Home /News /technology /

मोबाईलची Memory वाढवण्याची Trick!हे App 4GB ला करेल 128 GB

मोबाईलची Memory वाढवण्याची Trick!हे App 4GB ला करेल 128 GB

स्मार्टफोन (Smartphone) ही आता प्रत्येकाची गरज बनली आहे. सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे विविध फीचर्स असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. प्रत्येक जण आपली गरज आणि आर्थिक क्षमतेनुसार स्मार्टफोनची निवड करत असतो. स्मार्टफोन खरेदी करताना त्याची इंटर्नल (Internal) आणि एक्स्टर्नल मेमरी (External Memory) किती आहे, ही बाब प्रामुख्याने विचारात घेतली जाते.

पुढे वाचा ...
मुंबई, 29 डिसेंबर : स्मार्टफोन (Smartphone) ही आता प्रत्येकाची गरज बनली आहे. सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे विविध फीचर्स असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. प्रत्येक जण आपली गरज आणि आर्थिक क्षमतेनुसार स्मार्टफोनची निवड करत असतो. स्मार्टफोन खरेदी करताना त्याची इंटर्नल (Internal) आणि एक्स्टर्नल मेमरी (External Memory) किती आहे, ही बाब प्रामुख्याने विचारात घेतली जाते. कारण आजकाल स्मार्टफोनमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे, फोटो, व्हिडिओ स्टोअर केले जातात. यामुळे अनेक वेळा स्मार्टफोनमधली मेमरी लवकर संपते आणि फोन स्लो (Slow) होतो. परंतु, एक अशी ट्रिक आहे, की ज्यामुळे स्मार्टफोनमधलं 2GB, 4GB किंवा 8GB चं मेमरी कार्ड स्टोरेज तुम्ही अगदी 128 GB पर्यंत नेऊ शकता. स्मार्टफोनमधली मेमरी फुल झाली की फोन स्लो होऊ लागतो. त्यामुळे बरेच जण स्मार्टफोनमधल्या जुन्या फाइल्स, फोटो आणि व्हिडिओ डिलीट करतात; पण एक अशी ट्रिक आहे, की जी वापरल्याने तुम्हाला या गोष्टी डिलीट करण्याची गरज भासणार नाही. जेव्हा तुम्ही ही ट्रिक वापरणार असाल, त्या वेळी स्मार्टफोनची बॅटरी 100 टक्के किंवा किमान 50 टक्के चार्ज्ड असावी. स्मार्टफोनमधलं 4GB किंवा 8GB चं मेमरी कार्ड पूर्णतः रिकामं असावं. तसंच तुमचा स्मार्टफोन अँड्रॉइड 5.0 किंवा त्यापेक्षा वरच्या व्हर्जनचा असावा. तुम्हाला तुमच्या मेमरी कार्डची क्षमता वाढवायची असेल तर सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर ES Explorer हे अॅप (App) डाउनलोड करावं. हे अॅप डाउनलोड केल्यावर `फाइल मॅनेजर` (File Manager) या ऑप्शनवर क्लिक करावं. त्यानंतर `स्टोरेज डिव्हाइस` (Storage Device) या ऑप्शनवर जावं. त्यानंतर मेमरी कार्ड (Memory Card) हा ऑप्शन सिलेक्ट करावा. त्यानंतर तुम्हाला अनेक फोल्डर्स दिसतील. त्यातल्या अँड्रॉइड डेटा फोल्डरवर क्लिक करावं. त्यात एक नवा फोल्डर तयार करावा. त्याला एक्स्पांड (Expand) असं नाव द्यावं. त्यानंतर `ES नॉट एडिट ऑर` नावाच्या फोल्डरवर क्लिक करावं. हा फोल्डर उघडल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक कोरं पेज दिसेल. या पेजवर एडिट करून `मेक इट लार्ज` असं लिहावं. ज्या पेजवर तुम्ही `मेक इट लार्ज` असं लिहिलं आहे, त्याच्या जागी `मेक इट लार्ज 131072 MB` असं लिहावं आणि सेव्ह करावं. त्यानंतर स्मार्टफोन रिस्टार्ट करावा आणि मेमरी स्टोरेजमध्ये जावं. तिथे तुम्हाला स्टोरेज 124.97 GB झाल्याचं दिसेल. या ट्रिकचा वापर करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची मेमरी वाढवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला तुमची कोणतीही फाइल डिलीट करावी लागणार नाही.
First published:

पुढील बातम्या