मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Work From Home दरम्यान लॅपटॉप होतोय हँग? वापरा या सोप्या टिप्स

Work From Home दरम्यान लॅपटॉप होतोय हँग? वापरा या सोप्या टिप्स

कोरोनामुळे अनेक जण सध्या घरातूनच त्यांचं ऑफिसचं काम (work from home) करतात. अशा परिस्थितीत फोन आणि लॅपटॉपचं (laptop) कामही खूप वाढलं आहे. वर्क फ्रॉम होम करताना स्मार्टफोन आणि लॅपटॉप खूप हळू चालणं, सिस्टीम हँग होणं यासारख्या समस्यांना अनेकांना सामोरं जावं लागतं.

कोरोनामुळे अनेक जण सध्या घरातूनच त्यांचं ऑफिसचं काम (work from home) करतात. अशा परिस्थितीत फोन आणि लॅपटॉपचं (laptop) कामही खूप वाढलं आहे. वर्क फ्रॉम होम करताना स्मार्टफोन आणि लॅपटॉप खूप हळू चालणं, सिस्टीम हँग होणं यासारख्या समस्यांना अनेकांना सामोरं जावं लागतं.

कोरोनामुळे अनेक जण सध्या घरातूनच त्यांचं ऑफिसचं काम (work from home) करतात. अशा परिस्थितीत फोन आणि लॅपटॉपचं (laptop) कामही खूप वाढलं आहे. वर्क फ्रॉम होम करताना स्मार्टफोन आणि लॅपटॉप खूप हळू चालणं, सिस्टीम हँग होणं यासारख्या समस्यांना अनेकांना सामोरं जावं लागतं.

पुढे वाचा ...

    मुंबई, 29 सप्टेंबर-  कोरोनामुळे अनेक जण सध्या घरातूनच त्यांचं ऑफिसचं काम (work from home) करतात. अशा परिस्थितीत फोन आणि लॅपटॉपचं (laptop) कामही खूप वाढलं आहे. वर्क फ्रॉम होम करताना स्मार्टफोन आणि लॅपटॉप खूप हळू चालणं, सिस्टीम हँग होणं यासारख्या समस्यांना अनेकांना सामोरं जावं लागतं. त्याचा खूपच त्रास होतो; मात्र अगदी सहजसोप्या उपायांनी ही समस्या सोडवता येऊ शकते.

    'एबीपी लाइव्ह'च्या रिपोर्टनुसार, विंडोज अपडेट (windows update), रॅम अपग्रेड (RAM upgrade), री-स्टार्ट (Restart) यांसारखे काही उपाय केल्यास कम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वेग वाढू शकतो.

    कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काही ना काही एरर्स येत राहतात. हे एरर्स सॉल्व्ह करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करणारी कंपनी आपल्या सिस्टीममध्ये काही अपडेट्स सादर करत असते. या अपडेट्समार्फत ऑपरेटिंग सिस्टीममध्ये येत असलेले एरर्स सोडवले जातात. त्यामुळे सिस्टीम अप-टू-डेट ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. विंडोज 10मध्ये अपडेट आलं असेल तर ते चेक करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जावं आणि Update वर क्लिक करावं. त्यानंतर Check for Updates वर क्लिक केल्यावर लेटेस्ट अपडेट मिळू शकतं. ते डाउनलोड करावं.

    (हे वाचा:कोणत्या App मुळे तुमचा Smartphone अधिक स्लो होतोय? असं तपासा)

    विंडो 10मध्ये लॅपटॉपचा स्पीड वाढवण्यासाठी सिस्टीम मेंटेनन्सचा (System Maintenance) पर्याय देण्यात आला आहे. सिस्टीम मेंटेनन्समार्फत लॅपटॉपच्या कोणत्याही भागात असलेला एरर जाणून घेता येतो. याव्यतिरिक्त सिस्टीम मेंटेनन्सचा वापर कम्प्युटरमधून व्हायरस हटवण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याद्वारे स्पीड वाढू शकतो.

    अनेक युजर्स बरेच दिवस आपला लॅपटॉप बंदच करत नाहीत. काम झाल्यावर नुसता मिटून ठेवतात. विंडोज 10मध्ये कम्प्युटर स्वतःहून स्लीप मोडमध्ये जातो. परंतु, जी टास्क्स तुम्ही बंद करत नाही, ती बॅकग्राउंडमध्ये सुरूच राहतात. असं सतत झाल्यामुळे लॅपटॉप स्लो होतो. त्यामुळे काम संपल्यानंतर लॅपटॉप बंद करायला विसरू नका. लॅपटॉप बंद केल्यामुळे बॅकग्राउंडला सुरू असणारी सर्व टास्क्स बंद होतात.

    कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये अनेक अॅप्स किंवा सॉफ्टवेअर्स असतात. कंपन्या नव्या लॅपटॉपसोबत अनेक अॅप्सही देतात. त्यांना Bloatware असं म्हणतात. कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये अशी अॅप्स असतील, की जी तुम्ही वापरत नाही, तर ती डिलीट करा. विंडोजमध्ये Control Panel मध्ये जाऊन Program सिलेक्ट करा आणि जे अॅप डिलीट करायचं असेल त्यावर क्लिक करा. क्लिक करताच Uninstall चा ऑप्शन मिळेल. नको असलेली अॅप्स डिलीट केल्यामुळे लॅपटॉप किंवा कम्प्युटरचा स्पीड वाढण्यास मदत होते.

    (हे वाचा:Instagram लाखो Followers मिळवायचे आहेत? लगेच करा हे 5 महत्त्वाचे बदल)

    एसएसडी (Solid State Drives) हे नवीन प्रकारचं स्टोरेज डिव्हाइस आहे. ते फ्लॅश मेमरीवर काम करतं. एसएसडीमध्ये (SSD) वापर करण्यात येणाऱ्या फ्लॅश मेमरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधीपासून वापरल्या जाणाऱ्या एचडीडीपेक्षा (HDD) कमी वेळात डाटा अॅक्सेस केला जाऊ शकतो. एसएसडीची किंमत एचडीडीच्या तुलनेत अधिक असते. परंतु, तुम्ही ऑपरेटिंग सिस्टिम ड्राइव्हमार्फत एसएसडीचा वापर करून लॅपटॉपचा स्पीड वाढवू शकता. डाटा स्टोअर करण्यासाठी एचडीडी पर्याय म्हणून वापरू शकता.

    रॅम ( RAM) वाढवल्यामुळेही लॅपटॉपच्या स्पीडमध्ये फार फरक जाणवतो. 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या लॅपटॉपमध्ये 4GB पर्यंत रॅम असते. लॅपटॉपवर मल्टिटास्किंग करायचं असेल तर 4GB रॅम पुरेसे नाही. त्यामुळे रॅम अपग्रेड करणं आवश्यक आहे. अनेक कंपन्या लॅपटॉपमध्ये दोन रॅम स्लॉट देतात. दुसऱ्या स्लॉटमध्ये 4GB किंवा 8GB ची आणखी एक रॅम लावून लॅपटॉपचा स्पीड वाढवता येऊ शकतो.

    First published:
    top videos

      Tags: Technology