Airtel युजर्ससाठी कंपनीची घोषणा; आता फ्रीमध्ये मिळणार ही सुविधा

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही ऑफर काही ठराविक ग्राहकांनाच देण्यात येणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही ऑफर काही ठराविक ग्राहकांनाच देण्यात येणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 3 नोव्हेंबर : टेलिकॉम कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यासाठी अनेक प्लानसह, आपल्या ग्राहकांना नवं-नव्या सर्विसेजचीही घोषणा करत असतात. याचदरम्यान, एयरटेलने (Airtel) आपल्या ग्राहकांसाठी एका नव्या सुविधची घोषणा केली आहे. आता Airtelने ग्राहकांना Disney+ Hotstar VIP सब्सक्रिप्शन देण्यास सुरुवात केली आहे. खास बाब म्हणजे, ही सर्व्हिस मोबाईल सर्व्हिससह एयरटेल ब्रॉडब्रँड प्लानसोबतही Disney+ Hotstar VIP सब्सक्रिप्शन देत आहे. एयरटेल वेबसाईटनुसार, या नवीन सुविधेचा फायदा 499 रुपयांच्या पोस्टपेड किंवा 999 रुपयांच्या ब्रॉडब्रँड प्लान युजर्सला, या ऑफरचा फायदा मिळणार आहे. (वाचा - चिनी PUBG अखेर भारतातून 'आऊट'; कंपनीनं गुंडाळला आपला गाशा) एयरटेल 499 पोस्टपेड प्लान - एयरटेलच्या 499 रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये 75 जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS मिळतात. यात अमेझॉन प्राईम आणि एयरटेल एक्सट्रीम मेंबरशिपही दिली जाते. (वाचा - 'Despacito' ही पडलं मागे! 700 कोटी रेकॉर्डब्रेक व्ह्यूज असणारा VIDEO पाहिला का?) कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही ऑफर काही ठराविक ग्राहकांनाच देण्यात येणार आहे. जर तुम्ही एयरटेल पोस्टपेड किंवा ब्रॉडब्रँड ग्राहक आहात, आणि तुम्हाला Disney+ Hotstar VIP फ्री मेंबरशिप मिळाली आहे की नाही हे जाणून घ्यायचं असल्यास, एयरटेल थँक्स ऍपवर जावं लागेल. प्रत्येक पोस्टपेड आणि ब्रॉडब्रँड प्लानसाठी ग्राहक केवळ एकदाच या फ्री ऑफरचा फायदा घेऊ शकतो.

    (वाचा - घरबसल्या 10 मिनिटांत फ्रीमध्ये बनवा Pan Card; जाणून घ्या प्रक्रिया)

    Published by:Karishma Bhurke
    First published: