GAME मध्ये काढा कोरोनाविरोधातील सर्व भडास; बसल्या बसल्या करा व्हायरसचा नाश

GAME मध्ये काढा कोरोनाविरोधातील सर्व भडास; बसल्या बसल्या करा व्हायरसचा नाश

कोरोनाव्हायरसशी लढण्यात CORONA GAME तुमची मदत करतील.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : 2020 वर्षाचा आठवा महिना संपत आला तरी कोरोनाव्हायरस (coronavirus) काही जाईना. कोरोनाने अनेकांना वैताग आणला आहे. प्रत्येकाला वाटतंय कधी एकदाचा हा कोरोना जातो आहे आणि आम्ही मोकळा श्वास घेतो आहे. कोरोनाचा सर्व जण आता राग राग करू लागले आहेत. तुमच्या मनात आता कोरोनाविरोधात जितका राग आहे, तो राग त्याच्यावर काढण्याची संधी तुम्हाला आहे. तुम्ही एका ठिकाणी बसल्या बसल्या कोरोनाचा नाश करू शकता. कोरोनाविरोधात अनेक गेम तयार झालेले आहेत.

तुम्हाला मोबाइल गेम खेळायचा असेल तर मणिपूरच्या इम्फाळमधील नववीतल्या विद्यार्थ्याने कोरोबोई Coroboi हा मोबाइल गेम तयार केला आहे. बलदीप निंगथोपजम असं या मुलांच नाव आहे. हा गेम अँड्रॉइड फोनमध्ये उपलब्ध आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

एएनआयशी बोलताना बलदीप म्हणाला, "कोरोनाव्हायरसवर गेम तयार करण्याचा सल्ला मला माझ्या काकांनी दिला. त्यामुळे मी त्यादृष्टिने काम सुरू केलं. मी खूप लेख वाचले, युट्युब व्हिडीओ पाहिले आणि अखेर हे अॅप तयार केलं आहे. आठवडाभरात मी हे अॅप तयार केलं आहे. गेल्या आठवड्यातच हे अॅल लाँच करण्यात आलं आहे"

हे वाचा - बॅग किंवा पँटच्या खिशात नाही तर हाताच्या मनगटावर राहणार HAND SANITIZER

याच वर्षात एप्रिलमध्ये कोरोना लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा भाग कोरोना (Bhaag Corona) गेम लाँच करण्यात आलं आहे. हा ऑनलाइन गेम आहे झेव्हियर स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थी अक्रम तारीक खान आणि अनुश्री वरदे यांनी हा गेम तयार केला आहे.

गेममध्ये पंतप्रधान मोदींसह कोरोनाचा नाश करण्याची संधी देण्यात आली आहे. गेमच्या तळाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांच्या डोक्यावर एका बाणामध्ये ड्रॉप दिसतो आहे. हा ड्रॉप म्हणजे हँड सॅनिटायझर. गेमच्या वरच्या बाजूला एक वटवाघूळ आहे, ज्याच्यातून कोरोनाव्हायरस बाहेर येतो हा व्हायरस म्हणजे या गेममधील शत्रू.  हा कोरोनाव्हायरस इथून तिथून हलणारा आहे. तो बरोबर थेंबाच्या समोर येताच थेंबावर क्लिक करून त्याच्यावर सॅनिटाइझरचा थेंब सोडून त्याला मारायचं आहे.

हे वाचा - कोरोनासह कसं जगायचं? जगभरातील PHOTO पाहा मिळेल उत्तर

पॉइंटिंग शिवाय पाँइट आणि  क्लिकवर आधारित हा गेम आहे. गेममध्ये हरताच तुम्हाला कोरोनाविरोधात कसं लढून जिंकायचं याचा मार्ग सांगितला जातो. यामध्ये मास्क घाला, हात स्वच्छ धुवा असा उपाय सांगण्यात आला आहे. या गेमच्या माध्यमातून जनजागृतीही केली जाते आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीदेखील एक व्हिडीओ गेम लाँच केला. द कोरोना फायटर्स असं या गेमचं नाव आहे. कोरोनाबाबत जनजागृतीच्या उद्देशाने हा गेम लाँच करण्यात आला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हात धुणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, मास्क घालणं याचं महत्त्व सांगणारा हा व्हिडीओ गेम आहे.

Published by: Priya Lad
First published: August 24, 2020, 8:59 PM IST

ताज्या बातम्या