Home /News /technology /

62 वर्षीय अर्धांगवायूग्रस्त ​​रुग्णानं फक्त विचार केला अन् ट्विट झालं पोस्ट! काय आहे नवीन अविष्कार?

62 वर्षीय अर्धांगवायूग्रस्त ​​रुग्णानं फक्त विचार केला अन् ट्विट झालं पोस्ट! काय आहे नवीन अविष्कार?

आता मेंदूतील विचार थेट कॉम्प्युटरच्या मदतीने मजकुरात रुपांतरीत करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ऑस्ट्रेलियातील 62 वर्षीय फिलीप ओ कीफे यांना 2015 मध्ये मोटर न्यूरॉन डिसीज (ALS) चं निदान झालं होतं. त्यांनी 23 डिसेंबर रोजी स्टॅन्ट्रोड ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस (BCI) वापरून कुठलीही हालचाल न करता फक्त विचार करुन एक ट्विट केलं आहे.

पुढे वाचा ...
    मेलबर्न : अर्धांगवायू (paralyzed) झालेल्या व्यक्तीस शारीरिक हालचाली करणं अवघड जातं. किंबहुना काही रुग्णांना अशा हालचाली अजिबातच करता येत नाहीत. याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनशैलीवर होतो. परंतु, एका उपकरणामुळे या रुग्णांच्या अनेक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. अर्धांगवायू झालेले रुग्ण स्टँड्रोड नावाच्या उपकरणामुळे ऑनलाइन पद्धतीने कामं करू शकणार आहेत. ऑस्ट्रेलियातील (Australia) अर्धांगवायू झालेली एक व्यक्ती आपला विचार थेट ट्विट (Direct Tweet) करणारी पहिली व्यक्ती ठरली आहे. पेपरक्लिपच्या आकाराइतक्या लहान ब्रेन इम्प्लांटमुळे (Brain Implant) हे शक्य झालं आहे. ऑस्ट्रेलियातले 62 वर्षांचे फिलीप ओकीफ (Philip O’Keefe) गेल्या 7 वर्षांपासून अॅमियो ट्रॉफिक लॅटरल स्क्लेरॉसिस (ALS) या आजारानं ग्रस्त आहेत. या आजारामुळे फिलीप हालचाल करू शकत नाहीत. `आता कीबोर्डवर टायपिंग करण्याची किंवा आवाजाच्या माध्यमातून टायपिंग करण्याची गरज नाही. मी हे ट्विट केवळ विचार करून केलं आहे. #helloworldbci`, असं ट्विट फिलीप यांनी नुकतंच केलं आहे. फिलीप यांना 2015 मध्ये मोटर न्यूरॉनचा (Motor Neuron) विकार झाल्याचं स्पष्ट झालं होतं. 23 डिसेंबरला फिलीप यांनी स्टँट्रोड ब्रेन कम्प्युटर इंटरफेस (BCI) वापरून त्यांचे विचार थेट मेसेजमध्ये रूपांतरित केले. फिलीप यांनी हा मेसेज पाठवण्यासाठी सिंक्रॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस ऑक्सली यांच्या ट्विटर हँडलचा (Twitter Handle) वापर केला. काय सांगता! चीनमध्ये न्यायाधीशांची जागा घेणार टेक्नॉलॉजी; लावणार केसचा निकाल मेंदूच्या वापरातून कामं होणार सोपी कॅलिफोर्निया येथील सिंक्रॉन या न्यूरोव्हॅस्क्युलर आणि बायोइलेक्ट्रॉनिक्स मेडिसीन कंपनीने तयार केलेला स्टँट्रोड हा ब्रेन कम्प्युटर इंटरफेस फिलीप यांच्यासारख्या व्यक्तींना मेंदूचा वापर करून कम्प्युटरवर काम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याबाबत ऑक्सली यांनी सांगितलं, `स्टँट्रोडचा वापर करणाऱ्या रुग्णांची क्लिक करण्याची अचूकता 93 टक्के आहे. ते प्रतिमिनिट 14 ते 20 अक्षरं टाइप करू शकतात. हे उपकरण घशातल्या शिरेत बसवलं जात असल्यानं या उपकरणासाठी मेंदूवर शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही.` मोबाईलची Memory वाढवण्याची Trick!हे App 4GB ला करेल 128 GB याबाबत ओकीफ यांनी सांगितलं, की `या तंत्रज्ञानाविषयी मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच मला हे किती स्वातंत्र्य देऊ शकते, याचा अंदाज आला. हे उपकरण अद्भुत असून, एखादी बाइक चालवण्यास शिकण्यासारखं आहे; मात्र यासाठीदेखील विशेष अभ्यासाची गरज आहे. हे उपकरण चालवायचा सराव एकदा झाला की ते वापरणं अधिक सोपं जातं. आता मी केवळ कुठे क्लिक करायचं आहे, याचाच विचार करतो. या उपकरणामुळे मला बँकिंग, खरेदी, ई-मेल पाठवणं आदी कामं करणं सहज शक्य होत आहे.`
    First published:

    Tags: Science, Technology

    पुढील बातम्या