसांत पूर्ण सिमकार्डच बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे वाचा-108 MP कॅमेरासह Xiaomi 11T Pro लाँच, पहिल्याच सेलमध्ये मिळेल 10 हजारांची सूट भारतातील कोणताही नागरिक एकावेळेस 9 सिमकार्ड वापरु शकतो. तर जम्मू काश्मीर आणि पूर्वेकडील राज्यांसाठी 6 सिम कार्ड वापरण्याची मर्यादा आहे. नवीन नियमांनुसार एका आयडीवरून 9 पेक्षा जास्त सिम कार्ड वापरणं बेकायदेशीर असेल. ऑनलाईन फ्रॉड किंवा नको असलेल्या कॉल्सच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मीडिया अहवालांनुसार, परदेशात असलेल्या व्यक्ती, आजारी आणि अपंग लोकांसाठी 30 दिवसांची जास्त मुदत देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. लोकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. हे वाचा-Paytm Share 990 रुपयांच्या नीचांकी पातळीवर; गुंतवणूकदारांना मोठा झटका! कायदा अंमलबजावणी विभागाकडून किंवा बँक किंवा एखाद्या अन्य अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्थेकडून एखाद्या मोबाईल नंबरच्या विरोधात तक्रार आली तर अशा सिमकार्डचे आऊटगोईंग कॉल्स 5 दिवसांत आणि इनकमिंग कॉल्स 10 दिवसांत बंद करावे असं या आदेशात म्हटलं आहे. तर सर्व प्रकारच्या सिमकार्ड सेवा 15 दिवसांत बंद करण्यात येतील. तेव्हा जागरुक राहा, गरज नसताना किंवा कुणाच्या म्हणण्यावरून जास्तीची सिम कार्ड स्वत:च्या नावावर घेऊ नका. एखाद्या कॉलबद्दल शंका आली तर ताबडतोब तक्रारही करा.
First published:

Tags: Telecom, Telecom companies, Telecom service

पुढील बातम्या