'Despacito' देखील पडलं मागे! 700 कोटी रेकॉर्डब्रेक व्ह्यूज असणारा VIDEO तुम्ही पाहिला का?

हे गाणं अँटी पँडेमिक सर्व्हिस म्हणून देखील वापरलं गेलं. या गाण्याची चाल वापरून Wash Your Hands हे गाणं लहान मुलांसाठी तयार करण्यात आलं होतं. यामध्ये लहान मुलांना हात धुणं आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला होता.

हे गाणं अँटी पँडेमिक सर्व्हिस म्हणून देखील वापरलं गेलं. या गाण्याची चाल वापरून Wash Your Hands हे गाणं लहान मुलांसाठी तयार करण्यात आलं होतं. यामध्ये लहान मुलांना हात धुणं आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला होता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : युट्युबवर 'बेबी शार्क' (Baby Shark) हा सर्वात लोकप्रिय व्हिडीओ ठरला आहे. युट्युबवरील सर्वांत जास्त पहिला जाणारा व्हिडीओ म्हणून आता बेबी शार्क या व्हिडीओची नोंद झाली आहे. काल Baby Shark ने सर्व व्हिडीओला मागे टाकत पहिल्या स्थानी पोहचला आहे. लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेला हा व्हिडीओ दक्षिण कोरियामधील (South Korea) एका कंपनीने तयार केला आहे. अतिशय सुमधुर मेलडी आणि कलरफुल व्हिडिओमुळे लहान मुलं आणि त्यांच्या पालकांमध्ये हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. 'Baby Shark Dance' या नावाने असलेल्या या इंग्लिश गाण्याचे सोमवारी (2 नोव्हेंबर 2020) 4 वाजेपर्यंत 7 कोटींहून अधिक व्ह्यूज झाले आहेत. याआधी Luis Fonsi आणि Daddy Yankee's यांचा 'Despacito' हा युट्युबवरील सर्वाधिक पहिला जाणारा व्हिडीओ होता. (वाचा - स्टेशन सोडून हवेत निघाली मेट्रो, अपघात होणार तेवढ्यात समोर आला व्हेल मासा आणि..) जून 2016 मध्ये पहिल्यांदा हा व्हिडीओ युट्युबवर अपलोड करण्यात आला होता. अमेरिकन गाणं कॅम्पफायर या गाण्याचं हे रिमिक्स गाणं असून दक्षिण कोरियाच्या सेऊलमधील पिंकफोंग या कंपनीने तयार केलं आहे. या व्हिडिओला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली असून त्याने जानेवारी 2019 मध्ये Billboard Hot 100 गाण्यांमध्ये 32वा क्रमांक पटकावला होता. हे गाणं लहान मुलांमध्येच नव्हे, तर मोठ्यांमध्ये देखील लोकप्रिय झालं आहे. वॉशिंग्टन नॅशनल बेसबॉल टीमने हे गाणं आपलं थीम साँग म्हणून निवडलं आहे. त्यांनी मागच्या वर्षी वर्ल्ड सिरीज जिंकल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये सेलिब्रेशनवेळी हे गाणे लावून आनंद साजरा केला होता.

  (वाचा - बँक खात्यात पैसे जमा करताना, काढताना लागणार चार्ज? वाचा काय आहे यामागचं सत्य)

  दरम्यान, अमेरिकेतील एका गावाने हे गाणं लूप म्हणून वाजवलं, तर दुसरीकडे फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीचने बेघर लोकांना सार्वजनिक ठिकाणी जमण्यापासून परावृत्त करण्यासाठी हे गाणं वाजवलं. त्याचबरोबर हे गाणं अँटी पँडेमिक सर्व्हिस म्हणून देखील वापरलं गेलं. या गाण्याची चाल वापरून Wash Your Hands हे गाणं लहान मुलांसाठी तयार करण्यात आलं होतं. यामध्ये लहान मुलांना हात धुणं आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला होता. युट्युबवर सर्वांत लोकप्रिय असणाऱ्या चार गाण्यांमध्ये दोन गाणी ही दक्षिण कोरियाची असून यामध्ये rapper Psy's megahit याचं 'Gangnam Style' हे गाणं तीन वर्षं पहिल्या क्रमांकावर होतं. त्यानंतर Wiz Khalifa याच्या 'See You Again' या गाण्यानी पहिला क्रमांक पटकावला.
  Published by:Karishma Bhurke
  First published: