Home /News /technology /

काय सांगता! आता न्यायाधीश नाही तर मशीन लावणार निकाल; न्यायाधीशांची जागा घेणार सॉफ्टवेअर

काय सांगता! आता न्यायाधीश नाही तर मशीन लावणार निकाल; न्यायाधीशांची जागा घेणार सॉफ्टवेअर

जगातला पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे चालणारा न्यायाधीश

जगातला पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे चालणारा न्यायाधीश

चिनी तंत्रज्ञान कंपन्यांनी जगातल्या पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे चालणारा न्यायाधीश (world’s first artificial intelligence-powered prosecutor) तयार केला आहे.

    मुंबई, 29 डिसेंबर: विज्ञानाच्या (Science) साह्याने मानवाने (Human Being) अनेक अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. अनेक गूढ रहस्यं उलगडली आहेत. चंद्रावरच नव्हे, तर अन्य ग्रहांवरही झेप घेतली असून, तिथं मानवी वस्ती वसवण्याची तयारी केली जात आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा आणखी एक आविष्कार असलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेनं (Artificial Intelligence- AI) तर अनेक कठीण गोष्टी सहजसाध्य केल्या आहेत. जगभरात निरनिराळ्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे; मात्र तरीही आतापर्यंत मानवी भावना, सद्सद्विवेकबुद्धी आवश्यक असलेल्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आलेला नव्हता. चीनने (China) मात्र आतापर्यंत कोणी विचारही केला नसेल अशा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जगाला धक्का दिला आहे. चीनने चक्क न्यायदानासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वापरण्यास सुरुवात केली असून, चिनी तंत्रज्ञान कंपन्यांनी जगातला पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे चालणारा न्यायाधीश (world’s first artificial intelligence-powered prosecutor) तयार केला आहे. शांघाय पुडॉन्ग पीपल्स प्रोक्युरेटोरेटनं हा यांत्रिक न्यायाधीश विकसित केला आहे. हा यांत्रिक न्यायाधीश सादर करण्यात आलेले पुरावे, युक्तिवाद आणि वादविवादाच्या आधारे निर्णय देईल. या यांत्रिक न्यायाधीशाचे निर्णय 97 टक्क्यांपर्यंत योग्य असल्याचा दावा चीननं केला आहे. गँगरेप झालेल्या तरुणीनं केली आत्महत्या, अंत्यसंस्कारावेळी झाला उलगडा या यांत्रिक न्यायाधीशांमुळे न्याय यंत्रणेवरील कामाचा ताण कमी होईल आणि गरज पडल्यास न्यायाधीशांच्या ऐवजी या यंत्रांचा वापर करता येईल, असा दावाही करण्यात आला आहे. डेस्कटॉप संगणकाद्वारे (Desktop Computer System) या यंत्रणेचा वापर करणं शक्य असून, एकाचवेळी अब्जावधी गोष्टींची माहिती यात साठवून ठेवता येते. या सगळ्या माहितीचं विश्लेषण करून निर्णय देण्यासाठी हा यांत्रिक न्यायाधीश सक्षम आहे. हा यांत्रिक न्यायाधीश विकसित करण्यासाठी वर्ष 2015 ते 2020 पर्यंतच्या हजारो खटल्यांचा वापर करण्यात आला आहे. क्रेडिट कार्ड फसवणूक, सट्टेबाजी अशा विविध प्रकरणांमध्ये हा योग्य निर्णय देऊ शकतो, असा दावाही करण्यात आला आहे. या नव्या शोधामुळे न्याययंत्रणेत खळबळ माजली असून, अनेकांनी न्यायदानासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत भीती व्यक्त केली आहे. याबाबत साउथ चायना मॉर्निंग पोस्टशी बोलताना एका न्यायाधीशाने भीती व्यक्त केली, की 'हा यांत्रिक न्यायाधीश 97 टक्के योग्य निर्णय देऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. याचाच अर्थ या यांत्रिक न्यायाधीशाचे निर्णय चुकण्याची शक्यता आहेच. मग अशा परिस्थितीत चुकीचा निर्णय झाला तर त्याला न्यायाधीश, मशीन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांपैकी कोण जबाबदार असेल? यंत्र चुका शोधू शकतं. परंतु निर्णय घेण्यासाठी माणसाच्या जागी यंत्र हा पर्याय ठरू शकत नाही.' तुमचा Smartphone होतोय Hang? हे सोपे उपाय ठरतील फायदेशीर चीनमधल्या या शोधामुळे जगभरातही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापर न्यायदान यंत्रणेत केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे न्याय यंत्रणेवरचा ताण कमी होईल की सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्याची शक्यता आणखी दुरापास्त होईल, हे आताच सांगणं कठीण आहे.
    First published:

    Tags: China, Technology

    पुढील बातम्या