मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /बेस्टच! 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत ‘हे’ 5 स्मार्टफोन; फिचर्सही आहेत खास

बेस्टच! 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत ‘हे’ 5 स्मार्टफोन; फिचर्सही आहेत खास

बेस्टच! 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत ‘हे’ 5 स्मार्टफोन; फिचर्सही आहेत खास

बेस्टच! 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत ‘हे’ 5 स्मार्टफोन; फिचर्सही आहेत खास

Mobile Phone under 10,000 Rupees: तुम्ही जर 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल, तर तुम्हाला अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

मुंबई, 21 ऑगस्ट: गेल्या दोन दशकांमध्ये मोबाइल उद्योग खूप वेगानं विकसित झाला आहे. स्मार्टफोन ही केवळ मूलभूत गरज बनली नाही, तर डिजिटल अॅप्स आणि स्मार्ट फीचर्समुळे वापरकर्त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आज आम्ही तुम्हाला 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणार्‍या काही स्मार्टफोन्सबद्दल (Mobile Phone under 10,000 Rupees) सांगणार आहोत. हे Android OS, HD डिस्प्ले, मजबूत प्रोसेसर सह येतात. भारतीय बाजारपेठेत उपस्थित असलेल्या Redmi, Tecno, Realme, Lava, Oppo आणि Vivo फोनबद्दल सर्वकाही जाणून घेऊया…

Redmi 9 Active: Redmi 9 Active हा 10,000 रुपयांच्या आत येणारा एक तगडा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅम, 64 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. या बजेट फोनमध्ये 2.3 GHz ऑक्टा-कोर Helio G35 प्रोसेसर आहे. बँक ऑफर्ससह हा फोन 8,999 रुपयांमध्ये ऑनलाइन घेता येईल.

Tecno Spark 9T-

Tecno Spark 9T मध्ये 6.6-इंचाचा फुलएचडी + डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर, 4 GB रॅम आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. हँडसेटमध्ये 50 मेगापिक्सलचा मागील सेन्सर उपलब्ध आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी आहे. स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. फोनची किंमत 9,299 रुपये आहे.

Realme Narzo 50i-

Realme Narzo 50i मध्ये 6.5-इंच स्क्रीन आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये 64 GB इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध आहे. रिअ‍ॅलिटीच्या या फोनमध्ये 8 मेगापिक्सल प्राइमरी आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम आहे. Realme च्या या फोनची किंमत 8,999 रुपये आहे.

हेही वाचा- Cheapest car in India: ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार, किंमत 3 लाखांपेक्षा कमी

Lava X2-

लावाचा हा फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीतही घेता येईल. या स्मार्टफोनमध्ये 2 GB रॅम आणि 32 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. या फोनला 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Lava X2 मध्ये 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोनची स्क्रीन 6.5 इंच आहे. फोनमध्ये 1.8 GHz वर चालणारा प्रोसेसर उपलब्ध आहे.

Oppo A15s-

Oppo A15s मध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सल प्राइमरी, 2 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल सेन्सर्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या हँडसेटमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4230mAh बॅटरी देण्यात आली आहे. हँडसेटची किंमत 9,990 रुपये आहे.

Vivo Y15s-

Vivo चा हा बजेट फोन 10000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळण्याची संधी आहे. Vivo Y15S मध्ये 3 GB रॅम आणि 32 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेल प्राइमरी आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. या बजेट फोनमध्ये 6.5 इंचाची एलसीडी स्क्रीन आहे. हँडसेटमध्ये अँड्रॉईड आधारित फनटच ओएस देण्यात आली आहे. Vivo Y15S ची किंमत 9,499 रुपये आहे.

First published:

Tags: Smartphone