मुंबई, 05 जुलै: आपल्या घरात विजेचा मीटर (Electricity) असणं यात आता काही नावीन्य राहिलेलं नाही. आता तर पाणीपुरवठा आणि गॅसपुरवठ्याचे (Gas) मीटरही अगदी सहजपणे दिसू लागले आहेत. त्या मीटर्समध्येही आता बदल दिसू लागले असून, जुन्या मीटर्सऐवजी डिजिटल मीटर (Digital Meter) वापरले जाऊ लागले आहेत. त्यांना स्मार्ट मीटर असंही म्हटलं जातं. पण हे मीटर्स आपल्या घरावर पाळत ठेवण्यासाठी किंवा हेरगिरी करण्यासाठी वापरले जाऊ शकतात का? अमेरिकेत अलिकडेच घडलेल्या घटनांमधून तसे संकेत मिळत आहेत. अॅडव्हान्स मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम (Advance Metering Infrastructure System) अर्थात स्मार्ट मीटर्सबद्दल थोडं जाणून घेऊ या. आपल्या घरात वापरली गेलेली वीज, पाणी, गॅस आदींची नोंद स्मार्ट मीटरद्वारे ठेवली जाते. या मीटर्समध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डिस्प्ले, कंट्रोलर्स, मीटर डेटा मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, सप्लायर बिझनेस सिस्टीम अशा गोष्टी असतात. हे सगळं एका मोठ्या स्मार्ट ग्रिडचा भाग असतं. गेल्या काही कालावधीत जगभरात अॅडव्हान्स मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा (AMI) वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हे नव्या प्रकारचे स्मार्ट मीटर्स आपलं घर, तसंच व्यावसायिक आणि उद्योगाच्या ठिकाणांवर हेरगिरीही करत असल्याचं लक्षात आलं आहे. 2019मध्ये अमेरिकेत 9 कोटी AMI बसवण्यात आले होते. युरोपीय महासंघात 2022पर्यंत 12.5 कोटी स्मार्ट मीटर्स बसवले जाण्याची शक्यता आहे. या मीटर्समध्ये काय असतं? AMI सिस्टीमच्या आधी ऑटोमेटिक मीटर रीडिंग सिस्टीम होती. ती सिस्टीम अद्यापही अनेक देशांत वापरली जाते. त्यात केवळ मीटर ते मीटर रीडर एवढंच वन वे कम्युनिकेशन (One Way Communication) असतं. AMI सिस्टीममध्ये टू-वे कम्युनिकेशन (Two Way Communication) असतं. म्हणजेच मीटरला संदेश पाठवले जाऊ शकतात आणि मीटरही संदेश पाठवू शकतो. किमतीत बदल, ग्राहकाच्या मागणीनुसार बदल, दुरून सेवा रद्द करणं अशा अनेक आदेशांचा त्यात समावेश असतो. ही सिस्टीम वायर्ड किंवा वायरलेस अशा दोन्ही प्रकारच्या यंत्रणेद्वारे संदेश पाठवू शकते. नव्या सिस्टीममध्ये समस्या या नव्या सिस्टीममध्ये अनेक प्रकारच्या समस्या असल्याचं आढळून आलं आहे. फेब्रुवारी 2021मध्ये टेक्सासमध्ये पहिल्यांदा झालेल्या हिमवर्षावामुळे 150हून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्या वर्षावामुळे संपूर्ण राज्यभरातला वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा कोणकोणत्या भागात खंडित झाला आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न एका व्हाइट हॅट हॅकरने केला. कंपनीने त्याला ही संवेदनशील (Sensitive Information) संरचनात्मक माहिती असल्याचं सांगून ती देण्यास नकार दिला. हे वाचा - Smile Please! या ऑफिसमध्ये हसल्यानंतरच मिळणार एन्ट्री ती वीजपुरवठा कंपनी कोणत्या प्रकारचे स्मार्ट मीटर वापरत आहे, याची हॅश नावाच्या त्या हॅकरला माहिती होती. त्याने आपल्या कारच्या आसपासचे वायरलेस संदेश वाचण्यास सुरुवात केली. 40 किलोमीटरच्या प्रवासात त्या हॅकरला सात हजार स्मार्ट मीटर्सचे आकडे वाचता आले. त्याच्या असं लक्षात आलं, की कृष्णवर्णीयांचं वास्तव्य असलेल्या भागांमध्ये ब्लॅकआउट होण्याचं, वीजपुरवठा खंडित होण्याचं प्रमाण जास्त होतं. हॅशने संपूर्ण आकडेवारीसह ही माहिती सोशल मीडियावर जाहीर केली. टेक्सासमध्ये अनेकांना अशी सुविधा देण्यात आली आहे, की त्यांची इच्छा असेल, तर त्यांच्या थर्मोस्टॅटचं (Thermostat) तापमान आपोआप गरजेनुसार वाढवलं जाऊ शकेल. याचाच अर्थ असा, की तुमच्या स्मार्ट मीटरच्या माहितीच्या आधारे तुमच्याकडचं उपकरण दुरून नियंत्रित करता येऊ शकत असेल, तर स्मार्ट मीटर्सना अनेक प्रकारची माहिती मिळवणं शक्य आहे. हे वाचा - LinkedIn वर अकाउंट असेल तर तुमची वैयक्तिक माहिती धोक्यात! लाखोंचा डेटा लीक हे स्मार्ट मीटर्स आणि त्याद्वारे घरातली अनेक उपकरणं हॅकर्सद्वारे लक्ष्य केली जाऊ शकतात, हे आणखी धोकादायक आहे. अलीकडेच काही हॅकर्सनी (Hackers) रॅन्समवेअर (Ransomeware) घालून अमेरिकेतल्या अनेक भागांतली पाइपलाइन व्यवस्था ठप्प केली होती. अमेरिकी सरकारला ती व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी करोडो डॉलर्स खर्च करावे लागले. आणखी एक धोका म्हणजे हे स्मार्ट मीटर्स आपल्या घरातली वेगवेगळ्या प्रकारची माहिती (Data) गोळा करून बाजारात ती विकू शकतात. हेच काम सध्या स्मार्टफोन्सद्वारे अनेक कंपन्या करत आहेत. विजेवरची कोणती उपकरणं तुम्ही कधी वापरता, वगैरे प्रकारची माहिती या स्मार्ट मीटर्सद्वारे (Smart meters) मिळवणं शक्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.