मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

eSIM बद्दल कधी ऐकलंय का? जाणून घ्या काय आहे ही सेवा आणि तिचे फायदे

eSIM बद्दल कधी ऐकलंय का? जाणून घ्या काय आहे ही सेवा आणि तिचे फायदे

सध्या देशातील प्रमुख मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून ई-सिम (eSIM) सेवा दिली जात आहे. ही सेवा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

सध्या देशातील प्रमुख मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून ई-सिम (eSIM) सेवा दिली जात आहे. ही सेवा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

सध्या देशातील प्रमुख मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून ई-सिम (eSIM) सेवा दिली जात आहे. ही सेवा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

मुंबई, 22 ऑगस्ट : देशातील प्रमुख मोबाईल कंपन्यांमध्ये  ग्राहकांना स्वत:कडे खेचण्यासाठी स्पर्धा सुरू असते. देशात 2G, 3G नंतर 4G सेवा सुरू झाली. आता 5G सेवा येऊ घातली आहे. आतापर्यंतच्या लाँच केलेल्या सर्व सेवांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या देशातील प्रमुख मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून ई-सिम (eSIM) सेवा दिली जात आहे. सर्वच स्मार्टफोनमध्ये याचा वापर करण्याचा पर्याय नाही. शिवाय ही सेवा महागडी असल्याने फारसं कोणाला याबद्दल माहितीही नाही. अ‍ॅपलसारख्या (Apple) ब्रँडने त्यांच्या बहुतांश उत्पादनांत व सॅमसंग (Samsung) व मोटोरोला (Motorola) कंपन्यांच्या महागड्या फोनमध्येही ही सेवा उपलब्ध केली गेली आहे. मोबाईलचा वापर करणाऱ्या अनेकांना आजही eSIM सेवेबद्दल माहिती नाही. ही सेवा काय आहे, याचा उपयोग काय याबद्दल ‘इंडिया डॉट कॉम हिंदी’नं वृत्त दिलं आहे.

काय आहे eSIM?

eSIM बद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. पण तंत्राबद्दल फारसं कुठं बोललं गेलं नाही. ई-सिम म्हटलं की इलेक्ट्रॉनिक सिम असा समज होऊ शकतो; पण वास्तवात ते एम्बेडेड सिम (Embedded Sim) आहे. हे तंत्रज्ञान फोनच्या मदरबोर्डमध्ये बसवण्यात आलेलं असतं. या पर्यायाचा वापर स्मार्ट वॉच (Smart Watch) आणि ड्रोनमध्येही (Drone) केला गेलाय. कारण या डिव्हाईसवर (Device) अतिरिक्त सिम कार्ड स्लॉट तयार करण्याची अडचण दूर करण्यात आली आहे.

सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास हे एम्बेडेड किंवा डिजिटल सिम ग्राहकाला प्रत्यक्ष सिमकार्ड न वापरताही मोबाईल वापरायची सुविधा उपलब्ध करून देतं. भारती एअरटेल (Airtel) , जिओ (Jio) आणि व्हीआय (VI) या कंपन्यांकडून eSIM सुविधा दिली जाते. ही सेवा अँड्राईड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही स्मार्टफोनला सपोर्ट करते.

कशी काम करते eSIM सेवा?

eSIM सेवा सुरू करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. विविध कंपन्यांमध्ये ती वेगवेगळी असू शकते. टेलिकॉम कंपन्यांकडून eSIM साठी वेगळं शुल्क आकारलं जात नाही. नियमित प्लॅनमध्ये त्याच नंबरवर ही सेवा दिली जाते. एअरटेल आणि जिओ कंपन्यांकडून प्रीपेड आणि पोस्टमध्येही eSIM सेवा उपलब्ध आहे. व्हीआय कंपनीने मात्र केवळ पोस्टपेड प्लॅनवर या सेवेचा पर्याय दिला आहे. एअरटेल कंपनीकडून ही सेवा घ्यायची असल्यास नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 121 पर एसएमएस पाठवावा लागतो. व्हीआय कंपनीसाठी 199 या क्रमांकावर तर जिओद्वारे ही सेवा घ्यायची असेल तर 199 क्रमांकावर GETESIM असा एसएमएस पाठवणं आवश्यक आहे. युजर IMEI आणि EID नंबर सेटिंगमध्ये जाऊन अ‍ॅपमध्ये पाहू शकतात.

Jio पूर्वी Airtel 5G सेवा लाँच करणार? महाराष्ट्रातील या शहरांमध्ये सर्वप्रथम मिळणार सुविधा

ही प्रक्रिया केल्यानंतर युजरला एक एसएमएस मिळेल. त्यानंतर मोबाईलमध्ये एक सेटिंग करावं लागतं. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर युजरला नोंदणीकृत ई-मेल आयडीवर एक क्युआर कोड येईल. तो स्कॅन करावा लागेल. कंपन्यांशी संबंधित एअरटेल थँक्स अ‍ॅप, व्हीआय अ‍ॅप आणि माय जिओ अ‍ॅप डाउनलोड करून तुम्ही ई-मेल आयडी तपासू किंवा अपडेट करू शकता.

कशी आहे स्कॅनिंग प्रक्रिया?

विविध स्मार्टफोनमध्ये स्कॅनिंगची प्रक्रिया वेगवेगळी असू शकते. यातील प्रमुख मोबाईलच्या सेटिंग्जबद्दल माहिती देत आहोत.

सॅमसंग मोबाईल : सुरुवातीला Settings मध्ये जावं त्यानंतर Connections पर्याय निवडावा. त्यानंतर SIM Card Manager वर क्लिक करावं. त्यानंतर Add Mobile Plan वर क्लिक केल्यानंतर Add Using QR Code वर क्लिक करावं.

अ‍ॅपल मोबाईल : अ‍ॅपल युजर्सनी Settings मध्ये जावं. Mobile Data पर्याय निवडावा. त्यानंतर Add Data Plan वर क्लिक करावं.

पिक्सल मोबाईल : पिक्सल युजर्सनी Settings मध्ये जावं. त्यानंतर Network & Internet पर्याय निवडावा. Mobile Network वर क्लिक करून Download a SIM Instead वर क्लिक करावं. त्यानंतर Next पर्याय निवडावा. त्यानंतर ई-मेल प्राप्त होईल. त्यातील QR कोड स्कॅन करावा.

कोणत्या स्मार्टफोनला eSIM चा सपोर्ट ?

eSIM ही सेवा आयफोनच्या (iPhones) बहुतांश उत्पादनांत मिळते. आयफोन 6 नंतरच्या मॉडेलच्या फोनमध्ये eSIM सेवा वापरता येऊ शकते. या शिवाय सॅमसंग फोनमध्ये गॅलेक्सी एस 20 सीरिज, एस 21 सीरिज, सर्व झेड फोल्ड स्मार्टफोन आणि झेड फ्लिप डिव्हाइसमध्ये ही सेवा वापरता येऊ शकते. इतर अँड्राईड स्मार्टफोनमध्ये मोटोरोला रेझर (Motorola Razr) आणि गुगल पिक्सल 2 (Google Pixel 2) आणि त्यानंतरच्या उत्पादनांतही ही सेवा दिली गेली आहे.

10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत ‘हे’ 5 स्मार्टफोन; फिचर्सही आहेत खास

eSIM ला आहेत मर्यादा

eSIM ची सेवा वापरत असाल तर तुम्हाला उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेलच याची काही शाश्वती नाही. नवीन सिम घ्यायचं असेल तर स्टोअरपर्यंत जाण्याची गरज नाही. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वारंवार एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये सिम टाकत असाल तर दरवेळी अ‍ॅक्टिव्हेशन प्रक्रिया करणं भाग पडतं.

First published:

Tags: Mobile, Sim, Smartphone