मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

चिनी PUBG अखेर भारतातून 'आऊट'; कंपनीनं गुंडाळला आपला गाशा

चिनी PUBG अखेर भारतातून 'आऊट'; कंपनीनं गुंडाळला आपला गाशा

पबजी कॉर्पोरेशनने 30 ऑक्टोबरपासून देशातील पबजी मोबाइल युजर्ससाठीची सर्व्हिस आणि अॅक्सेस बंद केला आहे. यामुळे भारतीयांच्या मोबाइल डिव्हायसेसमध्ये या पुढे हा गेम डाउनलोड करता येणार नाही.

पबजी कॉर्पोरेशनने 30 ऑक्टोबरपासून देशातील पबजी मोबाइल युजर्ससाठीची सर्व्हिस आणि अॅक्सेस बंद केला आहे. यामुळे भारतीयांच्या मोबाइल डिव्हायसेसमध्ये या पुढे हा गेम डाउनलोड करता येणार नाही.

पबजी कॉर्पोरेशनने 30 ऑक्टोबरपासून देशातील पबजी मोबाइल युजर्ससाठीची सर्व्हिस आणि अॅक्सेस बंद केला आहे. यामुळे भारतीयांच्या मोबाइल डिव्हायसेसमध्ये या पुढे हा गेम डाउनलोड करता येणार नाही.

  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : भारताने बंदी घालून दोन महिने उलटून गेल्यानंतरही खेळ सुरूच ठेवलेल्या पबजी मोबाइलने (pubg mobile) आता भारतातील आपला व्यवसाय बंद केला आहे. पबजी कॉर्पोरेशनने 30 ऑक्टोबरपासून देशातील पबजी मोबाइल युजर्ससाठीची सर्व्हिस आणि अॅक्सेस बंद केला आहे. यामुळे भारतीयांच्या मोबाइल डिव्हायसेसमध्ये या पुढे हा गेम डाउनलोड करता येणार नाही.

चीनसोबतचा सीमेवरील तणाव वाढल्यानंतर सायबर सुरक्षेच्या (cyber security) मुद्द्यावरून भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने पबजीसह अनेक अॅप्सवर बंदी घातली होती. या अप्समुळे भारताच्या सार्वभौमत्व, एकात्मतेला तसेच संरक्षण आणि अंतर्गत कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचं कारण दाखवून ही बंदी घालण्यात आली होती.

टेक क्रंचच्या रिपोर्टनुसार, बंदीनंतर इतर अॅप्स भारतात उपलब्ध नव्हते, परंतु आपल्या मोबाइलमध्ये आधीच इन्स्टॉल करून घेतलेल्या भारतीयांसाठी पब्जी मात्र सुरूच होता. भारतातील महिन्याकाठी 90 टक्के युजर्स अॅक्टिव्ह होते, अशी माहिती आहे. परंतु आता मात्र आम्ही आमची सेवा आणि उपलब्धता बंद करत आहोत, असं पबजी कॉर्पोरेशनने स्पष्ट केलं आहे.

(वाचा - Gold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमती वधारल्या; काय आहेत आजचे नवे दर)

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने 2 सप्टेंबरला पबजीवर बंदी घातली होती. हा आदेश आम्ही पाळत आहोत, असं पबजीने आपल्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवर जाहीर केलं आहे. पबजी मोबाइल आणि पबजी मोबाइल लाईट अशा दोन्ही सेवा म्हणजेच पबजी मोबाइल आता भारतातील युजर्ससाठी उपलब्ध नसेल. पबजी मोबाइलचे भारतातील प्रसिद्धीचे अधिकारही पबजी इंटलेक्चुअल प्रॉपर्टीच्या मालकाकडे परत केले जातील, असंही कॉर्पोरेशनने नमूद केलं आहे.

पबजी खेळात लहान-मोठे सगळेच गुंतले होते. या खेळात वेगवेगळी टार्गेट दिली जायची ती पूर्ण करण्यासाठी तरुण आणि अल्पवयीन मुलं जीव द्यायलाही पुढे-मागे पाहत नसत. महाराष्ट्रात काही मुलांना या खेळामुळे मानसिक आजारांचा सामना करावा लागला होता.

(वाचा - घरबसल्या 10 मिनिटांत फ्रीमध्ये बनवा Pan Card; जाणून घ्या प्रक्रिया)

पबजीने आपल्या निवेदनात सांगितलं की, युजर्सच्या सुरक्षिततेला आमचं प्राधान्य असून, कंपनीने देशातील या संबंधीचे कायदे आणि सुरक्षिततेला जपतच आपला व्यवहार ठेवला होता. कंपनीच्या प्रायव्हसी पॉलिसीत जाहीर केल्याप्रमाणेच खेळाची माहिती पारदर्शकपणे वापरली गेली असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. जे काही झालं त्याबद्दल खेद व्यक्त करतानाच भारतीय प्लेअर्सनी दिलेला पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार मानत, पबजीने भारतातील आपला व्यवसाय बंद केला आहे.

(वाचा - मेसेजिंगसाठी भारतीय लष्कराचं नवं App! WhatsApp पेक्षा सुरक्षित असल्याचा दावा)

First published:

Tags: PUBG, Pubg game