मराठी बातम्या /बातम्या /मनी /Paytm Share 990 रुपयांच्या नीचांकी पातळीवर; गुंतवणूकदारांना मोठा झटका! तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Paytm Share 990 रुपयांच्या नीचांकी पातळीवर; गुंतवणूकदारांना मोठा झटका! तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Paytm

Paytm

डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी असलेल्या पेटीएमच्या (Paytm Share Latest Update) शेअरमधली घसरण अद्यापही कायम असून, आज (19 जानेवारी ) तर या शेअरनं 990 रुपयांची नीचांकी पातळी (Paytm Share All time Low) गाठली.

  मुंबई, 19 जानेवारी: डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी असलेल्या पेटीएमच्या (Paytm Share Latest Update) शेअरमधली घसरण अद्यापही कायम असून, आज (19 जानेवारी ) तर या शेअरनं 990 रुपयांची नीचांकी पातळी (Paytm Share All time Low) गाठली. देशातला सर्वांत मोठा आयपीओ (Largest IPO) असा गाजावाजा करून शेअर बाजारात पदार्पण केलेल्या या कंपनीला गुंतवणूकदारांचा अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नाही आणि नोंदणीपासूनच हा शेअर सतत दबावाखालीच राहिला. आयपीओमध्ये 2150 रुपये इतकी किंमत असणाऱ्या या शेअरची किंमत आता तब्बल 54 टक्क्यांनी खाली आली आहे.

  बुधवारच्या सत्रात, पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आणि तो 1000 रुपयांच्या खाली आला. दिवसअखेर हा शेअर 990 रुपयांच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला. पेटीएमच्या शेअरमध्ये गेल्या 12 पैकी 11 सत्रांमध्ये घसरणच नोंदवली गेली आहे. या कालावधीत त्याच्या मूल्यात 26 टक्क्यांनी घट झाली आहे.

  हे वाचा-Budget 2022 नंतर सोनंखरेदीसाठी राहा तयार! Gold Rate कमी होण्याचे संकेत

  वन 97 कम्युनिकेशन्स (One 97 Communications) ही पेटीएमची मूळ कंपनी आहे. आयपीओद्वारे या कंपनीने 2.5 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 18 हजार 800 कोटी रुपये उभे केले. परंतु नोव्हेंबरमध्ये त्यात 27 टक्क्यांनी घट झाली होती. शेअर बाजारात नोंदणीकृत होण्यापूर्वी पेटीएमचं बाजारमूल्य 1.39 लाख कोटी रुपये होतं; मात्र आता हा शेअर 990 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आल्यानंतर त्याचं बाजारमूल्य सुमारे 70 हजार कोटी रुपयांच्या खाली आलं आहे. या शेअरमधल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.

  मॅक्वेरी कॅपिटल (Macquarie Capital) या परदेशी शेअर ब्रोकर कंपनीनं पेटीएमच्या शेअरमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केल्यानं, 14 जानेवारी रोजी गुंतवणूकदारांनी या शेअरची विक्री करण्यावर भर दिल्यानं यात घसरण होऊन तो 995 रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर त्यात थोडी सुधारणा झाली होती; पण ती अल्पकाळच टिकली आणि पुन्हा यात घसरणीचं सत्र सुरू राहिलं.

  हे वाचा-पगारधारकांना Budget 2022 मध्ये मिळणार गिफ्ट? अशा आहेत या वर्गाच्या अपेक्षा

  पेटीएमच्या शेअरचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जीसीएल सिक्युरिटीजचे (GCL Securities) रवी सिंघल यांनी हा शेअर 800 आणि 666 चा स्टॉपलॉस लावून 1300-1700 च्या लक्ष्यासाठी खरेदी करावा, अशी शिफारस केली आहे. पायपर सेरिकाचे अभय अग्रवाल यांच्या मते, 'जगभर तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव दिसून येत आहे. या कंपन्या अजूनही नफ्यात आलेल्या नाहीत. त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत आहे. त्यामुळे पेटीएम शेअरवरही दबाव कायम राहील असा अंदाज आहे.'

  First published:

  Tags: Paytm, Paytm Money, Paytm offers, Share market