मुंबई, 9 जुलै : सध्याच्या या तांत्रिक जगात माणसांइतकेच तंत्रज्ञानाचेही महत्त्व वाढले आहे. माणसाची बहुतांश कामे ही तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत. सध्याच्या काळात सर्वात जीवनावश्यक बनलेलं एक साधन म्हणजे मोबाईल. तंत्रज्ञानाने मानवाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वपूर्ण जागा घेतली आहे. आणि याचे सर्व श्रेय जाते इंटरनेट आणि सोशल मीडियाला. सध्या व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp Group) ही एक कॉमन गोष्टं बनली आहे. प्रत्येकजण काही ना काही कारणासाठी कोणत्या ना कोणत्यातरी ग्रुपमध्ये असतोच. मग तो फॅमिली, ऑफिस, फ्रेंड्स किंवा अन्य विषयांसंबंधित असू शकतो.
कित्येक जणांना अजून व्हॉट्सॲपची काही फीचर्स पूर्णपणे माहीत नसतात. त्यापैकीच एक म्हणजे, खूप जणांना व्हॉट्सॲप ग्रुपवरून एखाद्याला पर्सनल मेसेज कसा करायचा हे माहीत नसते. ग्रुपमधील एखाद्या अनोळखी व्यक्तीला पर्सनल मेसेज (Personal Message) करण्यासाठी त्याचा आधी नंबर सेव्ह करावा लागतो असा समज त्या अनेकांचा आहे आणि काही जण हे किचकट कामही करताना दिसतात.
आम्ही तुम्हाला याबाबतच्या काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत.
जर तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपवरील एखाद्या व्यक्तीला मेसेज करायचा असेल तर खालील ट्रिक्स तुम्ही वापरू शकता.
1. ज्याला रिप्लाय करायचा आहे त्याने ग्रुपवर केलेल्या मेसेजवर प्रेस करा. तो मेसेज निळ्या रंगाने बोल्ड होईल.
2. त्यानंतर तुम्हाला मोबाईलच्या उजव्या साईडला तीन डॉट दिसतील.
3. त्या डॉट्सवर क्लिक केलं की तुम्हाला Reply Privately असं दिसेल.
4. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट त्या व्यक्तीची विंडो (Direct Window) दिसेल आणि त्यांचा मेसेजही.
5. त्या मेसेजच्या खाली आपला मेसेज टाईप करून तो तुम्ही सेंड करू शकता.
तर अशाप्रकारे तुम्ही सहजपणे एखाद्या ग्रुपवरील मेसेजला रिप्लाय देऊ शकता, त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर सेव्ह करण्याचीही काही गरज नाही.
याव्यतिरिक्त व्हॉट्सॲपचे इतर काही फीचर्सही तुम्हाला कदाचित माहिती नसतील. तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे इव्हेंटही तयार करू शकता. यासाठी एखाद्याला किंवा तुम्हाला आलेल्या इव्हेंट टाइम आणि डेटच्या मेसेजवर तुम्हाला प्रेस करावे लागेल. तो मेसेज निळ्या रंगात बोल्ड होईल. त्यानंतर तुम्ही दिनांक आणि वेळ निवडल्यानंतर एक पॉप-अप स्क्रिनवर दिसेल. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर “create event” आणि “copy” हे दोन ऑप्शन्स दिसतील - यापैकी तुम्ही “create event” निवडून इव्हेंट तयार करू शकता.
तसेच कधीकधी आपल्याला एखादा व्हिडिओ आपल्या मित्रं-मैत्रीणींना पाठवायचा असतो पण त्यातील ऑडिओ रिमूव्ह करायचा असतो. पण हे काहीजणांना करता येत नाही. तर त्यासाठी आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत. ती म्हणजे, तुम्ही ज्या व्यक्तीला व्हिडिओ पाठवत आहात त्या व्यक्तीच्या चॅट विंडोमध्ये व्हिडिओ सिलेक्ट (Video Select) केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या डाव्याबाजूला साउंडचे चिन्ह दिसेल. त्यावर तुम्ही क्लिक केले की तुमच्या व्हिडिओचा आवाज म्यूट होईल आणि समोरच्या व्यक्तीला फक्त व्हिडिओच जाईल, ऑडिओ ऐकू येणार नाही. तर या वरील ट्रिक्स तुम्ही वापराल तर तुम्हाला व्हॉट्सॲप वापरण्यात काहीच अडचण येणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Whatsapp, Whatsapp group